मुंबई: भारताने इंग्लंड विरुद्धची (IND vs ENG) टी 20 मालिका जिंकली. आता रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या टीम इंडियाची नजर वनडे सीरीज वर आहे. भारत आणि इंग्लंड मध्ये मंगळवारी पहिला वनडे सामना (1st ODI) होणार आहे. ही तीन वनडे सामन्यांची मालिका आहे. शिखर धवनसाठी (Shikhar Dhawan) ही सीरीज महत्त्वाची आहे. कारण या सीरीज नंतर होणाऱ्या वेस्ट इंडिज मधल्या वनडे सीरीजसाठी तो कॅप्टन आहे.
या सीरीज मध्ये पुन्हा एकदा सगळ्यांच्या नजरा विराट कोहलीवर असतील. बऱ्याच काळापासून त्याची खराब फॉर्मशी झुंज सुरु आहे. इंग्लंड विरुद्धच्या टी 20 मालिकेतही तो फ्लॉप ठरला. काल त्याने एक सोपा झेल सोडला. त्याबद्दलही त्याच्यावर बरीच टीका करण्यात आली. आता त्याच्यावर धावा बनवण्याचा दबाव असेल. वनडे मध्ये फॉर्म मिळवण्यासाठी आता त्याच्याकडे थोडा वेळ असेल. जोस बटलरची पूर्णवेळ कॅप्टन म्हणून ही पहिली सीरीज आहे. मॉर्गनने सन्यास घेतल्यानतंर त्याला पूर्णवेळ कॅप्टन बनवण्यात आलं आहे.
IND vs ENG: कधी, कुठे आणि कसा पाहू शकता पहिला वनडे सामना
भारत आणि इंग्लंडमध्ये पहिला वनडे सामना कुठे होणार?
भारत आणि इंग्लंडमध्ये पहिला वनडे सामना ओव्हल येथे होणार आहे.
भारत आणि इंग्लंडमध्ये पहिला वनडे सामना कधी खेळला जाणार?
भारत आणि इंग्लंडमध्ये पहिला वनडे सामना 12 जुलैला खेळला जाणार आहे.
भारत आणि इंग्लंडमध्ये पहिला वनडे सामना कधी सुरु होणार?
भारत आणि इंग्लंडमध्ये पहिला वनडे सामना भारतीय वेळेनुसार, संध्याकाळी 5.30 वाजता सुरु होणार.
भारत आणि इंग्लंडमध्ये पहिला वनडे सामना LIVE कुठे पाहता येईल?
भारत आणि इंग्लंडमधल्या वनडे सामन्याचं लाइव्ह कव्हरेज सोनी नेटवर्कच्या स्पोर्ट्स चॅनलवर पाहता येईल. इंग्रजी भाषेत सोनी सिक्स वर आणि हिंदीत सोनी टेन 3 वर पाहता येईल.
भारत आणि इंग्लंडमधल्या पहिल्या वनडे सामन्याचे लाइव्ह स्ट्रीमिंग कुठे पाहता येईल?
भारत आणि इंग्लंड मधल्या पहिल्या वनडे सामन्याचं लाइव्ह स्ट्रीमिंग Sonyliv वर पाहता येईल.