IND vs ENG Test: एजबॅस्टन कसोटी जिंकून इंग्लंडने मालिकेत 2-2 अशी बरोबर साधली आहे. जॉनी बेयरस्टो (Jonny Bairstow) आणि ज्यो रुट (Joe Root) इंग्लंडच्या विजयाचे शिल्पकार ठरले. इंग्लंडने अत्यंत कठीण वाटणारा विजय सहज साध्य केला. भारताने विजयासाठी दिलेलं 378 धावांच लक्ष्य इंग्लंडने (IND vs ENG) तीन विकेट गमावून पार केलं. इंग्लंडला आज अखेरच्या दिवशी विजयासाठी 119 धावांची गरज होती. भारतीय गोलंदाज सकाळच्या सत्रात काहीतरी चमत्कार करतील, असं वाटलं होतं. पण चौथ्या दिवसाप्रमाणे आजही भारतीय गोलंदाजांनी मारच खाल्ला. रुट-बेयरस्टो जोडी समोर ते हतबल दिसले. मागच्यावर्षी कोविडमुळे पाचवी कसोटी रद्द झाली होती. तो सामना आता खेळवण्यात आला. भारताकडे मालिकेत 2-1 अशी आघाडी होती. भारताला तब्बल 15 वर्षातनंतर इंग्लंडमध्ये मालिका विजयाची संधी होती. पण भारताने ही संधी दवडली.
एजबॅस्टन कसोटी जिंकून इंग्लंडने मालिकेत 2-2 अशी बरोबर साधली आहे. जॉनी बेयरस्टो (114) आणि ज्यो रुट (142) इंग्लंडच्या विजयाचे शिल्पकार ठरले. इंग्लंडने अत्यंत कठीण वाटणारा विजय सहज साध्य केला. भारताने विजयासाठी दिलेलं 378 धावांच लक्ष्य इंग्लंडने तीन विकेट गमावून पार केलं.
ज्यो रुट पाठोपाठ बेयरस्टोने शानदार शतक झळकावलं आहे. इंग्लंडच्या तीन बाद 357 धावा झाल्या आहेत. त्यांना विजयासाठी फक्त 21 धावांची गरज आहे.
इंग्लंडचा अव्वल फलंदाज ज्यो रुटने एजबॅस्टन कसोटीत शानदार शतक झळकावलं आहे. तो 108 धावांवर खेळतोय. बेयरस्टो 92 धावांवर आहे. इंग्लंडला विजयासाठी 57 धावांची गरज आहे.
ज्यो रुट आणि जॉनी बेयरस्टोने 200 धावांची भागीदारी पूर्ण झाली आहे. इंग्लंडचा प्रवास विजयाच्या दिशेने सुरु आहे.
64 षटकात इंग्लंडच्या तीन बाद 298 धावा झाल्या आहेत. रुट 87 आणि बेयरस्टो 92 धावांवर खेळतोय. इंग्लंडला विजयासाठी 80 धावांची गरज आहे.
62 षटकात इंग्लंडच्या तीन बाद 288 धावा झाल्या आहेत. विजयासाठी त्यांना 90 धावांची आवश्यकता आहे.
60 षटकात इंग्लंडच्या तीन बाद 277 धावा झाल्या आहेत. जॉनी बेयरस्टो आणि रुट अगदी सहजतेने बुमरा आणि शमीची गोलंदाजी खेळून काढतायत. इंग्लंडला विजयासाठी 101 धावांची गरज आहे.
पाचव्या दिवसाच्या खेळाला सुरुवात झाली असून इंग्लंडच्या 58.3 षटकात 3 बाद 263 धावा झाल्या आहेत. ज्यो रुट 77 आणि जॉनी बेयरस्टो 75 धावांवर खेळतोय.
भारताने इंग्लंडला विजयासाठी 378 धावांचं लक्ष्य दिलं आहे. चौथ्या दिवस अखेर इंग्लंडच्या तीन बाद 259 धावा झाल्या होत्या. रुट 76 आणि बेयरस्टो 72 धावांवर खेळतोय.