IND vs NZ: पावसाला दोष देऊ नका, टीम इंडिया स्वत:च्या 5 चुकांमुळे हरली

| Updated on: Nov 30, 2022 | 3:52 PM

IND vs NZ: टीम इंडियाने या वनडे सीरीजमध्ये काय चूका केल्या? ते जाणून घ्या....

IND vs NZ: पावसाला दोष देऊ नका, टीम इंडिया स्वत:च्या 5 चुकांमुळे हरली
ind vs nz
Image Credit source: bcci twitter
Follow us on

ख्राइस्टचर्च: वनडे सीरीजमध्ये न्यूझीलंडने टीम इंडियाचा 1-0 ने पराभव केला. पहिला सामना भारताने 7 विकेटने गमावला होता. पण त्यानंतर पावसाने टीम इंडियाला पुनरागमनाची एकही संधी दिली नाही. दुसरा आणि तिसरा सामना पावसामुळे रद्द झाला. दुसऱ्या वनडेत टीम इंडियाला 12.5 ओव्हर्स फलंदाजी करण्याची संधी मिळाली. तिसऱ्या वनडेत टीम इंडियाचा डाव 47.3 ओव्हर्समध्ये 219 धावात आटोपला. भारताच्या पराभवाच सर्वात मोठं कारण पावसाला मानल जातय. त्यामुळे टीमला पुनरागमनाची संधी मिळाली नाही. प्रत्यक्षात टीम इंडियाने स्वत:च्या चूकांमुळे ही सीरीज गमावली.

  1. वनडे सीरीज दरम्यान पावसाचा अंदाज आधीच वर्तवण्यात आला होता. हॅमिल्टन आणि ख्राइस्टचर्चच्या हवामानाची प्रत्येकाला कल्पना होती. पहिल्या सामन्यात विजय मिळवणं हा टीम इंडियाचा उद्देश हवा होता. टी 20 सीरीजमधून भारताने धडा घ्यायला हवा होता.
  2. पहिल्या वनडेत भारताने 306 धावा केल्या होत्या. मात्र तरीही मोठ्या फरकाने टीम इंडियाचा पराभव झाला. जुन्या चेंडूने वेगवान गोलंदाजांची खराब कामगिरी हे पराभवाच मुख्य कारण आहे. टॉम लॅथमने याचा फायदा उचलला. त्याने नाबाद शतकी खेळी केली. तिसऱ्या वनडेत दीपक चाहर आणि अर्शदीपने चांगली सुरुवात दिली. पण 5-6 ओव्हर्सनंतर त्यांची लय बिघडली.
  3. पहिल्या सामन्यात सहाव्या गोलंदाजाची कमतरता भारतीय टीमला जाणवली होती. ही चूक सुधारली. दुसऱ्या वनडेत दीपक हुड्डाला संधी दिली. त्यासाठी संजू सॅमसनला बाहेर बसवलं. जो चांगल्या फॉर्ममध्ये होता. या बदलाचा टीम इंडियाला काही विशेष फायदा झाला नाही. कारण पावसामुळे सामना रद्द झाला.
  4. न्यूझीलंडच्या फलंदाजांची जबरदस्त बॅटिंग हे सुद्धा भारताच्या पराभवाच एक कारण आहे. टॉम लॅथमने पहिल्या मॅचमध्ये नाबाद 145 धावा फटकावल्या. त्याशिवाय केन विलयम्सनने 94 धावा केल्या. तिसऱ्या वनडेत फिन एलन आणि डेवॉन कॉनवे यांनी पहिल्या विकेटसाठी 97 धावांची भागीदारी केली. तिसऱ्या वनडेतही न्यूझीलंडचे फलंदाज जबरदस्त बॅटिंग करत होते.
  5. ऋषभ पंतही भारताच्या पराभवाच कारण ठरला. गरजेच्यावेळी त्याची बॅट शांत राहिली. पहिल्या वनडेमध्ये त्याने फक्त 15 धावा केल्या होत्या. तिसऱ्या वनडेत फक्त 10 धावा केल्या. मीडिल ऑर्डरमध्ये तो डाव संभाळू शकला नाही.