IND vs ENG 1st Test Day 5 : भारत आणि इंग्लंड या संघात नॉटिंगहॅममध्ये सुरू असलेल्या पहिल्या कसोटीचा पाचवा दिवस पावसामुळे वाया गेला. त्यामुळे ही कसोटी अनिर्णीत सुटली आहे. सामन्याच्या पाचव्या आणि अखेरच्या दिवशी भारताला विजयासाठी 98 षटकांमध्ये 157 धावांची आवश्यकता होती. परंतु पंचांनी आणि मॅच चहापानापर्यंत पाऊस ओसरण्याची वाट पाहिली. परंतु चहापानानंतर पाऊस ओसरण्याऐवजी त्याने अधिक जोर धरला. पाऊस थांबण्याची कोणतीही चिन्ह दिसत नसल्याने पंचांनी सामना न खेळवण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे उभय संघांमधील पहिला कसोटी अनिर्णित सुटली आहे. दरम्यान, पहिल्या डावात अर्धशतक आणि दुसऱ्या डावात शतक ठोकणाऱ्या जो रुटला सामनावीराचा पुरस्कार देऊन गौरवण्यात आले.
भारत आणि इंग्लंड संघांमधील पहिल्या कसोटी सामन्यात दोन्ही डावात भारताच्या गोलंदाजांनी प्रभावी गोलंदाजी केली. दोन्ही डावात इंग्लंडचा कर्णधार जो रुटव्यतिरिक्त कोणत्याही इंग्लिश फलंदाजाला मोठी खेळी करता आली नाही. रुटने मात्र दोन्ही डावात खिंड लढवली. त्याने पहिल्या डावात अर्धशतककी (64) तर दुसऱ्या डावात शतकी (109) खेळी केली. सामना अनिर्णित सुटल्यानंतर रुटला दोन्ही डावातील चमकदार कामगिरीसाठी सामनावीराचा पुरस्कार देऊन गौरवण्यात आले.
पहिल्या डावांक इंग्लंडला 183 धावांत सर्वबाद केल्यानंतर भारतीय गोलंदाजानी दुसऱ्या डावात मात्र खास कामगिरी केली नाही. पण अनुभवी आणि मुख्य गोलंदाज जसप्रीत बुमराहने सर्वात महत्त्वाच्या जो रुटच्या विकेटसह आणखी 4 इंग्लंडचे फलंदाज तंबूत धाडले. ज्यामुळे भारताला काही प्रमाणात कमी असे टार्गेट मिळाले आहे.
भारत आणि इंग्लंड या संघात नॉटिंगहॅममध्ये सुरू असलेल्या पहिल्या कसोटीचा पाचवा दिवस पावसामुळे वाया गेला. त्यामुळे ही कसोटी अनिर्णीत सुटली आहे.
UPDATE: Play has been abandoned. ☹️
The first #ENGvIND Test at Trent Bridge ends in a draw.
We will see you at Lord’s for the second Test, starting on August 12. #TeamIndia
Scorecard ? https://t.co/TrX6JMzP9A pic.twitter.com/k9G7t1WiaB
— BCCI (@BCCI) August 8, 2021
काही वेळ पाऊस थांबल्याने पंच आणि मॅच रेफ्री मैदान आणि खेळपट्टीची स्थिती पाहून आजच्या दिवसाचा खेळ सुरु करण्याच्या विचारात होते. परंतु पावसाने पुन्हा जोर धरल्याने पुन्हा एकदा अडचणी वाढल्या आहेत.
It has started to rain and the inspection has been delayed.#ENGvIND https://t.co/vJwSSjaQaS
— BCCI (@BCCI) August 8, 2021
नॉटिंघममध्ये सुरु असलेल्या पावसामुळे भारत आणि इंग्लंड यांच्यातील सामन्याला मोठा विलंब होत आहे. मात्र नुकत्याच समोर आलेल्या माहितीनुसार पाऊस थांबला असून 7 च्या दरम्यान पंच मैदानात जाऊन निरीक्षण करणार आहेत.
UPDATE – It has stopped raining and there will be an inspection at 2.30 PM local time ( 7 PM IST)#ENGvIND
— BCCI (@BCCI) August 8, 2021
नॉटिंघममध्ये पाचव्या दिवशीचा खेळ पावसामुळे अजूनही सुरु झालेला नाही. पहिल्या सेशनता संपूर्ण खेळ पावसामुळे वाया गेलेला आहे. त्यामुळे निर्धारीत वेळेआधी अर्धा तास लंच ब्रेक घेण्यात आला आहे. अजूनही जोरदार पाऊस सुरु आहे. त्यामुळे सामना कधी सुरु होणार याबाबत काहीच सांगता येणार नाही.
भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाचव्या दिवशीच्या खेळाला अजूनही सुरुवात झालेली नाही. पावसाने मैदानात तंबू ठोकल्याने खेळाला मोठा विलंब होत आहे.
It’s still raining here at Trent Bridge with no sight of clear skies.#ENGvIND pic.twitter.com/gbmIibjvb1
— BCCI (@BCCI) August 8, 2021
भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाचव्या दिवशीचा खेळ सुरु होण्यासाठी काही मिनिटं शिल्लक आहेत. मात्र पावसाची रिपरीप अजूनही थांबली नसल्याने सामना वेळेवर सुरु होणार नाही अशीच चिन्हे दिसत आहेत.
पहिल्या डावातील भारताच्या 95 धावांच्या आघाडीमुळे भारताला सामना जिंकण्यासाठी 209 धावांचेच लक्ष्य होते. त्यातील 52 धावा भारताने केल्यामुळे विजयासाठी आता केवळ भारताला 157 धावांचे लक्ष्य आहे. सोबतच हातात 9 विकेटही असल्याने भारती फलंदाज विजयासाठी आतुर झाले आहेत.
भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाचव्या दिवशीचा खेळ सुरु होण्यास काही वेळ शिल्लक असताना मैदानावर काळे ढग आले आहेत. दाट पावसाची शक्यता असून रिमझीम सरी बरसत देखील आहेत.
Hello and welcome to Day 5 of the first Test. It is wet and windy here at Trent Bridge. ?️❄️ #ENGvIND pic.twitter.com/a6gekDe57X
— BCCI (@BCCI) August 8, 2021