मुंबई: न्यूझीलंड विरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी भारताने (India vs New Zealand) कसोटी संघ जाहीर केला असून यावेळी काही नव्या चेहऱ्यांना संधी मिळाली आहे. पण यामधील एक खेळाडूचं संघात परतणं तसं थोड आश्चर्यकारकचं आहे. हा खेळाडू म्हणजे फिरकीपटू जयंत यादव (Jayant Yadav). तब्बल 4 वर्षानंतर संघात स्थान मिळालेल्या जयंतने 4 वर्षांपूर्वी ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी मालिकेत खास कामगिरी केली नसल्याने तो संघाबाहेर होता.
Jayant Yadav has been named in ??’s Test squad, as we take on the Kiwis at home ?⚔️
Wishing our all-rounder all the best for the series! ??#OneFamily @ICC pic.twitter.com/xWD2YhKOga
— Mumbai Indians (@mipaltan) November 12, 2021
भारतीय टेस्ट संघात श्रेयस अय्यर, प्रसिद्ध कृष्ण या नव्या खेळाडूंना जागा मिळाली असताना 4 वर्षानंतर संघात परतलेल्या जयंतने शेवटची कसोटी 2017 मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळली होती. या सामन्यात त्याने दोन्ही डावात केवळ 1-1 विकेट घेतला होता. हा सामनाही भारताने 303 धावांनी गमावला होता. जयंतने त्याचा टेस्ट डेब्यू इंग्लंड विरुद्ध वाइजॅग येथे 2016 मध्ये केला होता. आतापर्यंत त्याने 4 टेस्टमध्ये 11 विकेट्स घेतले आहेत. भारत आणि न्यूझीलंड यांच्यात 2 कसोटी सामने खेळवले जाणार आहेत. 25 नोव्हेंबर ते 29 नोव्हेंबर पहिला टेस्ट सामना तर 3 डिसेंबर ते 7 डिसेंबर दुसरा कसोटी सामना खेळवला जाणार आहे.
पहिल्या कसोटीसाठी टीम इंडियाचा संघ : अजिंक्य रहाणे (कर्णधार), चेतेश्वर पुजारा (उपकर्णधार), केएल राहुल, मयंक अग्रवाल, शुभमन गिल, श्रेयस अय्यर, वृद्धिमान साहा, केएस भरत, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, आर अश्विन, जयंत यादव, ईशांत शर्मा, यू. यादव, मोहम्मद सिराज, प्रसिद्ध कृष्ण.
बीसीसीआयने न्यूझीलंडविरुद्धच्या तीन सामन्यांच्या टी-२० मालिकेसाठी संघाची घोषणा मंगळवारी केली होती. टी-ट्वेन्टीच्या टीमचं कर्णधारपद रोहित शर्माकडे तर उपकर्णधारपदाची जबाबदारी केएल राहुलकडे सोपवण्यात आलीय. या मालिकेसाठी विराट कोहलीला विश्रांती देण्यात आली आहे.
हे ही वाचा
(India vs new zealand bcci announces test squad for series jayant yadav in team after 4 years)