मुंबई: इंग्लंड विरुद्ध (IND vs ENG) एजबॅस्टनमध्ये पहिला कसोटी सामना खेळण्याआधी टीम इंडिया लीसेस्टरशायर विरुद्ध (India vs Leicestershire) सराव सामना खेळत आहे. सराव सामन्यात भारताच्या टॉप ऑर्डरने निराश केलं आहे. शुभमन गिल, रोहित शर्मा (Rohit sharma) हे दोन्ही सलामीवीर खराब फटके खेळून बाद झाले. रोहित शर्मा 25 आणि शुभमन गिल 21 धावांवर आऊट झाला. हनुमा विहारीने 23 चेंडूत 3 धावा केल्या. टीम इंडियाच्या सलामीवीरांनी चांगली सुरुवात केली होती. शुभमन गिल जसप्रीत बुमराह विरुद्ध चांगले फटके खेळला होता. रोहित शर्मा सुद्धा सकारात्मक खेळत होता. दोघांच फुटवर्क कमलीचं होतं. पण त्यानंतर या दोन्ही खेळाडूंनी आपल्या जुन्या चुकांनी पुनरावृत्ती केली.
शुभमन गिल शरीरवेधी चेंडूंवर चांगला खेळला. पण ऑफ स्टम्प बाहेरच्या चेंडूवर तो अडचणीत आला. पाचव्या स्टंम्पवरील चेंडूशी छेडछाड करताना त्याचा विकेट गेला. गिलने विल डेविसच्या बाहेर जाणाऱ्या चेंडूवर शॉट खेळण्याचा प्रयत्न केला. पण चेंडू बॅटची कड घेऊन विकेटकीपर पंतच्या ग्लोव्हजमध्ये विसावला.
रोहित शर्माला शॉर्ट चेंडूंचा उत्कृष्ट खेळाडू मानलं जातं. त्याचे कट आणि पुलचे फटके कमालीचे आहेत. मागच्या काही सामन्यांपासून रोहित हेच फटके खेळताना आऊट होतोय. लीसेस्टरशायर विरुद्धच्या सामन्यात रोहितने हीच चूक केली. रोम वॉल्करने शॉर्ट चेंडू टाकून रोहितला पुल फटका खेळायला भाग पाडलं. चेंडू हवेत जाताच स्कंदेने सोपा झेल घेतला. त्यानंतर हनुमा विहारी सुद्धा खराब फटक्यावर आऊट झाला. वॉल्करच्या चेंडूवर त्याने ऑन ड्राइव्ह खेळण्याचा प्रयत्न केला. पहिल्या स्लीपमध्ये त्याचा झेल घेतला.
☝️ | Rohit (25) c Sakande, b Walker.
Rohit pulls a short ball from @RomanWalker17 up into the sky, @AbiSakande is under the catch. ?@imVkohli walks to the middle. Watch him bat. ?
?? IND 50/2
???? ??????: https://t.co/adbXpw0FcA ?
? #IndiaTourMatch | #LEIvIND pic.twitter.com/5mxQJ5cLKK
— Leicestershire Foxes ? (@leicsccc) June 23, 2022
श्रेयस अय्यरचा खराब फॉर्म इंग्लंडमध्येही कायम आहे. सराव सामन्यात त्याला खातही उघडता आलं नाही. 11 चेंडूत ० रन्स करुन तो पॅव्हेलियनमध्ये परतला. एकूणच भारतीय फलंदाजांनी निराश केलं. एजबॅस्टनमध्ये ब्रॉर्ड आणि अँडरसन सारख्या गोलंदाजांसमोर भारतीय संघाची काय स्थिती होईल. हा एक गंभीर प्रश्न आहे.