IND vs IRE 2nd T 20 : भारत आणि आयर्लंडमध्ये दुसरा टी 20 सामना सुरु आहे. भारताचा कॅप्टन हार्दिक पंड्याने (Hardik Pandya) टॉस जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. सलामीवीर इशान किशन (3) लवकर बाद झाला. पण त्यानंतर दुसरा सलामीवीर दीपक हुड्डा (Deepak Hooda) आणि संजू सॅमसनने (Sanju Samson) सामन्याची सूत्र हाती घेतली व आयर्लंडच्या गोलंदाजांची जोरदार धुलाई केली. कॅप्टन हार्दिक पंड्याचा निर्णय दोघांनी सार्थ ठरवला. दीपक हुड्डाने आयर्लंड दौऱ्यात मिळालेल्या संधीच सोनं केलं. त्याने दुसऱ्या टी 20 सामन्यात 55 चेंडूत शानदार झळकावलं. त्याने शतकी खेळीत 8 चौकार आणि 6 षटकार ठोकले. दीपक हुड्डा आणि संजू सॅमसनने आयर्लंडच्या गोलंदाजांना दाद दिली नाही. दोघांनी चौफेर फटकेबाजी केली. हे दोघे क्रीझवर असेपर्यंत भारताच्या धावा वेगाने झाल्या. दीपक हुड्डा अखेर 104 धावांवर आऊट झाला. लिटीलने त्याला झेलबाद केलं. त्याच्याआधी संजू सॅमसन 77 धावांवर आऊट झाला. संजूने 42 चेंडूत 77 धावा चोपल्या. यात 9 चौकार आणि 4 षटकार आहेत. संजू सॅमसन आणि दीपक हुड्डाच्या फलंदाजीच्या बळावर भारताने धावांचा विशाल डोंगर उभा केला आहे. भारताने निर्धारित 20 षटकात 7 बाद 227 धावा केल्या आहेत.
डावाच्या अखेरीस धावा वेगाने फटकावताना भारताच्या झटपट विकेट गेल्या. दिनेश कार्तिक, अक्षर पटेल आणि हर्षल पटेल भोपळाही न फोडता तंबूत परतले. सूर्यकुमार यादव 15 धावांवर बाद झाला. हार्दिक पंड्याने 9 चेंडूत नाबाद 15 धावा केल्या. यात दोन चौकार आहेत.
For his excellent ?, @HoodaOnFire is our Top Performer from the first innings.
A look at his batting summary here ??#TeamIndia #IREvIND pic.twitter.com/uDFgIcOe58
— BCCI (@BCCI) June 28, 2022
भारताने आजच्या सामन्यासाठी संघात तीन बदल केले आहेत. दुखापतग्रस्त ऋतुराज गायकवाडच्या जागी संजू सॅमसनचा संघात समावेश केला. टी 20 वर्ल्ड कप आधी संजूकडे ही शेवटची संधी असल्याचं बोललं जात होतं. त्याने सुद्धा मिळालेल्या संधीचा पुरेपूर फायदा उचलला व दमदार प्रदर्शन केलं. त्यानंतर वेगवान गोलंदाज आवेश खानच्या जागी हर्षल पटेलचा आणि युजवेंद्र चहलच्या जागी रवी बिश्नोईचा समावेश केला आहे. रवी बिश्नोईचा समावेश एक प्रयोग आहे. पण हर्षल पटेल मागच्या काही महिन्यापासून सातत्याने भारतीय संघातून खेळतोय.