India vs New Zealand, LIVE Score, T20 Updates: भारत आणि न्यूझीलंडमध्ये टी 20 सीरीजची सुरुवात आजपासून होणार होती. पण असं होऊ शकलं नाही. सीरीजचा पहिला सामना वेलिंग्टनमध्ये होणार होता. पण सतत पाऊस कोसळत होता. त्यामुळे ही मॅच रद्द झाली. आता उर्वरित दोन सामन्यांवर फॅन्सच लक्ष असेल. दुसरा सामना माऊंट माऊगई आणि तिसरा सामना नेपियर येथे होणार आहे.
न्यूझीलंडची टीम: केन विलियमसन (कॅप्टन), फिन एलेन, मायकल ब्रेसवेल, डेवन कॉनवे, लॉकी फर्ग्यूसन, डेरिल मिचेल, एडम मिल्ने, जिमी नीशॅम, ग्लेन फिलिप्स, मिचेल सेंटनर, टिम साउदी, ईश सोढ़ी आणि ब्लेयर टिकनरं
भारताची टीम: हार्दिक पंड्या (कॅप्टन), ऋषभ पंत, इशान किशन, शुभमन गिल, दीपक हुड्डा, सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, संजू सॅमसन, वॉशिंगटन सुंदर, युजवेंद्र चहल, कुलदीप यादव, हर्षल पटेल, मोहम्मद सिराज, भुवनेश्वर कुमार, अर्शदीप सिंह आणि उमरान मलिक
वेलिंग्टनच्या स्काय स्टेडियमवर आज भारत आणि न्यूझीलंडमध्ये पहिला टी 20 सामना होणार होता. नुकत्याच संपलेल्या टी 20 वर्ल्ड कपमध्ये दोन्ही टीमच सेमीफायनलमध्ये आव्हान संपुष्टात आलं होत. आज टी 20 मालिकेपासून दोन्ही टीम्स नवीन सुरुवात करणारा होत्या. पण पावसामुळे हा सामना रद्द झाला आहे. सतत कोसळणाऱ्या पावसामुळे टॉसही शक्य झाला नाही.
मुंबई : लोकल प्रवाशांसाठी खूशखबर, सोमवारपासून लोकल प्रवास अधिक सुखकर होणार, 26 लोकल या 12 डब्यांवरुन 15 डब्यांच्या करण्यात येणार, लोकल प्रवाशांची संख्या 25 टक्क्यांनी वाढण्याचा अंदाज
वेलिंग्टनमध्ये पाऊस सुरु, कॅप्टन्सना टॉसची प्रतिक्षा आहे. भारताच्या वेळेनुसार, मॅचचा कट ऑफ टाइम दुपारी 2 वाजून 16 मिनिटांनी आहे. म्हणजे या वेळेपर्यंत मॅच सुरु होण्याची प्रतिक्षा केली जाईल.
वेलिंग्टनमध्ये पाऊस थांबला होता. पण पुन्हा एकदा पाऊस सुरु झालाय. त्यामुळे सामना आणि टॉसला उशिर होतोय. भारतीय वेळेनुसार दुपारी 12 वाजता सामना सुरु होणार होता.
भारत आणि न्यूझीलंडमध्ये पहिला टी 20 सामना होणार आहे. 11.30 वाजता टॉस उडवला जाणार होता. पण पावसामुळे टॉसला विलंब होतोय.
पहिल्या मॅचमध्ये इशान किशन आणि शुभमन गिल डावाची सुरुवात करु शकतात. टीम मॅनेजमेंट ऋषभ पंतला सुद्धा संधी देऊ शकते. ही सीरीज पंतसाठी सुद्धा महत्त्वाची आहे.
भारतीय टीम आज वेलिंग्टनमध्ये न्यूझीलंड विरुद्ध पहिली टी 20 मॅच खेळण्यासाठी उतरणार आहे. सीनियर खेळाडूंच्या अनुपस्थितीत हार्दिक पंड्याकडे टीमच नेतृत्व दिलय.