मुंबई: भारताचा माजी कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) सलग दुसऱ्या टी 20 सामन्यात फ्लॉप ठरला. त्याने 6 चेंडूत अवघ्या 11 धावा केल्या. विलीच्या गोलंदाजीवर त्याने जेसन रॉयकडे (Jason Roy) झेल दिला. विराटने एक चौकार आणि एक षटकार लगावला. आज इंग्लंडने भारताला विजयासाठी 216 धावांचे टार्गेट दिलं आहे. विराटकडून आज खास इनिंगची अपेक्षा होती. त्याच्या भविष्याच्या दृष्टीने हे दोन सामने खूप महत्त्वाचे होते. कारण आगामी टी 20 वर्ल्ड कपचा (T 20 World cup) विचार करता, निवड समिती याच सीरीजच्या आधारावर वेस्ट इंडिजसाठी संघ निवडणार आहे. म्हणून निवड समितीने वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी वनडे संघ निवडला. पण अजून पाच टी 20 सामन्यांसाठी संघ निवड केलेली नाही. काल विराट कोहली अवघ्या 1 रन्सवर आऊट झाला होता. विराट कोहलीसाठी फॉर्म मध्ये असलेल्या दीपक हुड्डाला संघ व्यवस्थापनाने दुसऱ्या आणि तिसऱ्या सामन्यात संधी दिली नव्हती. पण विराट आज संघाच्या अपेक्षा पूर्ण करु शकला नाही.
आगामी वेस्ट इंडिज विरुद्धच्या टी 20 सीरीजसाठी विराटला संघातून डच्चू मिळण्याची शक्यता आहे. इंग्लंड विरुद्धच्या टी 20 सीरीज मध्ये विराट कोहलीने धावा केल्या नाहीत, तर निवड समितीचे सदस्य अन्य पर्यायांचा शोध सुरु करतील, असं बीसीसीआयच्या एका अधिकाऱ्याच्या हवाल्याने इनसाइड स्पोर्टने वृत्त दिलं होतं. “विराट कोहलीने भारतीय क्रिकेटची सेवा केली आहे. तो उत्तम क्रिकेटपटू आहे, याबद्दल कुठेही दुमत नाही. पण त्याचा खराब फॉर्म चिंतेचा विषय आहे. सिलेक्टर्सना नावाशी नाही, तर फॉर्म मध्ये असलेल्या खेळाडूंना निवडायचं असतं. विराटला लवकराच लवकर धावा कराव्या लागतील. इंग्लंड दौऱ्यात विराटने धावा केल्या नाहीत, तर निवडकर्ते दुसऱ्या पर्यायांचा शोध घेतील” असं सिलेक्शन कमिटीच्या या सदस्याने सांगितलं होतं.
MASSIVE wicket! ?
Scorecard/clips: https://t.co/AlPm6qHnwj
??????? #ENGvIND ?? | @david_willey pic.twitter.com/mXjiMb9ai8
— England Cricket (@englandcricket) July 10, 2022
“भारतीय संघ व्यवस्थापन शानदार फॉर्म मध्ये असलेल्या खेळाडूंना पुरेशा संधी देणार नाही, तर तो त्यांच्यावर अन्याय ठरेल” असं कपिल देव म्हणाले. “कसोटी क्रिकेट मधील दुसरा सर्वश्रेष्ठ गोलंदाज अश्विनला तुम्ही संघाबाहेर बसवू शकता, मग जागतिक क्रिकेट मधील नंबर 1 खेळाडू सुद्धा बाहेर बसू शकतो” असं कपिल देव म्हणाले. ते एका चॅनलवर बोलत होते.