IND vs ENG T20 Semi Final: इंग्लंडने टॉस जिंकला, टीम इंडियात एक महत्त्वाचा बदल

| Updated on: Nov 10, 2022 | 1:15 PM

IND vs ENG T20 Semi Final:

IND vs ENG T20 Semi Final: इंग्लंडने टॉस जिंकला, टीम इंडियात एक महत्त्वाचा बदल
Team india
Image Credit source: BCCI
Follow us on

एडिलेड: T20 वर्ल्ड कप 2022 मधील आज दुसरा सेमीफायनल सामना होणार आहे. टीम इंडिया आणि इंग्लंडमध्ये ही लढत होणार आहे. काल सेमीफायनलचा पहिला सामना झाला. यात पाकिस्तानने न्यूझीलंडवर 7 विकेट राखून सहज विजय मिळवला. आज टीम इंडिया मेलबर्नच तिकीट मिळवण्याच्या उद्देशाने मैदानात उतरेल. ग्रुप 2 मध्ये टीम इंडियाने फक्त दक्षिण आफ्रिकेविरुद्धचा सामना गमावला होता. या ग्रुपमध्ये टीम इंडिया 8 पॉइंटसह टॉपवर होती.

टॉस कोणी जिंकला?

इंग्लंडचा कॅप्टन जोस बटलरने टॉस जिंकून पहिली फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला आहे. इंग्लंडचा प्रमुख गोलंदाज मार्क वुड दुखापतीमुळे या मॅचमध्ये खेळत नाहीय. डेविड मलानही फिटनेसमध्ये अपयशी ठरला. मार्क वुड, डेविड मलानच्या जागी फिल सॉल्ट आणि ख्रिस जॉर्डनचा टीममध्ये समावेश करण्यात आलाय.

टीम इंडियात एक बदल 

टीम इंडियाने आज आपल्या टीममध्ये एक महत्त्वाचा बदल केलाय. दिनेश कार्तिकच्या जागी ऋषभ पंंतचा टीममध्ये समावेश केलाय.

15 वर्षांची प्रतिक्षा संपणार?

इंग्लंड ग्रुप 1 मध्ये दुसऱ्या स्थानावर होती. दोन्ही टीम्सनी टी 20 वर्ल्ड कपच जेतेपद पटकावलय. टीम इंडिया मागच्या 15 वर्षांपासून T20 वर्ल्ड कप विजेतेपदाच्या प्रतिक्षेत आहे. आज रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली टीम इंडिया मेलबर्नच तिकीट मिळवण्याचा प्रयत्न करेल.

टीम इंडियाने आज इंग्लंडला नमवून फायनलमध्ये प्रवेश करावा, अशी तमाम क्रिकेटप्रेमींची इच्छा आहे. आतापासून कोट्यवधी क्रिकेट चाहने भारत-पाकिस्तान फायनलची स्वप्न पाहत आहेत.

टीम इंडियाची प्लेइंग 11 – रोहित शर्मा (कॅप्टन), के एल राहुल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत, हार्दिक पंड्या, आर अश्विन, अक्षर पटेल, भुवनेश्वर कुमार, अर्शदीप सिंह, मोहम्मद शमी, 

इंग्लंडची प्लेइंग 11 – जोस बटलर ( कॅप्टन ), बेन स्टोक्स , एलेक्स हेल्स, हॅरी ब्रूक, फिल सॉल्ट,  सॅम करन, मोईन अली, आदिल रशीद, टायमल मिल्स, ख्रिस जॉर्डन, लियम लिव्हिंगस्टोन, ख्रिस वोक्स, डेविड विली