मुंबई: इंग्लंड क्रिकेट बोर्डाने (ECB) एजबॅस्टन कसोटीसाठी संघाची घोषणा केली आहे. इंग्लंडने भारताविरुद्धची (IND vs ENG) सीरीज वाचवण्यासाठी पाच नव्या खेळाडूंना संधी दिली आहे. हे पाचही खेळाडू याच सीरीजच्या मागच्या चार सामन्यांमध्ये इंग्लंड संघाचा भाग नव्हते. यजमानांनी जवळपास आपला संघच बदलला आहे. मागच्यावर्षी या सीरीजमध्ये चार कसोटी सामने खेळले गेले. भारतीय संघ मालिकेत 2-1 ने आघाडीवर आहे. इंग्लंडला मालिका वाचवायची असेल, तर कुठल्याही परिस्थितीत इंग्लंडला एजबॅस्टन कसोटी (Test) जिंकावीच लागेल. अन्यथा भारत 15 वर्षानंतर इंग्लंडमध्ये मालिका विजय मिळवू शकतो. भारत आणि इंग्लंडमध्ये उद्यापासून पाचवा कसोटी सामना सुरु होणार आहे. यात कोण पास होणार? आणि कोण फेल? ते लवकरच कळेल. हा मालिकेतील अखेरचा कसोटी सामना आहे. इंग्लंड संघाचा कोच, कॅप्टन सगळं बदललय. भारतीय गोटातही काही वेगळी स्थिती नाही.
मागच्यावर्षी ऑगस्ट महिन्यात भारतीय संघ इंग्लंड दौऱ्यावर गेला होता. त्यावेळी पाच पैकी चार सामने खेळले गेले. कोविडमुळे अखेरचा कसोटी सामना रद्द झाला होता. जॅक लीच, पॉट्स, सॅम बिलिंग्स, बेन स्टोक्स, एलेक्स लीस हे खेळाडू त्या सीरीजचा भाग नव्हते. या सगळ्यांना अखेरच्या निर्णायक कसोटीसाठी संघात स्थान देण्यात आलं आहे.
न्यूझीलंड विरुद्ध अखेरच्या कसोटी सामन्यात जो संघ मैदानावर उतरला होता, त्यात फक्त एक बदल करण्यात आला आहे. जॅमी ओवर्टनच्या जागी वेगवान गोलंदाज जेम्स अँडरसनचचा संघात समावेश झाला आहे. भारताने अजूनपर्यंत एकमेव कसोटी सामन्यासाठी संघाची प्लेइंग इलेवनची घोषणा केलेली नाही.
इंग्लंडचा संघ – जॅक लीच, पॉट्स, सॅम बिलिंग्स, बेन स्टोक्स, एलेक्स लीस, जॅक क्रॉले, ऑली पॉप, ज्यो रुट, जॉनी बेयरस्टो, स्टुअर्ट ब्रॉड आणि जेम्स अँडरसन