India vs England Women Cricket : एकदिवसीय मालिकेत झालेल्या पराभवानंतर भारतीय महिला संघ शुक्रवारपासून यजमान इंग्लंडविरुद्ध टी -20 मालिका खेळणार आहे (India vs England). उभय संघांमध्ये तीन टी -20 सामन्यांची मालिका खेळली जाणार असून, त्यातील पहिला सामना शुक्रवारी म्हणजे आज खेळला जाईल. एकदिवसीय मालिकेत भारतीय संघाला 1-2 ने पराभवाला सामोरे जावे लागले. भारताने तिसरा सामना आत्मविश्वासने आणि नेटाने खेळला आणि जिंकला… त्याच आत्मविश्वासाने आता टी ट्वेन्टी मालिकेला सुरुवात करण्याचा भारताचा इरादा आहे. मिताली राज आणि झुलन गोस्वामी यांच्यानंतर टी -20 फॉरमॅटमध्ये युवा फलंदाज शेफाली वर्मा आणि स्मृती मंधानासारख्या खेळाडूंची जबाबदारी वाढली आहे. स्नेह राणाच्या कामगिरीकडेही नजरा असतील जिने 2016 पासून संघासाठी एकही टी -20 सामना खेळलेला नाही. (india vs England 1st t20 live Streaming When And Where To watch online to free in marathi)
इंग्लंडविरुद्ध भारताने 19 टी -20 सामने खेळले असून त्यापैकी चार सामने जिंकले असून 15 सामने गमावले आहेत. इंग्लंडच्या भूमीत भारतीय संघाने पाचपैकी केवळ एक सामना जिंकला आहे. कोरोना आणि चांगली तयारी नसल्याने पराभवाला समोरं जावं लागलं परंतु टी -20 मालिकेपासून भारताला विजयाचा रस्ता सापडेल, असा विश्वास तिने व्यक्त केलाय.
भारत आणि इंग्लंड महिला संघ यांच्यातील पहिला टी -20 सामना शुक्रवार, 9 जुलै रोजी नॉर्थथॅम्प्टनच्या काउंटी मैदानावर खेळवला जाईल.
भारत आणि इंग्लंड महिला संघ यांच्यातील पहिला टी -20 सामना भारतीय वेळेनुसार रात्री 11 वाजता सुरू होईल. नाणेफेक रात्री साडेदहा वाजता होईल.
भारत आणि इंग्लंड महिला संघ यांच्यातील पहिला टी -20 सामना सोनी स्पोर्ट्स नेटवर्कवर थेट प्रसारित होईल.
भारत आणि इंग्लंड महिला संघ यांच्यातील पहिला टी -20 सामन्याचं Live Streaming SONY LIVE वर असेल.
(India vs England 1st t20 live Streaming When And Where To watch online to free in marathi)
हे ही वाचा :
अरेरे! सचिन-सौरवसोबत खेळलेला खेळाडू पोटाची खळगी भरण्यासाठी विकतोय चहा
विराट कोहलीला वर्कआउट व्हिडीओ शेअर करण पडलं महाग, फॅन्सने केली टीका, म्हणाले…