कोलकाता : भारत आणि न्यूझीलंड (India vs New Zealand) यांच्यातील टी-20 मालिकेतील तिसरा आणि शेवटचा सामना आज कोलकाता येथील ऐतिहासिक स्टेडियम ईडन गार्डन्सवर खेळवला जात आहे. टीम इंडियाने जयपूर आणि रांचीमध्ये खेळल्या गेलेल्या पहिल्या आणि दुसऱ्या टी-20 मध्ये विजय मिळवून मालिकेवर कब्जा केला आहे. अशा परिस्थितीत आज रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली आणि राहुल द्रविडच्या कोचिंगमध्ये खेळणाऱ्या टीम इंडियाच्या नजरा किवी संघाला व्हाईटवॉश देण्यावर असतील. विशेष म्हणजे या सामन्यासाठी भारतीय संघात काही बदल करण्यात आले आहेत. दरम्यान, भारताचा कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. (India vs New Zealand 3rd T20: Two changes in India’s playing XI, New Zealand changed captain)
भारताने आपल्या प्लेइंग इलेव्हनमध्ये 2 बदल केले आहेत, तर पहिल्या दोन सामन्यांमध्ये पराभूत झाल्यानंतर न्यूझीलंड संघाने कर्णधार बदलला आहे. तिसर्या आणि शेवटच्या T20 मध्ये न्यूझीलंडची कमान मिचेल सँटनरच्या हातात आहे. यापूर्वी टिम साऊदी संघाची धुरा सांभाळत होता. त्याचवेळी भारतीय संघाने केएल राहुल आणि आर. अश्विनला विश्रांती दिली आहे. त्यांच्या जागी इशान किशन आणि युजवेंद्र चहलला प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान देण्यात आले आहे. टीम साऊदीच्या जागी लॉकी फर्ग्युसनला न्यूझीलंड संघात स्थान मिळाले आहे.
रोहित शर्मा (कर्णधार), इशान किशन, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत, व्यंकटेश अय्यर, श्रेयस अय्यर, अक्षर पटेल, युजवेंद्र चहल, भुवनेश्वर कुमार, दीपक चाहर, हर्षल पटेल
A look at the Playing XI for #TeamIndia.
Ishan Kishan and Yuzvendra Chahal come in place of KL Rahul and R Ashwin.
Live – https://t.co/kbSRlDEQf1 #INDvNZ @Paytm pic.twitter.com/903hw7uU9a
— BCCI (@BCCI) November 21, 2021
मिचेल सँटनर (कर्णधार), मार्टिन गप्टिल, डॅरिल मिशेल, मार्क चॅपमन, टिम सायफर्ट (विकेटकीपर), ग्लेन फिलिप्स, जेम्स नीशम, लॉकी फर्ग्युसन, ईश सोढी, ट्रेंट बोल्ट, अॅडम मिल्ने.
3rd T20I. New Zealand XI: M Guptill, D Mitchell, M Chapman, G Phillips, T Seifert, J Neesham, M Santner, A Milne, L Ferguson, I Sodhi, T Boult https://t.co/MTGHRxjWKf #INDvNZ @Paytm
— BCCI (@BCCI) November 21, 2021
भारताचा कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.
Captain Rohit Sharma wins the toss and elects to bat first in the third and final T20I.
Live – https://t.co/kbSRlDEQf1 #INDvNZ @Paytm pic.twitter.com/1q9CdXBx7e
— BCCI (@BCCI) November 21, 2021
इतर बातम्या
महेंद्रसिंह धोनी शेवटचा सामना चेन्नईमध्ये खेळणार ? कार्यक्रमात बोलताना म्हणाला…
(India vs New Zealand 3rd T20: Two changes in India’s playing XI, New Zealand changed captain)