मुंबई: टीम इंडियाचा (Team India) बुधवारी हाँगकाँग विरुद्ध (India vs Hong Kong) सामना होणार आहे. भारताने विजयाने आशिया कप (Asia cup) स्पर्धेतील अभियान सुरु केलं आहे. भारताने पहिल्या सामन्यात परंपरागत कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानवर विजय मिळवला. भारताचा पुढचा सामना हाँगकाँग विरुद्ध होणार आहे. क्वालिफायर्स गटातून हाँगकाँगचा संघ मुख्य फेरीत पोहोचला आहे. हा सामना जिंकून सुपर 4 मध्ये जागा पक्का करण्याचा टीम इंडियाचा प्रयत्न असेल. हाँगकाँगचा संघ सलग दुसऱ्यांदा आशिया कप मध्ये खेळतोय. बलाढ्य भारताविरुद्ध चांगली कामगिरी करण्याचा हाँगकाँगचा प्रयत्न असेल.
हाँगकाँगच्या टीमने आशिया कप क्वालिफायर्स मध्ये कुवेत, सिंगापूर आणि यूएई या टीम्सने हरवलं. पहिल्या सामन्यात सिंगापूरला 8 धावांनी हरवून त्यांनी चांगली सुरुवात केली. त्यानंतर हाँगकाँगच्या टीमने कुवेतवर एकतर्फी विजय मिळवला. यूएई विरुद्धचा सामना खूप महत्त्वाचा होता. एकप्रकारे ही व्हर्च्युअल फायनल होती. विजयी संघ आशिया कपसाठी पात्र ठरणार होता. हाँगकाँगच्या टीमने इथे बाजी मारली. हाँगकाँगच्या टीमने क्वालिफायर गटातील तिन्ही सामने जिंकले. ग्रुप मध्ये टॉपवर रहात त्यांनी आशिया कप मध्ये प्रवेश केला.
भारत आणि हाँगकाँग मध्ये आशिया कप 2022 चा सामना कधी खेळला जाणार?
भारत आणि हाँगकाँग मध्ये आशिया कप 2022 चा सामना बुधवारी 31 ऑगस्टला खेळला जाईल.
भारत-हाँगकाँग मध्ये आशिया कप 2022 चा सामना कुठे होणार?
भारत आणि हाँगकाँग मध्ये आशिया कप 2022 चा सामना दुबई इंटरनॅशनल क्रिकेट स्टेडियम मध्ये खेळला जाईल.
भारत आणि हाँगकाँग मध्ये आशिया कप 2022 चा सामना कधी सुरु होणार?
भारत आणि हाँगकाँग मध्ये आशिया कप 2022 चा सामना संध्याकाळी 7.30 वाजता सुरु होईल. संध्याकाळी 7 वाजता टॉस उडवला जाईल.
भारत-हाँगकाँग आशिया कप 2022 सामन्याचे लाइव्ह टेलिकास्ट कुठे होणार?
भारत आणि हाँगकाँग मधील आशिया कप 2022 सामन्याचे लाइव्ह टेलिकास्ट स्टार स्पोर्ट्स नेटवर्कच्या वेगवेगळ्या चॅनलवर होईल.
भारत आणि हाँगकाँग मधील आशिया कप 2022 सामन्याचे लाइव्ह स्ट्रीमिंग कुठे होईल?
भारत आणि हाँगकाँग मधील आशिया कप 2022 सामन्याचं लाइव्ह स्ट्रीमिंग डिजनी हॉटस्टार वर होईल. या सामन्याचे लाइव्ह अपडेट्स तुम्ही TV9marathi.com वाचू शकता.