नेपियर: टीम इंडिया आणि न्यूझीलंडमध्ये तिसरा टी 20 सामना पावसामुळे मध्यावरच थांबवावा लागला. पावसाने या मॅचमध्ये व्यत्यय आणला. डकवर्थ लुईस नियमानुसार ही मॅच टाय झाली. टीम इंडियाने तीन टी 20 सामन्याची सीरीज 1-0 ने जिंकली आहे. पहिला सामना पावसामुळे रद्द झाला होता. दुसरा सामना टीम इंडियाने 65 धावांनी जिंकला होता.
आज न्यूझीलंडची टीम 160 रन्सवर ऑलआऊट झाली. भारताने लक्ष्याचा पाठलाग करताना 9 ओव्हर्समध्ये 4 विकेट गमावून 75 धावा केल्या होत्या. त्याचवेळी पावसाला सुरुवात झाली. हार्दिक पंड्याच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने दुसरी टी 20 सीरीज जिंकली आहे. याआधी आयर्लंड विरुद्ध सीरीज जिंकली होती.
डकवर्थ लुइस नियमानुसार तिसरी मॅच टाय झाली आहे. दुसरा सामना भारताने जिंकला होता. त्यामुळे भारताने तीन सामन्यांची न्यूझीलंड विरुद्ध सीरीज 1-0 ने जिंकली.
सामना 20 मिनिटात सुरु झाला नाही, तर तिसरी मॅच रद्द होईल. नेपियरमध्ये मोठा पाऊस कोसळतोय.
हा सामना सुरु झाला नाही, तर मॅच टाय होईल. DLS नुसार दोन्ही टीम्सचे स्कोअर बरोबर आहेत.
9 ओव्हर्समध्ये भारताच्या 4 बाद 75 धावा झाल्या आहेत. पंड्या 30 आणि हुड्डा 9 रन्सवर खेळतोय. पावसाचा जोर वाढल्यानंतर पंचांनी मॅच थांबवलीय.
8 ओव्हर अखेरीस भारताच्या 4 बाद 69 धावा झाल्याआहेत. दीपक हुड्डा आणि कॅप्टन हार्दिक पंड्याची जोडी मैदानात आहे.
न्यूझीलंडला सूर्यकुमार यादवच्या रुपाने भारताची मोठी विकेट मिळाली. ईश सोढीच्या गोलंदाजीवर त्याने फिलिप्सकडे सोपा झेल दिला. सूर्याने 10 चेंडूत 13 धावा केल्या. भारताच्या 4 बाद 62 धावा झाल्या आहेत. 7 ओव्हर अखेरीस भारताच्या 4 बाद 64 धावा झाल्या आहेत.
पावरप्लेच्या 6 ओव्हरमध्ये भारताच्या 3 बाद 58 धावा झाल्या आहेत. हार्दिक 23 आणि सूर्यकुमार 12 धावांवर खेळतोय.
5 व्या ओव्हरमध्ये धावफलकावर भारताच्या 50 धावा लागल्या. हार्दिक पंड्याने दबाव न घेता उलट गोलंदाजांवर हल्लाबोल केला. भारताच्या 5 ओव्हरमध्ये 50 धावा झाल्या आहेत. हार्दिक पंड्या 22 आणि सूर्यकुमार यादव 5 धावांवर खेळतोय
नागपूर : ‘आज जेल, कल बेल, फिर वही पुराना खेल’ गुंडाची व्हिडीओ व्हायरल, पोलीस वाहनातूनच इशारा देणाऱ्याविरोधात गुन्हा दाखल
एडम मिल्नेच्या ओव्हरमध्ये सूर्यकुमार यादव आणि हार्दिक पंड्याला जीवदान मिळालं. 4 ओव्हर्समध्ये भारताच्या 3/36 धावा झाल्या आहेत.
भारताचे दोन्ही ओपनर्स तंबूत परतले आहेत. ऋषभ पंतने साऊदीच्या गोलंदाजीवर सोढीकडे झेल दिला. त्याने 5 चेंडूत 11 धावा केल्या. श्रेयस अय्यरही पहिल्याच चेंडूबाद बाद झाला. त्याने स्लीपमध्ये नीशॅमकडे झेल दिला. तिसऱ्या ओव्हरमध्ये भारताच्या दोन विकेट गेल्या. टीम इंडियाची 22/3 अशी स्थिती आहे.
भारताच्या इनिंगला सुरुवात झाली आहे. 2 ओव्हर्समध्ये भारताच्या एक बाद 13 धावा झाल्या आहेत. इशान किशन मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नात सीमारेषेवर चॅपमॅनकरवी झेलबाद झाला. मिल्नेने ही विकेट काढली. त्याने 10 धावा केल्या. यात एक चौकार आणि एक षटकार आहे.
20 ओव्हर्समध्ये न्यूझीलंडची टीम 160 रन्सवर ऑलआऊट झाली. डेवॉन कॉनवे आणि ग्लेन फिलिप्स मैदानावर असे पर्यंत न्यूझीलंड मोठी धावसंख्या उभारेल असं वाटत होतं. पण हे दोघ आऊट होताच न्यूझीलंडचा डाव गडगडला. दोघांनी 86 धावांची भागीदारी केली. मोहम्मद सिराज आणि अर्शदीपने प्रत्येकी 4 विकेट घेतल्या. 146 ते 149 दरम्यान न्यूझीलंडने 6 विकेट गमावल्या. दोघांनी न्यूझीलंडची वाट लावली.
19 व्या ओव्हरच्या अखेरीस न्यूझीलंडच्या 9 बाद 155 धावा झाल्या आहेत. अर्शदीपने 4 ओव्हर्समध्ये 37 धावा देऊन 4 विकेट काढल्या.
अर्शदीप सिंहने क्लासिक यॉर्करवर ईश सोढीला शुन्यावर बोल्ड केलं. 18.2 ओव्हर्समध्ये 149 धावात न्यूझीलंडच्या 8 विकेट गेल्या आहेत.
मोहम्मद सिराजने आज भेदक गोलंदाजी केली. त्याने 4 ओव्हर्समध्ये 17 धावा देऊन 4 विकेट काढल्या. सँटनरला त्याने चहलकरवी 1 रन्सवर कॅचआऊट केलं. 18 ओव्हर अखेरीस न्यूझीलंडच्या 6 बाद 149 धावा झाल्या आहेत.
147 धावांवर न्यूझीलंडला मोहम्मद सिराजने आणखी एक धक्का दिला. त्याने नीशॅमला शुन्यावर ऋषभ पंतकरवी झेलबाद केलं. 17.1 ओव्हर्समध्ये न्यूझीलंडच्या 5 बाद 147 धावा झाल्या आहेत.
दमदार फलंदाजी करणारा कॉनवे OUT झाला आहे. अर्शदीपच्या गोलंदाजीवर त्याने इशान किशनकडे झेल दिला. 49 चेंडूत त्याने 59 धावा केल्या. यात 5 चौकार आणि 2 षटकार आहेत. 17 ओव्हर अखेरीस न्यूझीलंडच्या 4 बाद 147 धावा झाल्या आहेत.
12वी नंतरची डिग्री आता 4 वर्षांची, बॅचलर डिग्री यापुढे 4 वर्षांची असणार, UGC ने घेतला मोठा निर्णय, देशभरात आता BA, B COM, BSC डिग्री 4 वर्षांची असणार
अखेर मोहम्मद सिराजने धोकादायक ठरणारी कॉनवे-फिलिप्सची जोडी फोडली. भुवनेश्वर कुमारने फिलिप्सचा अप्रतिम झेल घेतला. 33 चेंडूत त्याने 54 धावा फटकावल्या. यात 5 चौकार आणि 3 षटकार आहेत. 16 ओव्हर अखेरीस न्यूझीलंडची 135/3 स्थिती आहे.
15 ओव्हर्सचा खेळ पूर्ण झालाय. न्यूझीलंडच्या 2 बाद 129 धावा झाल्या आहेत. डेवॉन कॉनवे आणि ग्लेन फिलिप्स दोघांनी भारतीय गोलंदाजांवर हल्लाबोल केला. कॉनवे 42 चेंडूत 53 धावांवर आणि फिलिप्स 32 चेंडूत 54 धावांवर खेळतोय.
14 व्या ओव्हरच्या अखेरीस न्यूझीलंडच्या 2 बाद 120 धावा झाल्या आहेत. डेवॉन कॉनवेने अर्धशतक झळकावलं.
13 वी ओव्हर टाकणाऱ्या चहलला ग्लेन फिलिप्सने धुतलं. या ओव्हरमध्ये 16 धावा निघाल्या. न्यूझीलंडच्या 105/2 धावा झाल्या आहेत.
12 ओव्हर अखेरीस न्यूझीलंडची स्थिती 89/2 आहे. कॉनवे 45 आणि फिलिप्स 22 धावांवर खेळतोय.
10 ओव्हर्सचा खेळ पूर्ण झालाय. न्यूझीलंडची स्थिती 74/2 आहे. कॉनवे-फिलिप्सची जोडी मैदानात आहे. चहलच्या या ओव्हरमध्ये 13 धावा निघाल्या.
वॉशिंग्टन सुंदरच्या जागी आजच्या सामन्यात हर्षल पटलेला संधी दिलीय. त्याने 9 वी ओव्हर टाकली. या षटकात त्याने 6 धावा दिल्या. न्यूझीलंडची स्थिती 61/2 आहे. कॉनवे 31 आणि फिलिप्स 8 धावांवर खेळतोय.
युजवेंद्र चहलने आठवी ओव्हर टाकली. न्यूझीलंडची स्थिती 55/2 आहे.
दीपक हुड्डाने सातवी ओव्हर टाकली. या षटकात फक्त 3 धावा निघाल्या. 49/2 अशी स्थिती आहे.
पावरप्लेच्या लास्ट ओव्हरमध्ये मोहम्मद सिराजने मार्क चॅपमन रुपाने न्यूझीलंडला दुसरा धक्का दिला. त्याने 12 चेंडूत 12 धावा केल्या. यात दोन चौकार होते. पावरप्लेच्या 6 ओव्हरमध्ये न्यूझीलंची 46/2 स्थिती आहे. डेवॉन कॉनवे आणि ग्लेन फिलिप्सची जोडी मैदानात आहे.
चौथी ओव्हर टाकणाऱ्या अर्शदीपला डेवॉन कॉनवेने धुतलं. त्याच्या ओव्हरमध्ये 19 धावा निघाल्या. चार ओव्हरमध्ये न्यूझीलंडची स्थिती 30/1 आहे.
भुवनेश्वर कुमारने तिसरी ओव्हर टाकली. त्याने फक्त 2 धावा दिल्या. डेवॉन कॉनवे आणि मार्क चॅपमॅनची जोडी मैदानात आहे.
भारत वि न्यूझीलंड तिसऱ्या टी 20 सामन्याला सुरुवात झाली आहे. दोन ओव्हर्सचा खेळ पूर्ण झालाय. न्यूझीलंडच्या 1 बाद 9 धावा झाल्या आहेत. सलामीवीर फिन एलनला अर्शदीपने पायचीत पकडलं. त्याने 3 धावा केल्या. डेवॉन कॉनवे आणि मार्क चॅपमॅनची जोडी मैदानात आहे.
इशान किशन, ऋषभ पंत, सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, हार्दिक पंड्या (कॅप्टन) दीपक हुड्डा, भुवनेश्वर कुमार, हर्षल पटेल, अर्शदीप सिंह, मोहम्मद शमी, युजवेंद्र चहल
न्यूझिलंडने टॉस जिंकला, पहिल्यांदा फलंदाजी करण्याचा निर्णय
न्यूझीलंडचा संभाव्य संघ:
फिन ऍलन, डेव्हॉन कॉनवे , मार्क चॅपमन, ग्लेन फिलिप्स, डॅरिल मिशेल, जेम्स नीशम, मिचेल सँटनर, टिम साउथी, इश सोधी, अॅडम मिल्ने आणि लॉकी फर्ग्युसन.
पावसामुळे मैदान ओलं आहे. त्यामुळे टॉसला विलंब होतोय. रिमझिम पाऊस सुरु आहे.
भारत आणि न्यूझीलंडमध्ये नेपियर येथे तिसरा टी 20 सामना होणार आहे. हार्दिक पंड्याच्या नेतृत्वाखाली टीम इंडिया 1-0 ने आघाडीवर आहे.