हैदराबाद: श्रीलंकेविरुद्ध वनडे सीरीजमध्ये टीम इंडियाने क्लीन स्वीप केलं. टीम इंडियाची पुढची सीरीज न्यूझीलंड विरुद्ध होणार आहे. न्यूझीलंडची टीम भारत दौऱ्यावर आहे. आधी वनडे त्यानंतर टी 20 सीरीज होणार आहे. दोन्ही टीम्समध्ये वनडे सीरीजची सुरुवात 18 जानेवारी बुधवारपासून होणार आहे. पहिला सामना हैदराबादमध्ये खेळला जाईल. दुसरा वनडे सामना रायपूर, तिसरा आणि शेवटचा वनडे सामना इंदूर होळकर स्टेडियमवर होईल.
टीम इंडियासाठी ही सीरीज महत्त्वाची
या सीरीजसाठी विकेटकीपर फलंदाज केएल राहुल आणि अक्षर पटेल यांचा टीममध्ये समावेश केलेला नाही. मीडिया रिपोर्ट्सनुसार हे दोन्ही खेळाडू लवकरच विवाहाच्या बोहल्यावर चढणार आहेत. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली टीम इंडिया वनडे सीरीज जिंकण्याचा प्रयत्न करेल. भारतात होणाऱ्या वनडे वर्ल्ड कपआधी टीम इंडियासाठी ही सीरीज महत्त्वाची आहे. न्यूझीलंडचा नियमित कॅप्टन केन विलियमनस या सीरीजसाठी टीमचा भाग नाहीय.
केन विलियमनस नाही मग न्यूझीलंडचा कॅप्टन कोण?
त्याच्याजागी विकेटकीपर बॅट्समन टॉम लॅथमला टीमचा कॅप्टन बनवण्यात आलय. न्यूझीलंडची टीम अजूनपर्यंत भारत भूमीवर एकही वनडे सीरीज जिंकू शकलेली नाही. टीम इंडियाने मागच्यावर्षाच्या अखेरीस न्यूझीलंडचा दौरा केला होता. त्यावेळी वनडे सीरीजमध्ये न्यूझीलंडने टीम इंडियाचा 1-0 असा पराभव केला होता.
कधी, कुठे आणि कसा पाहून शकता वनडे सामना?
टीम इंडिया आणि न्यूझीलंडमध्ये पहिला वनडे सामना कधी होणार?
टीम इंडिया आणि न्यूझीलंडमध्ये पहिला वनडे सामना बुधवारी 18 जानेवारीला खेळला जाईल.
टीम इंडिया आणि न्यूझीलंडमध्ये पहिला वनडे सामना कुठे होणार?
टीम इंडिया आणि न्यूझीलंडमध्ये पहिला वनडे सामना हैदराबादच्या राजीव गांधी इंटरनॅशनल स्टेडियमवर खेळला जाईल.
टीम इंडिया आणि न्यूझीलंडमद्ये पहिला वनडे सामना कधी सुरु होणार?
टीम इंडिया आणि न्यूझीलंडमध्ये पहिला वनडे सामना दुपारी 1.30 वाजता सुरु होईल. दुपारी 1 वाजात टॉस उडवला जाईल.
टीम इंडिया आणि न्यूझीलंडमधील पहिल्या वनडे सामन्याच लाइव्ग टेलीकास्ट कुठे होणार?
टीम इंडिया आणि न्यूझीलंडमधील पहिला वनडे सामना स्टार स्पोर्ट्स नेटवर्कच्या चॅनल्सवर वेगवेगळ्या भाषात पाहता येईल.
टीम इंडिया आणि न्यूझीलंडमधील पहिल्या वनडे सामन्याच लाइव्ह स्ट्रीमिंग कुठे होणार?
मॅचच ऑनलाइन लाइव्ह स्ट्रीमिंग सब्सक्रिप्शन असल्यास हॉटस्टारवर पाहता येईल.