Ind vs Eng: शार्दूलच्या अर्धशतकी खेळीने इंग्लंडचा ‘डाव’ बिघडवला; आता सहकाऱ्यांनी दिलं ‘हे’ खास निकनेम!

| Updated on: Sep 03, 2021 | 3:28 PM

इंग्लंडविरुद्ध सुरू असलेल्या ओव्हल कसोटी सामन्यात भारताच्या टॉपच्या फलंदाजांनी नांगी टाकल्यानंतर गोलंदाज शार्दूल ठाकूर पुन्हा एकदा संकटमोचक म्हणून धावून आला आहे. (India vs england shardul thakur elated after breaking ian botham record)

Ind vs Eng: शार्दूलच्या अर्धशतकी खेळीने इंग्लंडचा डाव बिघडवला; आता सहकाऱ्यांनी दिलं हे खास निकनेम!
shardul thakur
Follow us on

लंडन: इंग्लंडविरुद्ध सुरू असलेल्या ओव्हल कसोटी सामन्यात भारताच्या टॉपच्या फलंदाजांनी नांगी टाकल्यानंतर गोलंदाज शार्दूल ठाकूर पुन्हा एकदा संकटमोचक म्हणून धावून आला आहे. शार्दूलने मैदानावर तळ ठोकून टिच्चून फलंदाजी करत इंग्लंडच्या गोलंदाजांची अक्षरश: पिसे काढली. शार्दूलने 36 चेंडूत 7 चौकार आणि तीन षटकार ठोकत दमदार 57 धावा कुटल्या. ऐनवेळी टीम इंडियासाठी धावून आलेल्या शार्दूलचं कौतुक तर होतच आहे, पण त्याला संघातील सहकारी चिडवतानाही दिसत आहेत. (India vs england shardul thakur elated after breaking ian botham record)

या अर्धशतकी खेळीबरोबरच शार्दूलने महान खेळाडू इयान बॉथमला मागे टाकत नवा विक्रम प्रस्थापित केला आहे. शार्दूलच्या या कामगिरीमुळे टीम इंडिया जबरदस्त खूश आहे. या कामगिरीनंतर संघातील सहकाऱ्यांनी शार्दूलला खास नाव दिले असून या नावाने त्याला चिडवणेही सुरू केलं आहे.

अटॅकिंग मूडमध्ये खेळायचं हे ठरवलंच होतं

या दमदार अर्धशतकी खेळीनंतर आता शार्दूलला त्याचे सहकारी ड्रेसिंग रुममध्ये बीफी म्हणून चिडवत आहेत. इयान बॉथम यांचं रेकॉर्ड मी मोडलंय हे मला माहीत नव्हतं. संघासाठी आवश्यक धावा करणं नेहमीच चांगलं वाटतं. मात्र, आता सर्व खेळाडू मला बीफी या निकनेमने हाक मारत असून चिडवत आहेत. एवढ्या महान खेळाडूशी आपली तुलना होते हेच मोठं गंमतीशीर वाटतंय, असं शार्दूल म्हणाला. ऋषभ पंत बाद झाल्यावर अटॅकिंग मूडमध्येच फलंदाजी करायची असं ठरवलं होतं, असंही त्याने सांगितलं.

या खेळीमागे दडलंय काय?

जेव्हा ऋषभ बाद झाला तेव्हा आपल्याला असंच खेळावं लागेल हे मी जाणून होतो. अशावेळी दोन गोष्टी करायच्या असतात. एक म्हणजे संयम ठेवत सहकाऱ्यावर विश्वास ठेवून धावा काढू शकता. किंवा त्याला हिट करू शकता. मात्र, दिवस अखेरपर्यंत तुम्हाला धावा कराव्याच लागतात. परंतु, धावा काढण्याची कोणतीही अशी योग्य पद्धत नाही, असं माझं मत आहे. मी एकदम कनेक्ट होऊ शकेल असाच आजचा दिवस होता. त्यामुळेच मी धावा कुटण्यावर भर दिला, असं त्याने स्पष्ट केलं.

खराब सुरुवात

टीम इंडियाने दिलेल्या 191 धावांचा पाठलाग करताना इंग्लंडने पहिल्या दिवशीचा खेळ समाप्त होईपर्यंत पहिल्या डावात 3 गडांच्या बदल्यात 53 धावा केल्या होत्या. डेव्हिड मलानने 26 आणि क्रॅग ओवर्टन एका धावेर खेळत आहेत. पहिल्या डावाच्या आधारे इंग्लंडचा संघ 138 धावाने पिछाडीवर होता. जसप्रीत बुमराहने केवळ दोन बळी मिळविले आहेत. इंग्लंडचा कर्णधार जो रुटला उमेश यादवने बाद केलं आहे. याआधी टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीने पहिल्या डावात अर्ध शतकी खेळी करून भारताचा डाव सावरला होता. त्यानंतर भारतीय फलंदाजांची बाद होण्याची रांगच लागली होती. टीम इंडियाचा स्कोअर 150च्या आसपास गेला तेव्हा शार्दूल मैदानावर आला आणि त्याने संकटमोचकाची कामगिरी करत दमदार अर्धशतकी खेळी खेळली होती. (India vs england shardul thakur elated after breaking ian botham record)

 

संबंधित बातम्या:

IND vs ENG : फलंदाजी सुधारण्यासाठी अजिंक्य रहाणेला मिळाला ‘हा’ महत्वाचा सल्ला

जखमी गुडघ्यातून भळाभळा रक्त वाहत असतानाही तो गोलंदाजी करत राहिला, जाँबाज अँडरसनचं नेटकऱ्यांकडून कौतुक

India Vs England 2021 : विराट कोहलीकडून ‘त्या’ चुकीची वारंवार पुनरावृत्ती, नेमकं काय घडलं?

(India vs england shardul thakur elated after breaking ian botham record)