IND vs ENG 1st Test Day 3 Live : पावसामुळे तिसऱ्या सत्राचा खेळ रद्द, इंग्लंडच्या बिनबाद 25 धावा, भारताकडे अद्याप 70 धावांची आघाडी

| Updated on: Aug 06, 2021 | 11:58 PM

India vs England 1st Test Day 3 Live Score: भारतीय संघाने पहिल्या दिवशी इंग्लंडला 183 धावांवर सर्वबाद केल्यानंतर, दुसऱ्या दिवशी 4 बाद 125 पर्यंत मजल मारली होती. त्यानंतर आजच्या दिवशी सलामीवीर के. एल. राहुल आणि रिषभ पंतने भारतीय डावाला सुरुवात केली आहे.

IND vs ENG 1st Test Day 3 Live : पावसामुळे तिसऱ्या सत्राचा खेळ रद्द, इंग्लंडच्या बिनबाद 25 धावा, भारताकडे अद्याप 70 धावांची आघाडी
Follow us on

Ind vs Eng 1st Test, Day 3 : टीम इंडिया विरुद्ध इंग्लंड (India vs England) यांच्यातील पहिला कसोटी सामना नॉटिंगहॅम येथे खेळवला जात आहे. आज सामन्याच्या तिसऱ्या दिवशी इंग्लंडच्या गोलंदाजांनी टिच्चून गोलंदाजी करत भारताचा पहिला डाव 278 धावांमध्ये गुंडाळला आहे. भारताकडून सलामीवीर के. एल. राहुलने सर्वाधिक 84 धावांची खेळी केली. तर रवींद्र जाडेजानेदेखील (56) अर्धशतक झळकावलं. अखेरच्या षटकांमध्ये जसप्रीत बुमराहने फटकेबाजी करत 28 धावांचं योगदान दिलं. तर इंग्लंडकडून ऑली रॉबिन्सनने भारताचे 5 गडी बाद केले. तर जेम्स अँडरसनने 4 गडी बाद केलं. इंग्लंडला पहिल्या डावात 183 धावांत गुंडाळल्यामुळे भारताला 95 धावांची आघाडी मिळाली आहे.

Key Events

पहिला दिवस टीम इंडियाचा

इंग्लंडच्या नॉटिंगहॅममध्ये भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेला सुरुवात झाली आहे. त्यातील पहिल्या सामन्याचा पहिला दिवस बुधवारी (4 ऑगस्ट) पार पडला. या सामन्यात कर्णधार विराट कोहलीच्या नेतृत्त्वाखाली भारतीय संघ इंग्लंडशी दोन हात करत आहे. सामन्यात नाणेफेक जिंकत इंग्लंड संघाने फलंदाजीचा निर्णय घेतला. त्यानंतर भारतीय गोलंदाजांच्या माऱ्यापुढे इंग्लंडचे मातब्बर फलंदाज मैदानावर फार काळ तग धरु शकले नाहीत. अखेर भारतीय गोलंदाजांनी त्यांना 66 षटकात थांबवलं. त्यामुळे इंग्लंडचा पहिला डाव हा 65.4 षटकात 10 बाद 183 धावांवर थांबला. टीम इंडियाचा गोलंदाज जसप्रीत बुमराहने आज सर्वाधिक चार विकेट घेतल्या. त्यापाठोपाठ मोहम्मद शमीने 3 तर शार्दुल ठाकूरने 2 आणि मोहम्मद सिराजने 1 विकेट घेतली.

दुसऱ्या दिवशी पावसाचा खेळ

सामन्याच्या दुसऱ्या दिवशी सुरुवातीला भारतीय सलामीवीरांनी संयमी खेळी केली. सलामीवीर रोहित शर्मा आणि लोकेश राहुल या दोघांनी 97 धावांची सलामी दिली. त्यानंतर मात्र ठराविक अंतराने भारताचे फलंदाज बाद होत गेले. इंग्लंडच्या गोलंदाजांनी भारताची 4 बाद 125 अशी अवस्था केली होती. त्यानंतर लोकेश राहुल आणि रिषभ पंतने भारताचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला. मात्र पावसामुळे दुसऱ्या दिवसातील तिसऱ्या सत्राचा खेळ रद्द करण्यात आला.

LIVE Cricket Score & Updates

The liveblog has ended.
  • 06 Aug 2021 11:22 PM (IST)

    पावसामुळे तिसऱ्या सत्राचा खेळ रद्द, इंग्लंडच्या बिनबाद 25 धावा, भारताकडे अद्याप 70 धावांची आघाडी

    तिसऱ्या सत्राच्या सुरुवातीलाच पावसाने व्यत्यय आणला. त्यानंतर पावसाने थांबण्याचं नाव घेतलं नाही. अखेर तिसऱ्या सत्राचा खेळ रद्द करण्यात आला आहे.

  • 06 Aug 2021 10:06 PM (IST)

    इंग्लंडच्या 11 षटकात 25 धावा, पावसामुळे सामन्यात पुन्हा व्यत्यय

    पुन्हा एकदा पावसामुळे आजच्या दिवसाचा खेळ थांबवण्यात आला आहे. तत्पूर्वी 11.1 षटकात इंग्लंडच्या सलामीवीरांनी 25 धावा जमवल्या आहेत.


  • 06 Aug 2021 08:58 PM (IST)

    दुसऱ्या सत्राचा खेळ संपुष्टात, 6 षटकात इंग्लंडच्या बिनबाद 11 धावा

    दुसऱ्या सत्रात इंग्लंडला 6 षटकं फलंदाजी करता आली. यात इंग्लंडच्या सलामीवीरांनी बिनबाद 11 धावा जमवल्या आहेत.

  • 06 Aug 2021 08:35 PM (IST)

    इंग्लंडचा दुसरा डाव सुरु, सलामीवीर बर्न्स-सिब्ले जोडी मैदानात

    भारताचा डाव 278 धावांमध्ये गुंडाळल्यानंतर इंग्लंडच्या दुसऱ्या डावाला सुरुवात झाली आहे. सलामीवीर बर्न्स-सिब्ले जोडी मैदानात उतरली आहे.

  • 06 Aug 2021 08:22 PM (IST)

    भारताचा अखेरचा फलंदाज बाद, डाव 278 धावांवर संपुष्टात

    जसप्रीत बुमराहच्या रुपात भारताने आपला शेवटचा गडी गमावला आहे. ओली रॉबिन्सनने बुमराहला 28 धावांवर असताना स्टुअर्ट ब्रॉडकरवी जसप्रीत बुमराहच्या रुपात भारताने आपला शेवटचा गडी गमावला आहे. ओली रॉबिन्सनने बुमराहला 28 धावांवर असताना स्टुअर्ट ब्रॉडकरवी झेलबाद केलं.
    झेलबाद केलं.

  • 06 Aug 2021 08:05 PM (IST)

    जसप्रीत बुमराहचा हल्लाबोल, सॅम करनच्या एकाच षटकात दोन चौकार आणि षटकार

    जसप्रीत बुमराहने सॅम करनच्या गोलंदाजीवर हल्लाबोल केला आहे. 82 व्या षटकात त्याने पहिल्या चेंडूवर चौकार, दुसऱ्या चेंडूवर षटकार आणि तिसऱ्या चेंडूवर चौकार लगावला. (भारत 263/9)

  • 06 Aug 2021 08:03 PM (IST)

    भारताचा 9 वा गडी माघारी, मोहम्मद शमी 13 धावांवर बाद

    भारताने मोहम्मद शमीच्या रुपात 9 वी विकेट गमावली आहे. शमी 13 धावांवर बाद. ऑली रॉबिन्सनने त्याला त्रिफळाचित केलं. (भारत 232/8)

  • 06 Aug 2021 07:34 PM (IST)

    भारताला आठवा झटका, रवींद्र जाडेजा 56 धावांवर बाद

    भारताने आठवी विकेट गमावली आहे. आक्रमक फलंदाज रवींद्र जाडेजा 56 धावांवर बाद. ऑली रॉबिन्सनने त्याला स्टुअर्ट ब्रॉडकरवी झेलबाद केलं. (भारत 232/8)

  • 06 Aug 2021 07:09 PM (IST)

    भारताचा सातवा गडी माघारी, शार्दुल ठाकूर शून्यावर बाद

    भारताने सातवी विकेट गमावली आहे. अनुभवी गोलंदाज जेम्स अँडरसनने शार्दुल ठाकूरला (0) आपल्या जाळ्यात अडकवलं. अँडरसनने ठाकूरला जो रुटकरवी झेलबाद केलं. (भारत 205/7)

  • 06 Aug 2021 07:04 PM (IST)

    भारताला मोठा झटका, सलामीवीर लोकेश राहुल 84 धावांवर बाद

    एका बाजूने ठराविक अंतराने फलंदाज बाद होत असताना सुरुवातीपासून खेळपट्टीवर तग धरुन असलेला सलामीवीर लोकेश राहुल माघारी परतला आहे. जेम्स अँडरसनने राहुलला 84 धावांवर असताना जोस बटलरकरवी झेलबाद केलं. (भारत 205/6)

  • 06 Aug 2021 06:51 PM (IST)

    लंच ब्रेकनंतर खेळाला पुन्हा सुरुवात

    भारत आणि इंग्लंड यांच्यातील पहिल्या कसोटीचा तिसरा दिवस आहे. लंच ब्रेकनंतर खेळाला पुन्हा सुरुवात झाली असून भारताचे रवींद्र जाडेजा आणि केएल राहुल मैदानात आहेत.

  • 06 Aug 2021 06:08 PM (IST)

    भारताची इंग्लंडवर आघाडी

    भारताने इंग्लंडला पहिल्या डावात 183 धावांवर सर्वबाद केल्यानंतर फलंदाजीला सुरुवात केली. केएल राहुल आणि रोहित शर्माने 97 धावांची भागिदारी केल्यानंतर शर्मा पाठोपाठ एक एक गडी बाद होत गेले. त्यानंतर राहुलने जाडेजासोबत खेळ सावर इंग्लंडवर 8 धावांची आघाडी घेतली आहे.   

  • 06 Aug 2021 04:50 PM (IST)

    ऋषभ पंत बाद

    पाऊस थांबल्यामुळे सामना पुन्हा सुरु करण्यात आला आहे. सामना सुरु होताच काही वेळातच पंतला रॉबिनसनने बाद केलं आहे. जॉनी बेअरस्टोवने पंतचा झेल घेतला आहे.

  • 06 Aug 2021 04:48 PM (IST)

    6 षटकांच नुकसान, सेशनच्या वेळेतही बदल

    पावसामुळे आज दिवशीच्या 6 षटकांच नुकसान झालं आहे. ज्यामुळे आज 92 ओव्हर्सच टाकले जातील तसेच सेशनच्या वेळाही बदलल्या आहेत.  आत पहिलं सेशन भारतीय वेळेनुसार सायंकाली 5.30 च्या जागी 6 ला संपेल. तर शेवटचं सेशन 11 च्या जागी 11.30 ला संपेल.

     

  • 06 Aug 2021 04:24 PM (IST)

    पाऊस थांबल्यास खेळ लवकरत सुरु करणार

    नॉटिंघम येथे सुरु असलेल्या पावसामुळे अजूनही सामना सुरु करण्यात आलेला नाही. नुकत्याच समोर आलेल्या माहितीनुसार पाऊस थांबल्यात 4 वाजून 35 मिनिटांनी सामना पुन्हा सुरु केला जाऊ शकतो.

  • 06 Aug 2021 03:47 PM (IST)

    नॉटिंगहॅममध्ये पुन्हा पावसाचा खेळ, एका षटकानंतर खेळ स्थगित

    आजच्या दिवसाच्या खेळाला सुरुवात झाल्यानंतर अवघ्या 11 चेंडूंचाच खेळ झाला. त्यानंतर पुन्हा एकदा पाऊस सुरु झाल्याने खेळ स्थगित करण्यात आला आहे.

  • 06 Aug 2021 03:37 PM (IST)

    आज अधिक आर्ध्या तासाचा खेळ होणार

    नॉटिंगहॅममध्ये तिसऱ्या दिवसावरही पावसाचं सावट आहे. काल पावसामुळे जवळपास अर्ध्या दिवसाचा खेळ रद्द करण्यात आला होता. त्यामुळे या षटकांच्या नुकसानाची भरपाई करण्यासाठी आता उर्वरित 3 दिवस दररोज 90 ऐवजी 98 षटके खेळवली जातील. त्यामुळे दुसऱ्या आणि तिसऱ्या सत्राची वेळ 15 मिनिटांनी वाढवण्यात आली आहे.