IND vs ENG : भारत आणि इंग्लंड (India vs England) यांच्यात सुरु असलेल्या पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेत पहिला सामना पावसाच्या व्यत्ययामुळे अनिर्णित सुटला. त्यानंतर ऐतिहासिक लॉर्ड्सच्या मैदानात आज भारताने इंग्लंडवर 151 धावांनी मात करत मालिकेत 1-0 ने आघाडी घेतली आहे. पहिल्या डावातील भारताच्या 364 धावांच्या बदल्यात इंग्लंडने 391 धावांपर्यंत मजल मारली होती. त्यानंतर इंग्लंडच्या 27 धावांच्या आघाडीचा पाठलाग करत भारताने अजिंक्य रहाणे आणि मोहम्मद शमीच्या अर्धशतकांच्या जोरावर 298 धावांवर डाव घोषित केला. त्यानंतर इंग्लंडला 60 षटकांमध्ये 272 धावांचं लक्ष्य दिलं. परंतु भारताने दिलेलं हे आव्हान इंग्लंडच्या फलंदाजांना पेलवलेलं नाही. भारतीय गोलंदाजांनी 51.5 षटकांमध्ये अवघ्या 120 धावांत इंग्लंडचे सर्व फलंदाज बाद करत या रोमहर्षक सामन्यात विजय मिळवला आहे. भारताकडून या डावात मोहम्मद सिराजने 4, जसप्रीत बुमराहने 3, इशांत शर्माने 2 आणि मोहम्मद शमीने 1 विकेट घेतली.
जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद शमी या जोडीने नवव्या विकेटसाठी भारताकडून विक्रमी भागीदारी करत 39 वर्षांपूर्वीचा लॉर्ड्सवरील रेकॉर्ड ब्रेक केला आहे. बुमराह आणि शमी दोघांनी लंचब्रेकपर्यंत 77 धावांची नाबाद भागीदारी केली. या दोघांनी 66 पेक्षा अधिक धावांची भागीदारी करताच हा रेकॉर्डब्रेक केला आहे. भारताकडून लॉर्ड्सवर मदन लाल (Madan Lal) आणि कपिल देव (Kapil Dev) यांनी 1982 मध्ये 9 व्या विकेटसाठी 66 धावांची भागीदारी केली होती. त्यांचा हा विक्रम शमी आणि बुमराहने मोडीत काढला आहे.
दुसऱ्या डावात भारताची अत्यंत खराब सुरुवात झाली होती. पहिल्या डावात शतक ठोकणारा सलामीवीर के. एल. राहुल दुसऱ्या डावात 5 धावा करुन बाद झाला. पाठोपाठ 21 धावा करुन रोहित शर्मादेखील माघारी परतला. त्यानंतर कर्णधार विराट कोहली 20 धावांवर असताना सॅम करनची शिकार ठरला. भारतीय संघ पूर्णपणे बॅकफुटवर ढकलला गेल्यानंतर भारताचा डाव भरवशाचे फलंदाज चेतेश्वर पुजारा आणि अजिंक्य रहाणे या जोडीने सावरला. या जोडीने तब्बल 297 चेंडूत शतकी भागीदारी रचून भारताचं या सामन्यातील आव्हान जिवंत ठेवलं. रहाणेने मोठ्या कालावधीनंतर अर्धशतक फटकावलं. त्याने 146 चेंडूत 5 चौकारांच्या मदतीने 61 धावांची खेळी केली. तर पुजाराने 45 धावांची खेळी केली.
मोहम्मद सिराजने जेम्स अँडरसनला त्रिफळाचित करत इंग्लंडचा 10 वा फलंदाज बाद केला आहे. त्यामुळे या सामन्यात भारताने इंग्लंडवर 151 धावांनी विजय मिळवला.
इंग्लंडचा 9 वा गडी माघारी परतला आहे. मोहम्मद सिराजने जॉस बटलरला 25 धावांवर असताना विकेटकीपर रिषभ पंतकरवी झेलबाद केलं. विजयासाठी भारताला 8.4 षटकात एका विकेटची आवश्यकता आहे. (इंग्लंड 120/9)
भारताला 8 वी विकेट मिळाली आहे. जसप्रीत बुमराहने ऑली रॉबिन्सनला 9 धावांवर असताना पायचित केलं. 9.1 षटकात भारताला 2 विकेटची गरज आहे. (इंग्लंड 120/8)
इंग्लंडला सातवा झटका, सॅम करन बाद
इंग्लंडने 6 वी विकेट गमावली आहे. मोहम्मद सिराजने मोईन अलीला पायचित केलं. त्याने 13 धावांचं योगदान दिलं. (इंग्लंड 90/6)
भारताला महत्त्वपूर्ण विकेट मिळाली आहे. जसप्रीत बुमराहने जो रुटला विराट कोहलीकरवी झेलबाद करुन इंग्लंडचा 5 वा गडी तंबूत धाडला आहे. रुटने 33 धावांचं योगदान दिलं. (इंग्लंड 67/5)
भारताला चौथी विकेट मिळाली आहे. इशांत शर्माने जॉनी बेअरस्टोला 2 धावांवर असताना पायचित करुन पव्हेलियनचा रस्ता दाखवला (इंग्लंड 67/4)
इंग्लंडने तिसरी विकेट गमावली आहे. इशांत शर्माने हसीब हमीदला 9 धावांवर असताना पायचित केलं. (इंग्लंड 44/3)
इंग्लंडला दुसऱ्या ओव्हरमध्ये आणखी एक झटका बसला आहे. शमीच्या चेंडूवर यष्टीरक्षक पंतने डॉमनिक सिबलीचा झेल पकडला आहे.
भारताने 272 धावांचे लक्ष्य दिल्यानंतर इंग्लंडने फलंदाजीला सुरुवात केली आहे. पण पहिल्या ओव्हरमध्येच भारताच्या बुमराहने सलामीवीर रॉरी बर्न्सला बाद केलं आहे. सिराजने त्याचा झेल पकडला आहे.
भारताचे शेवटच्या फळीतील फलंदाज जसप्रीस बुमराह आणि मोहम्मद शमी यांनी अप्रतिम फलंदाजी केली. ज्यामुळे इंग्लंडला त्यांना बाद करणे जमले नाही. ज्यामुळे अखेर भारताने आपला डाव 298 धावांवर घोषित करत 272 धावांचे लक्ष्य इंग्लंडला दिलं आहे.
दिवसाचं पहिलं सेशन संपल आहे. भारताकडू मोहम्मद शमी आणि जसप्रीत बुमराह यांनी अप्रतिम फलंदाजी करत भारताचा एक चांगली आघाडी मिळवून दिली आहे. भारताचा स्कोर 286 वर 8 बाद असून भारताकडे सध्या 259 धावांची आघाडी आहे. शमी 52 तर बुमराह 30 धावांवर खेळत आहे.
That’s Lunch on Day 5⃣ of the 2nd #ENGvIND Test at Lord’s!
A fantastic effort from @MdShami11 (5⃣2⃣*) & @Jaspritbumrah93 (3⃣0⃣*) take #TeamIndia to 286/8 as they lead England by 259 runs. ? ?
We shall be back for the 2nd session soon.
Scorecard ? https://t.co/KGM2YELLde pic.twitter.com/ou0XoGAZSL
— BCCI (@BCCI) August 16, 2021
नवव्या विकेटसाठी उत्कृष्ट भागिदारी करत शमी आणि बुमराह मैदानात टिकून आहेत. शमीने एक चौकार आणि षटकार ठोकत अर्धशतक पूर्ण केलं आहे.
बुमराह आणि शमी यांनी नवव्या विकेटसाठी खेळताना उत्तम अशी 50 धावांची भागिदारी पूर्ण केली आहे.
भारताचे संयमी खेळी करत 200 धावांची आघाडी घेतली आहे. सध्या बुमराह आणि मोहम्मद शमी जोडी फलंदाजी करत आहे.
कसोटी सामना अतिशय रंगतदार स्थितीत आहे. भारताचे गोलंदाज फलंदाजी करत असून बुमराहने नुकताच वुडला एक चौकार ठोकला आहे.
भारताचा आठवा गडी इशांत शर्माच्या रुपात तंबूत परतला आहे. रॉबिनसनने त्याला पायचीत केलं आहे. आता फलंदाजीला जसप्रीत बुमराह आला आहे.
ऑली रॉबिनसनच्या चेंडूवर ऋषभची झेल यष्टीरक्षक जोस बटलरने पकडत भारताला मोठा झटका दिला आहे.
दिवसाची सुरुवात होताच तिसऱ्या ओव्हरमध्येच पंतने अँडरसनला दिवसाचा पहिला चौकार ठोकला आहे.
दुसऱ्या डावात भारताने इंग्लंडच्या 27 धावांच्या आघाडीचा पाठलाग करताना 82 षटकांमध्ये 6 बाद 181 धावा जमवल्या आहेत. सर्व महत्त्वाचे फलंदाज बाद झाल्याने सर्व मदार पंतवर आली आहे.
पाचव्या आणि निर्णायक दिवसाच्या खेळाला सुरुवात झाली आहे. पंत आणि इशांत शर्माने फलंदाजीला सुरुवात केली आहे. तर जेम्स अँडरसनने गोलंदाजीला सुरुवात केली आहे.