मुंबई: भारत आणि आयर्लंडमध्ये (IND vs IRE) मंगळवारी दुसरा आणि शेवटचा टी 20 सामना खेळला जाणार आहे. भारताने पहिला टी 20 सामना 7 विकेट राखून जिंकला होता. पहिल्या टी 20 सामन्यात सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) आणि उमरान मलिक (Umran Malik) चमक दाखवू शकले नाहीत. पावसामुळे पहिला टी 20 सामना 20 ऐवजी 12 षटकांचा करण्यात आला होता. उद्या होणाऱ्या सामन्यातही पाऊल व्यत्यय आणू शकतो. मालिकेत क्लीन स्वीप विजय मिळवण्याचं हार्दिक पंड्याच लक्ष्य असेल. दुखापतीमुळे ऋतुराज गायकवाड पहिल्या टी 20 सामन्यात फलंदाजी करु शकला नाही. पुढच्या महिन्यात इंग्लंड विरुद्ध तीन टी 20 सामन्याची सीरीज होणार आहे. त्यासाठी मजबूत संघ मैदानात उतरवला जाईल. त्यासाठी आयर्लंड़ दौरा हा युवा खेळाडूंकडे आपली क्षमता दाखवण्याची संधी आहे.
भारत आणि आयर्लंड मध्ये दुसरी टी 20 आंतरराष्ट्रीय मॅच कधी खेळली जाणार?
भारत आणि आयर्लंडमध्ये दुसरा आंतरराष्ट्रीय सामना 28 जूनला मंगळवारी खेळला जाईल.
भारत आणि आयर्लंडमध्ये दुसरा आंतरराष्ट्रीय सामना कुठे होणार?
भारत आणि आयर्लंडमध्ये दुसरा आंतरराष्ट्रीय सामना द विलेज मालाहिदे डबलिनमध्ये खेळला जाणार आहे.
भारत आणि आयर्लंडमध्ये दुसरा टी 20 सामना किती वाजता सुरु होणार?
भारत आणि आयर्लंड मध्ये दुसरा टी 20 आंतरराष्ट्रीय सामना रात्री 9 वाजता सुरु होईल. टॉस 8.30 वाजता उडवला जाईल.
भारत-आयर्लंडमधल्या दुसऱ्या टी 20 आंतरराष्ट्रीय सामन्याचं लाइव टेलीकास्ट कुठे पाहता येईल?
भारत आणि आयर्लंडमधल्या दुसऱ्या टी 20 आंतरराष्ट्रीय सामन्याचे लाइव टेलिकास्ट तुम्हाला सोनी सिक्स आणि सोनी सिक्स एचडी वर पाहता येईल.
भारत आणि आयर्लंडमधल्या दुसऱ्या टी 20 आंतरराष्ट्रीय सामन्याचे ऑनलाइन लाइव स्ट्रीमिंग कुठे पाहता येईल?
मॅचचे ऑनलाइन लाइव स्ट्रीमिंग सब्सक्रिप्शन घेतल्यानंतर सोनी लीव वर पाहता येईल