IND vs ENG : भारताचे दिग्गज फलंदाज सुनील गावस्कर, सचिन तेंडुलकर यांनी अनेक रेकॉर्ड आपल्या नावावर केले पण दोघेही कधीच क्रिकेटची पंढरी मानल्या जाणाऱ्या लॉर्ड्स (Lord’s Test) मैदानात शतक ठोकू शकले नाही. सध्या जगातील आणि भारतातील अव्वल क्रमाकांचा फलंदाज असणाऱ्या विराट कोहलीने (Virat Kohli) देखील लॉर्ड्सवर एकही शतक ठोकलेले नाही. दरम्यान आता इंग्लंड विरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात विराटला लॉर्ड्सवर शतक ठोकण्याची संधी चालून आली आहे.
भारत आणि इंग्लंड (India vs England) यांच्यातील पहिला कसोटी सामना अनिर्णीत सुटल्यानंतर आता दुसरा सामना गुरुवारपासून (12 ऑगस्ट) लॉर्ड्स मैदानावर सुरु होणार आहे. पण या मैदानावर भारतीय फलंदाजाचे रेकॉर्ड खास नसल्याने भारतीय संघावर तणाव आहे. त्यात कर्णधार विराट मागील दोन वर्षांपासून एकही शतक ठोकू शकला नसल्याने चिंतेत आणखीच वाढ झाली आहे. विराटने मागील 9 टेस्ट सामन्यात 15 डावांत एकही शतक ठोकलेले नाही. त्याने नोव्हेंबर, 2019 मध्ये अखेरचे शतक ठोकले होते. कोहलीने लॉर्ड्सवर आतापर्यंत चार डावांत केवळ 65 धावा केल्या आहेत. ज्यात 25 हा त्याचा सर्वोच्च स्कोर आहे.
विराटनंतर भारताचे इतर फलंदाजही लॉर्ड्सवर आतापर्यंत खास कामगिरी करु शकलेले नाहीत. यात सर्वात विश्वासू फलंदाज असणाऱ्या चेतेश्वर पुजाराही संध्या खास फॉर्ममध्ये नसून मागील 32 डावात एकही शतक ठोकू शकलेला नाही. त्याने लॉर्ड्सवरील दोन सामन्यांतील चार डावात केवळ 89 धावा केल्या आहेत. दुसरीकडे रोहित शर्मा आणि ऋषभ पंत लॉर्ड्सवर अद्यापर्यंत एकही सामना खेळलेले नाहीत. केएल राहुलने देखील दोन डावात केवळ 18 धावा बनवल्या आहेत. संपूर्ण संघात केवळ मराठमोळा अजिंक्य रहाणेचीच लॉर्ड्सवरील कामगिरी दिलासादायक आहे. त्याने 2014 साली 103 धावांची शतकी खेळी करत मालिकेतील एकमेव सामन्यात भारताला विजय मिळवून दिला होता.
हे ही वाचा
IND vs ENG : इंग्लंड संघासोबत जोडला जाणार भारताचा कर्दनकाळ, ‘हा’ दिग्गज खेळाडू लवकरच मैदानात
(India vs England Test Series second test at lords ground where virat never scored century)