मुंबई: मोहम्मद शमी (Mohammed Shami) भारताचा स्टार गोलंदाज आहे. एजबॅस्टन कसोटीच्या दुसऱ्या आणि तिसऱ्यादिवशी त्याने आपल्या धारदार गोलंदाजीने इंग्लंडच्या संघाला (England Team) चांगलच अडचणीत आणलं. मोहम्मद शमीला फक्त दोन विकेट मिळाल्या. पण त्याच्या गोलंदाजीचा सामना करणं, इंग्लिश फलंदाजांसाठी आव्हानात्मक होतं. मोहम्मद शमीने आपल्या गोलंदाजीने भारतीय क्रिकेट चाहत्यांना (Indian Cricket Fans) खूप प्रभावित केलं. पण त्याचवेळी त्याच्या बुटांकडे पाहून आश्चर्य सुद्धा वाटलं. मोहम्मद शमीच्या बुटाच्या पुढच्या बाजूला छिद्र पडलं होतं. गोलंदाजी करताना ते दिसल होतं. बुटांची ती स्थिती पाहून अनेकांच्या मनात प्रश्न आला. इतके कोट्यावधी रुपये कमावणारा मोहम्मद शमी असे बूट का वापरतो?.
एजबॅस्टन कसोटीच्या तिसऱ्यादिवशी शमी जबरदस्त गोलंदाजी करत होता. पण या दरम्यान त्याला आपले बुट बदलावे लागले. शमीच्या एका पायातला बुट पुढच्या बाजूने फाटला होता. त्यामुळे त्याने बुटांची नवीन जोड मागवली. प्रत्येकाला याच आश्चर्य वाटलं. आधीपासून छिद्र असल्यामुळे शमीचा बुट फाटला.
मोहम्मद शमीच्या दोन्ही बुटांमध्ये नाही, तर फक्त डाव्या पायाच्या बुटांमध्ये छिद्र असते. याचं कारण त्याच्या गोलंदाजीत आहे. मोहम्मद शमी प्रत्येक सामन्यात अशाच प्रकारचे बुट घालून मैदानात उतरतो. ज्यात डाव्या पायाच्या बुटात पुढच्या बाजूला छिद्र असते. शमी असे बूट घालून मैदानात उतरतो, याच कारण आहे त्याची गोलंदाजीची Action. शमी गोलंदाजी करताना चेंडू टाकण्याआधी हवेत झेप घेतो, त्यानंतर क्रीज वर पाऊल टाकतो. लँडिंगच्यावेळी त्याचा डावा पाय नेहमी पुढे असतो. मोहम्मद शमीचा डावा पाय लँड होतो, त्यावेळी अंगठा सुद्धा पुढे येतो. त्यामुळे बुटाच्या अंगठ्याच्या भागात छिद्र केलं जातं. लँडिंगच्यावेळी अंगठ्याला मोकळी जागा मिळावी, यासाठी चे छिद्र केलं जातं.
बुटात अशा प्रकारच छिद्र केल्यामुळे अंगठ्याला मोकळी जागा मिळते. त्यामुळे पायावर अतिरिक्त दबाव येत नाही आणि दुखापतीचा धोका कमी असतो. एकटा शमीच असं करत नाही, तर जागतिक क्रिकेटमधील अनेक गोलंदाज अशा प्रकारचे बुट वापरतात.