IND vs ENG | रांची टेस्टच्या पहिल्या दिवशी जो रुटने नाबाद शतक झळकावलं. त्या बळावर इंग्लंडने 302 धावा केल्या. लंचला इंग्लंडची 5 बाद 112 अशी स्थिती होती. पण त्यानंतरच्या दोन सेशनमध्ये इंग्लंडच्या टीमने भारतावर पलटवार केला. पहिल्या दिवसाच्या खेळात फक्त जो रुटच चमकला नाही, तर पहिला कसोटी सामना खेळणारा वेगवान गोलंदाज आकाश दीपने आपली क्षमता दाखवली. आकाश दीपने पहिल्या सेशनमध्ये कमालीची गोलंदाजी केली. त्याने इंग्लंडचे तीन विकेट काढले. चांगली गोलंदाजी करुन आकाश दीपला रांची कसोटीत एका गोष्टीच खूप वाईट वाटलं. त्या बद्दल दिवसाचा खेळ संपल्यानंतर तो व्यक्त झाला.
“कारकिर्दीतील पहिला कसोटी सामना खेळण्याआधी मी थोडा नर्वस होतो. कोच बरोबर बोलल्यानंतर माझ्यात आत्मविश्वास आला” असं आकाश दीपने सांगितलं. “प्रत्येक सामन्याला मी शेवटचा सामना मानून खेळतो. त्यामुळे चांगली गोलंदाजी करायला प्रेरणा मिळते” असं आकाश दीप म्हणाला. सामना सुरु होण्याआधी तो जसप्रीत बुमराहशी बोललो होतो. त्याने आकाश दीपला लेंग्थ खेचण्याचा सल्ला दिला होता. आकाशने सुद्धा मैदानात तेच केलं.
Drama on debut for Akash Deep! 🤯😓
A wicket denied by the dreaded No-ball hooter🚨#IDFCFirstBankTestSeries #BazBowled #INDvENG #JioCinemaSports pic.twitter.com/uQ3jVnTQgW
— JioCinema (@JioCinema) February 23, 2024
आकाश दीप देवाजवळ काय प्रार्थना करत होता?
आकाश दीपने इंग्लंडचा ओपनर जॅक क्राऊलीला शानदार चेंडूवर बोल्ड केलं होतं. पण तो चेंडू नो बॉल ठरला. या बद्दल आकाश दीपला विचारल तेव्हा तो म्हणाला की, “असं झाल्यानंतर मला खूप वाईट वाटलं. ही चूक टीमच्या पराभवाला कारण ठरु नये, अशी मी देवाजवळ प्रार्थना करत होतो” चांगली बाब म्हणजे आकाश दीपनेच क्राऊलीचा विकेट काढला. ऑली पोप आणि बेन डकेटचा विकेट सुद्धा काढला.