Ind Vs Eng 1st Test | आजपासून इंग्लंड आणि टीम इंडियात कसोटी मालिका सुरु होणार आहे. सामन्याच्या 24 तास आधीच इंग्लंडने आपली प्लेइंग इलेव्हन जाहीर केली. पाच टेस्ट मॅचची सीरीज जिंकण्याचा इंग्लंडचा प्रयत्न असेल. इंग्लंडने आपली प्लेइंग 11 जाहीर केल्याने प्रत्येकजण हैराण झालाय. कॅप्टन बेन स्टोक्सच्या या निर्णयाची बरीच चर्चा होतेय.
भारताविरुद्ध पहिल्या टेस्टसाठी इंग्लंडने 4 बॉलर्ससह उतरण्याचा निर्णय घेतला आहे. यात 3 स्पिनर्स आहेत. इंग्लंडच्या प्लेइंग 11 मध्ये मार्क वुड, टॉम हार्टली आणि रेहान अहमद यांचा समावेश करण्यात आलाय. इंग्लंड़च्या टीममध्ये मार्क वुड फक्त वेगवान गोलंदाज असेल. म्हणजे इंग्लंडने पहिल्या टेस्टसाठी दिग्गज गोलंदाज जेम्स अँडरसनला बाहेर केलय. 41 वर्षाच्या अँडरसनने कसोटी करिअरमध्ये 690 विकेट घेतलेत.
इंग्लंडसाठी अडचण काय?
इंग्लंडसाठी पहिला कसोटी सामना सोपा नसेल. कारण टीमचा एक फिरकी गोलंदाज शोएब बशीरच्या वीजामध्ये अडचणी येत आहेत. त्याला अजून भारतात प्रवेश मिळालेला नाहीय. त्यामुळे तो पहिल्या कसोटीसाठी उपलब्ध नसेल. त्यामुळेच इंग्लंडला आपल्या प्लेइंग 11 मध्ये काही बदल करावे लागले आहेत.
जॅक क्रॉली, बेन डकेट, ओली पॉप, जो रूट, जॉनी बेयरस्टॉ, बेन स्टोक्स (कॅप्टन), बेन फोक्स, रेहान अहमद, टॉम हार्टली, मार्क वुड, जॅक लीच
टीम इंडियाच्या प्लेइंग 11 मध्येही एक दिग्गज नाही
एकाबाजूला इंग्लंडच्या टीममध्ये जेम्स अँडरसनसारखा दिग्गज नाहीय. त्याचवेळी टीम इंडियाकडून विराट कोहली पहिले दोन कसोटी सामने खेळणार नाहीय. विराटच्या जागी टीम इंडियाच्या स्क्वॉडमध्ये रजत पाटीदारचा समावेश करण्यात आलाय. पण त्याला प्लेइंग 11 मध्ये संधी मिळेल का? हा प्रश्न आहे.