India vs Namibia T20 world cup Result: स्पर्धेचा शेवट गोड, भारताचा नामिबीयावर 9 गडी राखून विजय

| Updated on: Nov 08, 2021 | 10:40 PM

भारताच्या गटातून न्यूझीलंड आणि पाकिस्तान पुढच्या फेरीत गेल्यामुळे भारताचा यंदाच्या विश्वचषकातील प्रवास संपला होता. पण स्पर्धेतील शेवटचा सामना जिंकत भारताने शेवट गोड केला आहे.

India vs Namibia T20 world cup Result: स्पर्धेचा शेवट गोड, भारताचा नामिबीयावर 9 गडी राखून विजय
भारत विरुद्ध नामिबीया सामन्यातील एक क्षण
Follow us on

T20 Cricket World Cup 2021: भारतीय क्रिकेट संघाने (Indian Cricket Team) टी20 विश्वचषकातील (T20 World Cup) पहिले दोन सामने गमावल्यानंतर भारताचं स्पर्धेत पुनरागमन अवघड होतं. पण तिसरा आणि चौथा सामना मोठ्या फरकाने जिंकत भारत स्पर्धेत पुनरागमन करत होता. पण त्याचवेळी न्यूझीलंडने सलग चार विजय मिळवत सेमीफायलनमध्ये प्रवेश मिळवला आणि भारत आपोआपच स्पर्धेबाहेर गेला. पण तरी आज (8 नोव्हेंबर) झालेल्या विश्वचषकातील शेवटच्या सामन्यात भारताने विजय मिळवत स्पर्धेचा शेवट गोड केला आहे. भारताने नामिबीयावर 9 विकेट्सनी तगडा विजय मिळवला आहे.

विश्वचषकाच्या सुरुवातीच्या तिन्ही सामन्यात भारताला नाणेफेक जिंकण्यात यश आलं नव्हतं. पण स्कॉटलंड पाठोपाठ नामिबीयाविरुद्धही भारताने टॉस जिंकला. ज्यानंतर प्रथम गोलंदाजीचा निर्णय भारताने घेतला. ज्यानंतर भारताच्या गोलंदाजांनी हा निर्णय़ अगदी बरोबर असल्याचं दाखवत फिरकी गोलंदाजीसह वेगवान गोलंदाजीने नामिबिया संघाला 132 धावांत रोखलं. यावेळी यावेळी फिरकीपटू आश्विन आणि जाडेजाने प्रत्येकी 3 तर बुमराहने 2 विकेट घेतले. नामिबीयाकडून डेविड विसे याने सर्वाधिक 26 धावा केल्या.

राहुल-रोहित जोडीची अर्धशतकं

133 धावांचं आव्हान पूर्ण करण्यासाठी मैदानात आलेल्या भारतीय संघाने सुरुवातच जबरदस्त केली.  सलामीवीर रोहित आणि राहुल यांनी अर्धशतकं झळकावत सामना एकहाती भारताच्या पारड्यातचं ठेवला. रोहित बाद झाल्यानंतर सूर्यकुमारने राहुलला 25 धावांची साथ देत विजय पक्का केला. सामन्यात रोहितने 37 चेंडूत 2 षटकार आणि 7 चौकार ठोकत 56 धावा केल्या. तर राहुलनेही अर्धशतक ठोकत 36 चेंडूत 2 षटकार आणि 4 चौकार ठोकत नाबाद 54 धावा केल्या.

भारताचा विश्वचषक 2021 स्पर्धेतील प्रवास

पहिल्या सामन्यात पाकिस्तानने 10 आणि नंतर न्यूझीलंडने 8 विकेट्सनी मात दिल्यानंतर भारतासाठी नंतरचे सर्व सामने करो या मरो असेच होते. त्यानुसार तिसऱ्या सामन्यात अफगाणिस्तानला मात दिली. पण तरीही नेटरनरेटमध्ये पुढे जाण्यासाठी भारताला मोठ्या विजयाची अपेक्षा होती. जी अपेक्षा भारताने 8 विकेट्सने स्कॉटलंडला मात देत सामना अवघ्या 6.3 षटकात संपवत पूर्ण केली. पण न्यूझीलंडने भारतापेक्षा अधिक अर्थात 4 विजय मिळवत सेमीफायनलचं तिकीट मिळवलं, ज्यामुळे भारत आपोआपच स्पर्धेबाहेर झाला.

इतर बातम्या

मोठ्या वादात अडकला शोएब अख्तर, अचानक टीव्ही शो सोडणं पडलं महागात, चॅनेलने ठोकला 100 मिलीयनचा दावा

पाकिस्तानच्या खेळाडूचा धमाका, विश्वचषकातील खेळीने तोडला ख्रिस गेलचा रेकॉर्ड, कोहलीसह बाबरलाही टाकलं मागे

8 चेंडूत ठोकल्या 40 धावा, रहाणे-शॉसमोर छत्तीसगडचा फलंदाज पडला भारी, मुंबईचा संघ 1 रनने पराभूत

(India vs Namibia T20 world cup Match Result 2021 Know Who T20 world cup Match Highlights)