IND vs ENG : भारत आणि इंग्लंड (India vs England) यांच्यात सुरु असलेल्या पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेत पहिला सामना पावसाच्या व्यत्ययामुळे अनिर्णीत सुटला. त्यानंतर आता दुसरा सामना सुरु असून आज सामन्याचा दुसरा दिवस आहे. पहिल्या दिवशी भारताने प्रथम फलंदाजी करत इंग्लंडवर चांगली आघाडी मिळवली आहे. तब्बल 276 धावा केल्यानंतर भारताचे केवळ तीनच गडी तंबूत परतले होते. पण दुसऱ्या दिवशीची सुरुवात होताच एक एक करत भारतीय फलंदाज बाद होते. पण जाडेजाच्या 40 आणि पंतच्या 37 धावांच्या जोरावर भारताने 364 धावांपर्यंत मजल मारली असून आता इंग्लंडचे खेळाडू फलंदाजीला आले आहेत.
भारत आणि इंग्लंड यांच्यात लॉर्ड्स मैदानात दुसरा कसोटी सामना सुरु आहे. इंग्लंडने नाणेफेक जिंकत गोलंदाजीचा निर्णय घेतला. ज्याचा पुरेपुर फायदा घेत भारतीय फलंदाजानी दणकेबाज सुरुवात केली आहे. भारताचा सलामीवीर रोहित शर्माच अर्धशतक आणि केएल राहुलचं शतक याच्या जोरावर भारताने सामन्यात चांगली स्थिती मिळवली. पण दुसऱ्या दिवशी एकएक फलंदाज बाद होत असल्याने भारतीय संघ शंभर धावाही करु शकला नाही. ज्यामुळे भारताचा डाव 364 धावांवर आटोपला. भारताकडून सर्वाधिक धावा केएल राहुलने (127) केल्या. तर रोहितने (83) देखील चांगले योगदान दिले.
भारताने प्रथम फलंदाजी करत 364 धावांचा डोंगर उभा केला आहे. त्यामुळे आता गोलंदाजीला येणाऱ्या भारतीय गोलंदाजाकडे एक चांगले लक्ष्य आहे. इंग्लंडच्या फलंदाजाना भारताचा पहिला डाव चेस करुन एक मोठं लक्ष्य गाठायचं असल्याने त्यांच्यावर तणाव आहे. भारताकडे चार वेगवान गोलंदाज असल्याने त्यांच्याकडे इंग्लंडला कमीत कमी धावांत सर्वबाद करण्याची संधी आहे.
दिवसअखेरपर्यंत इंग्लंडच्या संघाने 3 विकेट्सच्या बदल्यात 119 धावांपर्यंत मजल मारली आहे. कर्णधार जो रुट (48) आणि जॉनी बेअरस्टो (6) ही जोडी मैदानात आहे.
मोठा प्रतीक्षेनंतर भारताला तिसरी विकेट मिळाली आहे. 42 व्या षटकात मोहम्मत शमीने सलामीवीर बर्न्सला (49) पायचित केलं. (इंग्लंड 108/3)
सलामीवीर रॉनी बर्न्स (46) आणि कर्णधार जो रुटने (41) 77 धावांची भागीदारी करत धावफलकावर इंग्लंडचं शतक झळकावलं आहे.
27 षटकात दोन विकेट्सच्या बदल्यात इंग्लंडंच्या संघाने अर्धशतकी मजल मारली आहे. सलामीवीर रॉनी बर्न्स (31) आणि कर्णधार जो रुट (14) या दोघांनी खेळपट्टीवर जम बसवला आहे.
इंग्लंडने लागोपाठ दुसरी विकेट गमावली आहे. मोहम्मद सिराजने हमीदला शून्यावर त्रिफळाचित केलं. (इंग्लंड 23/2)
भारताला पहिलं यश मिळालं आहे. 15 व्या षटकात मोहम्मद सिराजने सलामीवीर डॉम सिब्ले याला के. एल. राहुलकरवी झेलबाद केलं. (इंग्लंड 23/1)
इंग्लंडच्या फलंदाजांनी चहापानापर्यंत कोणतीही जोखीम न घेता संयमी खेळ केला. दोन्ही सलामीवीरांनी 14 षटकात 23 धावा जोडल्या आहेत.
इंग्लंडच्या सलामीवीरांनी संथ सुरुवात केली आहे. रॉनी बर्न्स (9) आणि डॉम सिब्ले (6) या दोघांनी 11 षटकात 16 धावा जोडल्या आहेत.
भारताचा पहिला डाव 364 धावांवर आटोपल्यानंतर इंग्लंडने फलंदाजीला सुरुवात केली आहे. इंग्लंडकडून रॉरी बर्न्स आणि डॉमनिक सिबली फलंदाजीला आले आहेत.
रोहित शर्माचं अर्धशतक आणि केएल राहुलचं शतक याच्या जोरावर भारताने 364 धावांपर्यंत मजल मारली आहे. अखेरच्या काही षटकांत जाडेजाने संयमी फलंदाजी करत 40 धावांचे योगदान दिले.
रवींद्र जाडेजासोबत क्रिजवर बराच वेळ टिकलेला इशांत शर्मा अखेर बाद झाला आहे. जेम्स अँडरसनने त्याला पायचीत केलं आहे.
इशांत शर्मा फलंदाजी करत असून एक गोलंदाज असूनही संयमी फलंदाजीचं दर्शन तो घडवत आहे. नुकताच त्याने चौैकार ठोकला आहे.
भारतीय संघाने आपल्या दिवसातील दुसऱ्या सेशनला सुरुवात केली आहे. सध्या इशांत शर्मा आणि रवींद्र जाडेजा मैदानात आहेत.
दुसऱ्या दिवसाची सुरुवात भारतासाठी खास झाली नसून काही वेळातच भारताचे एक-एक गडी बाद होत गेले. भारताचे चार गडी दुसऱ्या दिवसाच्या सुरुवातीपासून तंबूत परतले आहेत. सध्या भारताचा स्कोर 346 वर 7 बाद असून सामन्यात लंच ब्रेक घेण्यात आला आहे. जाडेजा आणि शर्मा क्रिजवर आहेत.
पंत बाद होताच पुढच्याच ओव्हरमध्ये मोहम्मद शमीही बाद झाला आहे. शून्य धावांवर खेळणाऱ्या शमीचा विकेट मोईन अलीने टीपला.
चांगल्या लयीत असणारा ऋषभ पंत अखेर बाद झाला आहे. 37 धावा करुन पंत बाद झाला आहे. मार्क वुडच्या चेंडूवर यष्टीरक्षक जोस बटलरने पंतचा झेल पकडला आहे.
दुसऱ्या दिवसाच्या सुरुवातीलाच दोन विकेट गेल्यानंतर हळूहळू भारताने 300 धावा पूर्ण केल्या आहेत. सध्या पंत आणि जाडेजा फलंदाजी करत आहेत.
दुसऱ्या दिवशीच्या खेळाला सुरुवात होताच भारताचे दोन गडी माघारी परतले आहेत. दुसऱ्या ओव्हरमध्ये जेम्स अँडरसनने रहाणेला झेलबाद केलं आहे.
दुसऱ्या दिवशीचा खेळ सुरु होताच भारताला पहिला झटका बसला आहे. भारताला शतकासह मजबूत स्थितीत नेणारा राहुल रॉबिनसनच्या चेंडूवर झेलबाद झाला आहे.
भारताचा सलामीवीर केएल राहुल सध्या 127 धावांवर खेळत आहे. त्याचा उत्तम फॉर्म पाहता तो दुहेरी शतक ठोकेल अशी आशा व्यक्त केली जात आहे.
पहिल्या दिवसाखेर भारतीय संघाने 3 विकेट्सच्या बदल्यात 276 धावांपर्यंत मजल मारली आहे. सध्या केएल राहुल 127 तर अजिंक्य रहाणे एक धाव या स्कोरवर खेळत आहे. भारतीय संघ चांगल्या स्थितीत असल्याने एक मोठी धावसंख्या उभी करेल अशी अपेक्षा आहे.