सिडनी: टीम इंडियाचा सिडनी क्रिकेट ग्राऊंडवर टी 20 वर्ल्ड कपमधला दुसरा सामना सुरु आहे. टीम इंडियाचा कॅप्टन रोहित शर्माने टॉस जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. टीम इंडियाची सुरुवात फारशी चांगली झाली नाही. तिसऱ्या ओव्हरमध्ये केएल राहुलच्या रुपाने टीम इंडियाला पहिला झटका बसला. राहुल 9 धावांवर LBW बाद झाला. त्यावेळी भारताच्या 11 धावा झाल्या होत्या.
रोहितने किती सिक्स मारले?
त्यानंतर कॅप्टन रोहित शर्मा आणि विराट कोहलीने डाव सावरला. सुरुवातीला दोघांनी सावध फलंदाजी केली. रोहित आज कॅप्टन इनिंग खेळला. त्याने 39 चेंडूत 53 धावा फटकावल्या. यात 4 चौकार आणि 3 षटकार होते. हाफ सेंच्युरी झळकावल्यानंतर वेगाने धावा बनवण्याच्या प्रयत्नात रोहित आऊट झाला. विराट-रोहितने दुसऱ्या विकेटसाठी 73 धावांची भागीदारी केली.
सूर्याची आक्रमक बॅटिंग
त्यानंतर सूर्यकुमार यादव फलंदाजीला आला. सूर्याने आपल्या नेहमीच्या स्टाइलमध्ये फलंदाजी सुरु केली. त्याने चौफेर फटकेबाजी केली. सूर्याने आजच्या सामन्यात 25 चेंडूत नाबाद 51 धावा केल्या. यात 7 चौकार आणि 1 षटकार लगावला.
विराटची दुसरी हाफ सेंच्युरी
विराट कोहलीने आज टी 20 वर्ल्ड कपमधील सलग दुसरं अर्धशतक झळकावलं. त्याने सुद्धा चौफेर फटकेबाजी करुन धावा वसूल केल्या. 44 चेंडूत नाबाद 62 धावा केल्या. यात 3 चौकार आणि 2 षटकार लगावले. टीम इंडियाने निर्धारित 20 ओव्हर्समध्ये 2 बाद 179 धावा केल्या. टीम इंडियाने नेदरलँडला विजयासाठी 180 धावांचे लक्ष्य दिले आहे.
भारताची प्लेइंग इलेवन
रोहित शर्मा (कॅप्टन), केएल राहुल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, हार्दिक पंड्या, दिनेश कार्तिक, अक्षर पटेल, अश्विन, भुवनेश्वर कुमार, मोहम्मद शमी, अर्शदीप सिंह