India vs New Zealand 1st T20: टीम इंडिया आणि न्यूझीलंडमध्ये आज पहिला टी 20 सामना होणार आहे. रांची येथे ही मॅच होईल. वनडे मालिकेनंतर T20 सीरीज जिंकण्याच टीम इंडियाच लक्ष्य आहे. टी 20 मध्ये युवा खेळाडूंना संधी देण्यात आलीय. T20 वर्ल्ड कपमधील पराभवानंतर बीसीसीआयने काही महत्त्वाचे बदल केले आहेत. रोहित शर्मा, विराट कहोलीसह अन्य सिनीयर खेळाडूंना टी 20 साठी पुन्हा टीममध्ये संधी मिळण्याची शक्यता नाहीय. टी 20 साठी लागणारा फिटनेस, चपळता लक्षात घेऊन युवा खेळाडूंना संधी दिली आहे. हार्दिक पंड्याच आता टीम इंडियाचा टी 20 मधील पूर्णवेळ कॅप्टन आहे.
विराट कोहलीच्या जागेवर ‘तो’ येणार
न्यूझीलंड विरुद्धच्या सीरीजआधी हार्दिकच्य़ा नेतृत्वाखाली टीम इंडिया श्रीलंकेविरुद्ध टी 20 मालिका खेळली. 2-1 ने ही सीरीज टीम इंडियाने जिंकली. आता न्यूझीलंड विरुद्ध परीक्षा आहे. विराट कोहलीच्या जागी तीन नंबरवर एका 31 वर्षीय युवा बॅट्समनला आज संधी मिळू शकते. तो स्फोटक फलंदाजीत माहीर आहे.
गोलंदाजी आक्रमणाची वाट लावू शकतो
न्यूझीलंड विरुद्ध पहिल्या टी 20 साठी राहुल त्रिपाठीला तिसऱ्या नंबरवर संधी मिळू शकते. राहुल स्फोटक फलंदाजीत माहीर आहे. त्याच्याकडे क्षमता आहे. तो कुठल्याही गोलंदाजी आक्रमणाची वाट लावू शकतो. श्रीलंकेविरुद्ध तिसऱ्या टी 20 सामन्यात त्याने तुफानी बॅटिंग केली. 16 चेंडूत त्याने 35 धावा कुटल्या.
फर्स्ट क्लासमध्ये कशी आहे कामगिरी?
राहुल त्रिपाठीने आपल्या फर्स्ट क्लास करिअरमध्ये एकूण 52 सामन्यात 7 शतकं आणि 14 अर्धशतकं झळकवली आहेत. त्याने 2728 धावा केल्यात. त्याशिवाय लिस्ट ए मध्ये त्याच्या नावावर 53 सामन्यात 4 सेंच्युरी आणि 10 हाफ सेंच्युरी आहेत. एकूण 1782 धावा त्याने केल्यात. फर्स्ट क्लासमध्ये 13 आणि लिस्ट ए मध्ये 6 विकेट त्याने घेतल्या आहेत.
कुठल्या बॉलरला संधी मिळेल?
न्यूझीलंड विरुद्ध टी 20 सीरीजसाठी भारतीय टीममध्ये अर्शदीप सिंह, उमरान मलिक, शिवम मावी आणि मुकेश कुमार हे चार फास्ट बॉलर्स आहेत. या खेळाडूंनी मागच्या काही काळात चांगलं प्रदर्शन केलय. भारतीय प्लेइंग 11 मध्ये फक्त 3 वेगवान गोलंदाजांना संधी मिळू शकते. या चार पैकी कुठल्या एका बॉलरला बाहेर बसवलं जाईल.