मुंबई: भारतीय संघ व्यवस्थापनाने टीम इंडियात (Team India) आतापर्यंत वेगवेगळे प्रयोग केले. वेगवेगळ्या युवा खेळाडूंना संधी दिली. पण आजपासून इंग्लंड विरुद्ध सुरु होणाऱ्या टी 20 मालिकेत भारत आपला मजबूत संघ मैदानात उतरवेल. यावर्षी ऑस्ट्रेलियात होणारा टी 20 वर्ल्ड कप (T20 World cup) लक्षात घेऊन भारतीय संघ इंग्लंडविरुद्ध पूर्ण ताकदीनिशी खेळणार आहे. कोविड 19 (Covid-19) ची लागण झाल्याने बर्मिंघम कसोटीत रोहित शर्मा खेळू शकला नव्हता. पण आज तो इंग्लंड विरुद्ध पहिल्या टी 20 सामन्यात खेळेल, अशी अपेक्षा आहे. विराट कोहली, रवींद्र जाडेजा, जसप्रीत बुमराह, श्रेयस अय्यर आणि ऋषभ पंत दुसऱ्या सामन्यापासून इंग्लंड विरुद्धच्या टी 20 मालिकेत सहभागी होतील. ऋतुराज गायकवाड आणि संजू सॅमसन या खेळाडूंना पुन्हा एकदा स्वत:ला सिद्ध करण्याची संधी मिळेल.
दुखापतीमुळे ऋतुराज गायकवाडला आयर्लंड सीरीजच्या दोन सामन्यात फलंदाजीची संधी मिळाली नव्हती. रोहित आजच्या सामन्यात खेळला, तर ऋतुराज गायकवाडला संधी मिळणार नाही. इशान किशनने मिळालेल्या संधीचा फायदा उचलला. त्याने प्रभावित केलं आहे. इंग्लंड सारख्या मजबूत संघाविरुद्ध चांगल्या इनिंग खेळून रिझर्व फलंदाज म्हणून स्थान भक्कम करण्याची इशानकडे संधी आहे. दुसऱ्यासामन्यात विराट कोहली तिसऱ्या नंबरवर फलंदाजीला येईल. दीपक हुड्डाला पहिल्या सामन्यात संधी मिळाल्यास पुन्हा एकदा स्वत:ला सिद्ध करण्याची संधी आहे. आयर्लंड विरुद्ध पहिल्या टी 20 सामन्यात नाबाद 47 आणि दुसऱ्यासामन्यात त्याने शतकी खेळी केली होती.
दुखापतीमधून सावरलेल्या सूर्यकुमार यादवला आयर्लंड विरुद्धच्या सीरीजमध्ये अपेक्षित कामगिरी करता आली नाही. इंग्लंड विरुद्धच्या मालिकेत दमदार कामगिरी करण्याचा त्याचा प्रयत्न असेल. मागच्या आठवड्यात डर्बीशायर विरुद्धच्या सामन्यात सूर्यकुमारने चांगली कामगिरी केली होती. ऋषभ पंतच्या अनुपस्थित दिनेश कार्तिककडे विकेटकीपिंगची जबाबदारी असेल. अक्षर पटेलचा ऑलराऊंडर म्हणून संघात समावेश होऊ शकतो. हर्षल पटेल, भुवनेश्वर कुमार आणि आवेश खान या तिघांना संधी मिळू शकते. उमरान मलिक आणि अर्शदीप सिंह या दोघांपैकी टीम मॅनेजमेंट कोणाला संधी देईल का? हा प्रश्न आहे.
ऑस्ट्रेलियात होणाऱ्या टी 20 वर्ल्ड कप आधी भारतीय संघ 15 टी 20 सामने खेळणार आहे. सध्या इंग्लंड विरुद्ध तीन त्यानंतर 29 जुलैपासून 7 ऑगस्टपर्यंत वेस्ट इंडिज विरुद्ध पाच आणि त्यानंतर ऑगस्ट-सप्टेंबरमध्ये आशिया कप मध्ये पाच सामने खेळायचे आहेत. इंग्लंड विरुद्धच्या मालिकेनंतर वर्ल्ड कपसाठी नेमका संघ कसा असेल? त्याची प्रक्रिया सुरु होईल.
इंग्लंडचा संघ –
जोस बटलर (कॅप्टन), मोइन अली, हॅरी ब्रूक, सॅम करन, रिचर्ड ग्लीसन, क्रिस जॉर्डन, लियाम लिव्हिंगस्टोन, डेविड मलान, टायमल मिल्स, मॅथ्यू पार्किसन, जेसन रॉय, फिल सॉल्ट, रीस टॉपली आणि डेविड विली
भारतीय संघ –
रोहित शर्मा (कॅप्टन,), इशान किशन, दीपक हुड्डा, सूर्यकुमार यादव, हार्दिक पंड्या, दिनेश कार्तिक, अक्षर पटेल, हर्षल पटेल, आवेश खान, युजवेंद्र चहल, भुवनेश्वर कुमार,