मुंबई: भारतीय क्रिकेट संघाचा लीसेस्टरशायर विरुद्ध (IND vs LEI) सराव सामना सुरु आहे. इंग्लंड विरुद्धच्या प्रत्यक्ष कसोटीआधी टीम इंडियाच्या खेळाडूंना फलंदाजी आणि गोलंदाजीचा सरावा व्हावा, यासाठी ही वॉर्म अप मॅच (Warm up match) आयोजित करण्यात आली आहे. भारतीय संघाच्या अव्वल फलंदाजांकडून या सराव सामन्यात दमदार कामगिरीची अपेक्षा होती. पण त्यांनी निराश केलं. रोहित शर्मा 25, (Rohit sharma) शुभमन गिल 21, हनुमा विहारी 3, विराट कोहली 33, श्रेयस अय्यर शुन्य आणि चेतेश्वर पुजाराही शुन्यावर आऊट झाला. भारतीय संघाने आपला पहिला डाव 8 बाद 246 धावांवर घोषित केला. भारताकडून नवख्या श्रीकर भरतने सर्वाधिक नाबाद 70 धावा केल्या.
फलंदाजीत भारतीय संघाला कमाल दाखवता आली नाही. पण गोलंदाजीत मात्र त्यांनी ही कसर सध्यातरी भरुन काढली आहे. लीसेस्टरशायरच्या चार विकेट गेल्या असून मोहम्मद शमी आणि मोहम्मद सिराजने भेदक मारा केला. दोघांनी प्रत्येकी दोन-दोन विकेट काढल्या. कॅप्टन सॅम इव्हास लीसेस्टरशायरकडून बाद होणारा पहिला फलंदाज ठरला. मोहम्मद शमीने त्याला अवघ्या एक रन्सवर कोहलीकरवी झेलबाद केलं. त्यानंतर चेतेश्वर पुजाराला शमीने भोपळाही फोडू दिला नाही. त्याला शुन्यावर क्लीन बोल्ड केलं. दोन बाद 22 असा लीसेस्टरशायरचा डाव अडचणीत सापडला होता. सलामीवीर लुईस किंबरला (31) धावांवर मोहम्मद सिराजने भरतकरवी झेलबाद केलं. जोईला 22 धावांवर सिराजने बोल्ड केलं. त्यानंतर ऋषभ पंत आणि ऋषी पटेलने लीसेस्टरशायरचा डाव सावरला. ऋषभ (35) आणि ऋषी (34) धावांवर खेळत होते. ऋषी पटेलला (34) धावांवर मोहम्मद शमीने बाद केलं. लीसेस्टरशायरच्या 33 षटकात पाच बाद 129 धावा झाल्या आहेत.
That will be Lunch ?
Leicestershire – 101/4 & trail by 145 runsA good show with the bat from Rishabh Pant who is batting on 22* for Leics ??
Siraj & Shami bag 2 wickets each!
?: @leicsccc pic.twitter.com/3mxMC3hmPC
— BCCI (@BCCI) June 24, 2022
पहिल्या दिवसअखेर टीम इंडियाने 8 विकेट गमावून 246 धावा केल्या. पावसाच्या व्यत्ययामुळे संपूर्ण दिवसात फक्त 60.2 षटकांचा खेळ होऊ शकला. श्रीकर भरतने सर्वाधिक 70 धावा केल्या. दिवसाचा खेळ संपला, त्यावेळी भरत 70 आणि मोहम्मद शमी 18 धावांवर खेळत होते. विराट कोहली, रोहित शर्मा आणि हनुमा विहारी सारखे दिग्गज फलंदाज अनुभवाने कमी असलेल्या इंग्लिश गोलंदाज रोमन वॉकर समोर ढेपाळले.