मुंबई: एजबॅस्टन कसोटीच्या (edgbaston test) दुसऱ्याडावात पुन्हा एकदा श्रेयस अय्यर अपयशी ठरला. आज पाचव्या कसोटीचा चौथा दिवस आहे. श्रेयस अय्यर (Shreyas iyer) अगदी सहजतेने इंग्लिश गोलंदाजांच्या जाळ्यात सापडला. पहिल्या डावात त्याने 15 धावा केल्या होत्या. दुसऱ्याडावात तो 19 धावा करुन मॅथ्यू पॉट्सचा बळी ठरला. पुन्हा एकदा श्रेयस अय्यरची कमजोरी उघड झाली. इंग्लंडचे टेस्ट कोच ब्रँडन मॅककलम (brendon mccullum) यांना श्रेयस अय्यरची कमकुवत बाजू ठावूक आहे. त्यांनीच रणनिती आखून अय्यरला फसवलं. 53 व्या षटकात चेतेश्वर पुजारा बाद झाला. त्यानंतर ऋषभ पंतची साथ द्यायला श्रेयस अय्यर मैदानात आला.
Fell into the trap ?
Scorecard/Clips: https://t.co/jKoipF4U01
??????? #ENGvIND ?? pic.twitter.com/qLwRAnJs82
— England Cricket (@englandcricket) July 4, 2022
श्रेयस अय्यर खेळपट्टीवर सेट होत होता. ऋषभ पंत बरोबर संतुलन साधण्याचा प्रयत्न करत होता. त्याने काही चांगले फटके खेळून गोलंदाजांना हैराणही केलं. पण 60 व्या षटकात मॅथ्यू पॉट्सच्या जाळ्यात तो फसला. अय्यरला अडकवण्यासाठी कोच मॅककलम यांनी जाळं विणलं होतं. आयपीएल 2022 मध्ये दोघे एकाच संघात होते. मॅककलम कोलकाता नाइट रायडर्सचे कोचे होते, तर श्रेयस अय्यर टीमचा कॅप्टन. मॅककलम यांना अय्यरची कमजोरी माहित होती. त्यांनी त्याचा फायदा उचलला.
Brendon McCullum straightaway told England to go for the short ball tactic against Shreyas Iyer. pic.twitter.com/rMGluifmMM
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) July 4, 2022
एजबॅस्टन कसोटीत श्रेयस अय्यर क्रीजवर असताना, ब्रँडन मॅककलम ड्रेसिंग रुमच्या बाल्कनती बसले होते. त्यांनी गोलंदाजांना श्रेयस अय्यरला शॉर्ट चेंडू टाकण्याचा इशारा केला. कॅमेऱ्यात ते सांगताना स्पष्टपणे दिसतायत. पॉट्सने लगेच सूचनेच पालन करत शॉर्ट बॉल टाकला. अय्यरने पुल करण्याच्या प्रयत्नात जेम्स अँडरसनकडे सोपा झेल दिला. मागच्या काही सामन्यांमध्ये श्रेयस अय्यरला शॉर्ट चेंडूंचा सामना करणं जमलेलं नाही. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सीरीजमध्ये त्याला याच प्रकारच्या चेंडूने सतावल होतं.