मुंबई: टीम इंडियाचा कॅप्टन रोहित शर्मा (Rohit sharma) सध्या क्वारंटाइन आहे. त्याला कोरोना व्हायरसची (Corona virus) लागण झाली आहे. लीसेस्टरशायर विरुद्धच्या सराव सामन्यावेळी त्याला कोरोनाची लागण झाली. भारत 1 जुलैपासून इंग्लंड विरुद्ध (IND vs ENG) शेवटचा पाचवा कसोटी सामना खेळणार आहे. मागच्यावर्षी बाकी राहिलेल्या मालिकेतील हा शेवटचा कसोटी सामना आहे. भारत या कसोटी मालिकेत 2-1 ने आघाडीवर आहे. रोहितची 30 जूनला पुन्हा चाचणी होईल. त्यात त्याचा रिपोर्ट निगेटिव्ह आला, तर तो कसोटी सामना खेळू शकतो. दरम्यान रोहित शर्माची मुलगी समायराने आपल्या वडिलांच्या प्रकृतीबद्दल माहिती दिली आहे. समायराचा हा क्यूट व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होतोय. रोहित काय करतोय? असं समायराला विचारलं. त्यात बाबा रुम मध्ये झोपले असल्याचं तिने सांगितलं.
रोहितला कोरोना झाल्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून मयंक अग्रवालला इंग्लंडला रवाना करण्यात आलं. कारण रोहितचा टेस्ट रिपोर्ट अनुकूल आला नाही, तर सलामीच्या जागेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. कारण केएल राहुलही दुखापतीमुळे खेळत नाहीय. सध्या शुभमन गिल सलामीसाठी फिट आहे. आता रोहितच्या रिपोर्टवर सर्व काही अवलंबून आहे.
#RohitSharma Daughter #samaira Today at #Leicester How cute she is ?? MY FATHER IS TAKING REST IN THE ROOM GOT #covidpositive @ritssajdeh @ImRo45 #ENGvIND @ITGDsports pic.twitter.com/Tbpu0HSUIQ
— Krishna sai ✊?? (@Krishna19348905) June 27, 2022
बर्मिंगहॅम येथे होणाऱ्या या पाचव्या कसोटीआधी इंग्लंडचा कॅप्टन बेन स्टोक्सने भारतीय संघाला इशारा दिला आहे. एजबॅस्टनमध्ये भारतीय संघ एका वेगळ्या इंग्लंडचा सामना करेल, असं स्टोक्सने म्हटलं आहे. इंग्लंडच्या फलंदाजीत तुम्हाला आक्रमकता दिसेल, असं स्टोक्सने सांगितलं. नुकत्यात संपलेल्या कसोटी मालिकेत बेन स्टोक्सच्या नेतृत्वाखाली इंग्लंडने न्यूझीलंडला 3-0 अशी धुळ चारली.
भारतीय कसोटी संघ: रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, हनुमा विहारी, चेतेश्वर पुजारा, ऋषभ पंत (विकेटकीपर), केएस भरत (विकेटकीपर), रवींद्र जडेजा, रविचंद्रन अश्विन, शार्दुल ठाकूर, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, उमेश यादव, प्रसिद्ध कृष्णा आणि मयंक अग्रवाल.