सिडनी: टीम इंडियाने टी 20 वर्ल्ड कपमध्ये दमदार सुरुवात केली आहे. सलामीच्या सामन्यात पाकिस्तानला नमवलं. आज नेदरलँडस विरुद्ध टीम इंडिया दुसरा सामना खेळणार आहे. सिडनी क्रिकेट ग्राऊंडच्या मैदानावर ही लढत होईल. नेदरलँडससाठी टी 20 वर्ल्ड कपमध्ये निराशाजनक सुरुवात झाली आहे. पहिल्या सामन्यात त्यांना बांग्लादेशने 9 रन्सनी हरवलं होतं.
अनेक मोठ्या टीम्सना धक्के
टीम इंडियाच्या तुलनेत नेदरलँडची टीम दुबळी समजली जाते. पण टीम इंडिया नेदरलँडला कमी लेखण्याची चूक अजिबात करणार नाही. कारण या वर्ल्ड कपमध्ये आतापर्यंत अनेक मोठ्या टीम्सना धक्के बसले आहेत.
भारताने जिंकला टॉस
भारताचा कॅप्टन रोहित शर्माने टॉस जिंकला आहे. टीम इंडियाने प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला आहे. प्लेइंग 11 मध्ये कुठलाही बदल केलेला नाही.
कमी लेखण्याची चूक करणार नाही
वेस्ट इंडिज सारखा टी 20 मधला दोनवेळचा चॅम्पियन संघ वर्ल्ड कपमधून बाहेर गेला आहे. श्रीलंका, इंग्लंडसारख्या टीम्सना दुबळ्या समजल्या जाणाऱ्या टीम्सकडून पराभव सहन करावा लागला आहे. त्यामुळे टीम इंडिया नेदरलँडला कमी लेखण्याची चूक अजिबात करणार नाही.
आज पावसाची शक्यता
वेदर डॉट कॉमकडून आज सिडनीमध्ये पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. पण आज तिथे आकाश निरभ्र असून वातावरण स्वच्छ आहे.
सामन्याला थोडा विलंब कारण…
दक्षिण आफ्रिका आणि बांग्लादेशमध्ये सध्या सिडनी क्रिकेट ग्राऊंडच्या मैदानात सामना सुरु आहे. त्यामुळे भारत विरुद्ध नेदरलँडस सामना थोडा उशिराने सुरु होऊ शकतो. कारण हा सामना सुद्धा याच मैदानात खेळला जाणार आहे.
T20 WC 2022. India XI: R Sharma (c), K L Rahul, V Kohli, S Yadav, D Karthik (wk), H Pandya, A Patel, R Ashwin, A Singh, B Kumar, M Shami. https://t.co/Zmq1ap148Q #INDvNED #T20WorldCup
— BCCI (@BCCI) October 27, 2022
भारताची प्लेइंग इलेवन
रोहित शर्मा (कॅप्टन), केएल राहुल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, हार्दिक पंड्या, दिनेश कार्तिक, अक्षर पटेल, अश्विन, भुवनेश्वर कुमार, मोहम्मद शमी, अर्शदीप सिंह