T20 World Cup 2024: टीम इंडियासाठी सेमीफायनलपूर्वी गुड न्यूज, ‘पनौती’ पासून रोहित सेनेची सुटका

| Updated on: Jun 26, 2024 | 9:05 AM

T20 World Cup 2024: भारत आणि इंग्लंड यांच्यातील T20 विश्वचषक 2024 च्या उपांत्य फेरीतही पावसाची शक्यता आहे. या सामन्यात पाऊस पडला तर राखीव दिवस ठेवण्यात आलेला नाही. म्हणजेच पावसामुळे सामना रद्द झाला किंवा अनिर्णित राहिला तर टीम इंडियाला थेट फायनलमध्ये प्रवेश मिळणार आहे.

T20 World Cup 2024: टीम इंडियासाठी सेमीफायनलपूर्वी गुड न्यूज, पनौती पासून रोहित सेनेची सुटका
team india
Image Credit source: jay shah x account
Follow us on

टी20 वर्ल्ड कप 2024 च्या उपांत्यफेरीचे चित्र स्पष्ट झाले आहे. भारत आणि इंग्लड यांच्या दरम्यान 27 जून रोजी गयाना येथील स्टेडियमवर उपांत्यफेरीचा सामना होणार आहे. दुसरा उपांत्यफेरीचा सामना अफगाणिस्तान आणि दक्षिण आफ्रिकेत होणार आहे. त्यानंतर 29 जून रोजी दोन्ही उपांत्यफेरीतील विजय संघात अंतिम सामना होणार आहे. या सामन्यांसाठी अंपायरची नियुक्ती केले गेले आहे.

भारताच्या सामन्यात कोण अंपायर

न्यूजीलँडमधील क्रिस गफ्फनी, ऑस्ट्रेलियामधील रॉडनी टकर भारत आणि इंग्लंड सामन्यात अंपायर असणार आहे. टी20 विश्व कपच्या दुसऱ्या उपांत्यफेरीच्या लढतीत हे दोन्ही मैदानात अंपायर असणार आहे. तसेच जोएल विल्सन टीव्ही अंपायर असणार आहे. तसेच पॉल रायफल चौथे अंपायर असतील. न्यूझीलंड संघातील जेफरी क्रो मॅच रेफरी असणार आहे.

दक्षिण आफ्रिका आणि अफगाणिस्तान दरम्यान होणाऱ्या सामन्यात इंग्लंडचे रिचर्ड इलिंगवर्थ आणि भारताचे नितिन मेनन त्रिनिदाद मैदानातील अंपायर असणार आहे. तसेच वेस्ट इंडीजचे रिची रिचर्डसन मॅच रेफरी असणार आहेत.

हे सुद्धा वाचा

अनलकी अंपायरपासून भारतीय संघाची सुटका

रिचर्ड कॅटलबोरो आयसीसीमधील टॉप अंपायर आहेत. परंतु टीम इंडियासाठी ते नेहमी अनलकी सिद्ध झाले आहे. 2023 वर्ल्ड कप फायनलमध्ये रिचर्ड कॅटलबोरो अंपायर होते. त्यापूर्वी कॅटलबोरो मैदानात 2019 मध्ये झालेल्या उपांत्यफेरीत ते मैदानी अंपायर होते. 2017 मध्ये चॅम्पियन ट्रॉफीत अंतिम सामन्यात तेच अंपयार होते. 2014 टी20 वर्ल्ड कपमध्ये अंतिम सामन्यात कॅटलबोरो अंपायर होते. यामुळे भारतासाठी ते अनलकी राहिले आहे. आता भारताच्या सामन्यात ते नसणार आहे.

पाऊस झाल्यास भारत थेट अंतिम फेरीत

भारत आणि इंग्लंड यांच्यातील T20 विश्वचषक 2024 च्या उपांत्य फेरीतही पावसाची शक्यता आहे. या सामन्यात पाऊस पडला तर राखीव दिवस ठेवण्यात आलेला नाही. म्हणजेच पावसामुळे सामना रद्द झाला किंवा अनिर्णित राहिला तर टीम इंडियाला थेट फायनलमध्ये प्रवेश मिळणार आहे.