T20 वर्ल्ड कप 2022 मधील आज दुसरी सेमीफायनल मॅच झाली. टीम इंडिया आणि इंग्लंडमध्ये हा सामना झाला. इंग्लंडने या मॅचमध्ये टीम इंडियावर एकतर्फी विजय मिळवला. टीम इंडियाने प्रथम बॅटिंग केली. त्यांनी 20 ओव्हरमध्ये 6 बाद 168 धावा केल्या होत्या. इंग्लंडने विजयासाठी दिलेलं 169 धावांच लक्ष्य 16 व्या ओव्हरमध्ये आरामात पार केलं. ग्रुप 2 मध्ये टीम इंडियाने फक्त दक्षिण आफ्रिकेविरुद्धचा सामना गमावला होता. या ग्रुपमध्ये टीम इंडिया 8 पॉइंटसह टॉपवर होती. पण आज नॉकआऊट मॅचमध्ये टीम इंडिया ढेपाळली. मेलबर्नवर आता पाकिस्तान आणि इंग्लंडमध्ये रविवारी फायनल होईल.
भारत vs इंग्लंड लाइव्ह स्कोर: इंग्लंडने टी 20 वर्ल्ड कपच्या फायनलमध्ये प्रवेश केला आहे. भारताचा त्यांनी अत्यंत दारुण पराभव केला. एकही विकेट न गमावता एकतर्फी विजय मिळवला. इंग्लंडकडून एलेक्स हेल्सने 47 चेंडूत नाबाद 86 धावा फटकावल्या. कॅप्टन जोस बटलरने 49 चेंडूत नाबाद 80 धावा फटकावल्या. इंग्लंडने चार ओव्हर आणि 10 विकेट राखून दणदणीत विजय मिळवला.
भारत vs इंग्लंड लाइव्ह स्कोर: 13 ओव्हर्सचा खेळ पूर्ण झाला आहे. इंग्लंडची टीम वेगाने विजयाच्या दिशेने वाटचाल करतेय. त्यांच्या बिनबाद 140 धावा झाल्या आहेत. जोस बटलर 56 आणि एलेक्स हेल्स 80 धावांवर खेळतोय.
भारत vs इंग्लंड लाइव्ह स्कोर: 12 ओव्हर्सचा खेळ पूर्ण झाला आहे. इंग्लंडची टीम वेगाने विजयाच्या दिशेने वाटचाल करतेय. त्यांच्या बिनबाद 123 धावा झाल्या आहेत. जोस बटलर 42 आणि एलेक्स हेल्स 77 धावांवर खेळतोय.
भारत vs इंग्लंड लाइव्ह स्कोर: 10 ओव्हर्सचा खेळ पूर्ण झाला आहे. इंग्लंडची टीम वेगाने विजयाच्या दिशेने वाटचाल करतेय. त्यांच्या बिनबाद 98 धावा झाल्या आहेत. जोस बटलर 37 आणि एलेक्स हेल्स 57 धावांवर खेळतोय.
भारत vs इंग्लंड लाइव्ह स्कोर: एलेक्स हेल्सने हाफसेंच्युरी झळकावली आहे. त्याने 28 चेंडूत नाबाद 50 धावा केल्या. यात 1 चौकार आणि 5 षटकार आहेत. 8 ओव्हर्समध्ये इंग्लंडच्या बिनबाद 84 धावा झाल्या आहेत.
भारत vs इंग्लंड लाइव्ह स्कोर: 7 ओव्हर्समध्ये इंग्लंडच्या बिनबाद 75 धावा झाल्या आहेत. टीम इंडियाला इंग्लंडची पहिली विकेट कधी मिळणार?
भारत vs इंग्लंड लाइव्ह स्कोर: पावरप्लेमध्ये इंग्लंडच्या ओपनर्सनी भारतीय गोलंदाजांना धुतलं. 6 ओव्हर्सचा खेळ पूर्ण झालाय. इंग्लंडच्या बिनबाद 63 धावा झाल्या आहेत. जोस बटलर 28 आणि एलेक्स हेल्स 33 धावांवर खेळतोय.
भारत vs इंग्लंड लाइव्ह स्कोर: विकेट मिळवण्यासाठी टीम इंडियाच्या गोलंदाजांचा संघर्ष सुरु आहे. 4 ओव्हर अखेरीस इंग्लंडच्या बिनबाद 41 धावा झाल्या आहेत.
भारत vs इंग्लंड लाइव्ह स्कोर: 3 ओव्हर्समध्ये इंग्लंडच्या बिनबाद 33 धावा झाल्या आहेत. एलेक्स हेल्सनने भुवनेश्वरला षटकार मारला. तो 13 आणि बटलर 18 धावांवर खेळतोय.
भारत vs इंग्लंड लाइव्ह स्कोर: अर्शदीप सिंहने दुसरी ओव्हर टाकली. इंग्लंडच्या बिनबाद 21 धावा झाल्या आहेत. जोस बटलर 17 आणि एलेक्स हेल्स 2 ही जोडी मैदानात आहे.
जोस बटलर, अॅलेक्स हेल्स मैदानात
पहिल्या ओव्हरमध्ये जोस बटलरटचे दोन चौकार
एका ओव्हरमध्ये इंग्लंड टीमची धावसंख्या 13
भुवनेश्वर कुमार टाकणार पहिली ओव्हर
भारत vs इंग्लंड लाइव्ह स्कोर: टीम इंडियाकडून आज हार्दिक पंड्याने दमदार खेळ दाखवला. त्याने 33 चेंडूत 63 धावा फटकावल्या. या खेळीत त्याने 4 चौकार, 5 सिक्स मारले. भारताने 20 ओव्हर्समध्ये 6 बाद 168 धावा केल्या आहेत.
भारत vs इंग्लंड लाइव्ह स्कोर: 19 व्या ओव्हरमध्ये हार्दिक पंड्याने सॅम करनला धुतलं. भारताच्या 19 ओव्हरमध्ये 4 बाद 156 धावा झाल्या आहेत. हार्दिक पंड्या 52 धावांवर खेळतोय.
भारत vs इंग्लंड लाइव्ह स्कोर: ख्रिस जॉर्डनने 18 वी ओव्हर टाकली. हार्दिक पंड्याने पहिल्या दोन चेंडूंवर 2 सिक्स मारले. विराट कोहलीने या ओव्हरमध्ये हाफसेंच्युरी पूर्ण केली. विराट कोहली हाफसेंच्युरीनंतर लगेच आऊट झाला. त्याने 40 चेंडूत 50 धावा केल्या. त्याने चार चौकार, एक षटकार लगावला. 18 ओव्हर अखेरीस भारताच्या 4 बाद 136 धावा झाल्या आहेत.
भारत vs इंग्लंड लाइव्ह स्कोर: 16 ओव्हर्समध्ये भारताच्या 3 बाद 110 धावा झाल्या आहेत. विराट कोहली 48 आणि हार्दिक पंड्या 13 धावांवर खेळतोय.
भारत vs इंग्लंड लाइव्ह स्कोर: 15 ओव्हर्सचा खेळ पूर्ण झाला आहे. भारताला मोठी धावसंख्या उभारण्यासाठी वेगाने धावा फटकावाव्या लागतील. भारताच्या 3 बाद 100 धावा झाल्या आहेत. विराट कोहली आणि हार्दिक पंड्याची जोडी मैदानात आहे.
भारत vs इंग्लंड लाइव्ह स्कोर: 14 ओव्हर्सचा खेळ पूर्ण झाला असून भारताच्या 3 बाद 89 धावा झाल्या आहेत. हार्दिक पंड्या 4 आणि विराट कोहली 38 धावांवर खेळतोय.
भारत vs इंग्लंड लाइव्ह स्कोर: भारताला मोठा झटका बसला आहे. भरवशाचा फलंदाज सूर्यकुमार यादव OUT झाला आहे. त्याने 10 चेंडूत 14 रन्स केल्या. यात एक चौकार आणि एक षटकार आहे. राशिदच्या गोलंदाजीवर त्याने सॉल्टकडे सोपा झेल दिला.
भारत vs इंग्लंड लाइव्ह स्कोर: बेन स्टोक्सच्या 11 व्य ओव्हरमध्ये सूर्यकुमार यादवने एक षटकार आणि चौकार लगावला. भारताच्या दोन बाद 74 धावा झाल्या आहेत.
10 ओव्हरमध्ये भारताच्या 2 बाद 62 धावा झाल्या आहेत. विराट कोहली 26 आणि सूर्यकुमार 3 धावांवर खेळतोय.
रोहित शर्माच्या रुपाने भारताला दुसरा झटका बसला आहे. ख्रिस जॉर्डनला फटकावण्याच्या नादात रोहितने सॅम करनकडे झेल दिला. रोहितने 28 चेंडूत 27 धावा केल्या. यात 4 चौकार होते. 9 ओव्हरमध्ये भारताच्या 2 बाद 57 धावा झाल्या आहेत,
भारताच्या 8 ओव्हर्समध्ये एक बाद 51 धावा झाल्या आहेत. रोहित-विराटची जोडी जमली आहे.
पावरप्लेमध्ये भारताने सावध सुरुवात केली आहे. भारताच्या एक बाद 38 धावा झाल्या आहेत. रोहित शर्मा 20, विराट कोहली 12 धावांवर खेळतोय. पावरप्लेमध्ये एकूण चार चौकार आणि एक षटकार मारला.
पाच ओव्हरमध्ये भारताच्या एक बाद 31 धावा झाल्या आहेत. सॅम करनला या ओव्हरमध्ये रोहितने दोन चौकार मारले.
चौथी ओव्हर टाकणाऱ्या ख्रिस वोक्सला या ओव्हरमध्ये विराट कोहलीने कव्हर्समध्ये शानदार सिक्स मारला. 4 ओव्हरमध्ये भारताच्या एक बाद 21 धावा झाल्या आहेत.
सॅम करनने तिसरी ओव्हर टाकली. या ओव्हरमध्ये फक्त एक रन्स निघाला. विराट कोहली (4) आणि रोहित शर्माची (2) जोडी मैदानात आहे.
आदित्य ठाकरे उद्या नांदेडमध्ये भारत जोडो यात्रेत सहभागी होणार
मातोश्रीवरील पत्रकार परिषदेत बोलताना आदित्य ठाकरेंची माहिती
उद्या दुपारी मी नांदेडमध्ये पोहोचणार आणि राहुल गांधींसोबत चालणार- आदित्य ठाकरे
भारताला केएल राहुलच्या रुपाने पहिला झटका बसला आहे. इंग्लंडकडून दुसरी ओव्हर टाकणाऱ्या ख्रिस वोक्सने राहुलला बाद केलं. भारताच्या 1 बाद 9 धावा झाल्या आहेत. राहुलने 5 चेंडूत 5 रन्स केल्या. यात एक चौकार होता. 2 ओव्हरमध्ये भारताच्या 10 धावा झाल्या आहेत.
भारत-इंग्लंडच्या सामन्यात पहिल्या ओव्हरमध्ये बिनबाद 6 धावा झाल्या आहेत. इंग्लंडकडून बेन स्टोक्सने पहिली ओव्हर टाकली. रोहित शर्मा आणि केएल राहुलची जोडी मैदानात आहे.
टीम इंडियाने आज आपल्या टीममध्ये एक महत्त्वाचा बदल केलाय. दिनेश कार्तिकच्या जागी ऋषभ पंतचा टीममध्ये समावेश केलाय.
इंग्लंडचा कॅप्टन जोस बटलरने टॉस जिंकून पहिली फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला आहे. इंग्लंडचा प्रमुख गोलंदाज मार्क वुड दुखापतीमुळे या मॅचमध्ये खेळत नाहीय. डेविड मलानही फिटनेसमध्ये अपयशी ठरला. मार्क वुड, डेविड मलानच्या जागी फिल सॉल्ट आणि ख्रिस जॉर्डनचा टीममध्ये समावेश करण्यात आलाय.