कानपूर : टी-20 मालिकेत भारताने न्यूझीलंडचा सुपडा साफ केला आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या भारतीय संघाने 3 टी-20 सामन्याची मालिका सहज जिंकली. आता अजिंक्य रहाणे आणि विराट कोहली यांच्या कर्णधारपदाची कसोटी लागणार आहे. या दोघांवर न्यूझीलंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत क्लीन स्वीपसह कसोटीत नंबर वन होण्याच्या दिशेने वाटचाल करण्याची जबाबदारी असेल. कानपूर कसोटी अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वात खेळली जाईल, तर मुंबई कसोटीत संघ विराटच्या नेतृत्वात खेळेल. भारताने या दोन्ही कसोटी जिंकल्या तर कसोटीतील नंबर वन संघ बनण्याच्या दिशेने वाटचाल ठरु शकते. (India vs New Zealand first test match at Kanpur live streaming details in marathi, Ajinkya Rahane)
दरम्यान, उभय संघांमधील पहिला कसोटी सामना कानपूरमध्ये गुरुवारपासून खेळवला जाणार आहे. अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ ग्रीन पार्क स्टेडियमवर हा कसोटी सामना खेळणार आहे. न्यूझीलंडविरुद्धच्या कसोटी मालिकेतील पहिल्या सामन्यासाठी कर्णधार अजिंक्य रहाणे, चेतेश्वर पुजारा, इशांत शर्मा आणि मयंक अग्रवाल आणि इतर काही खेळाडूंनी 7 दिवस मुंबईत सराव केला. त्यानंतर हे खेळाडू दोन दिवसांपूर्वी कानपूरमध्ये दाखल झाले आहेत. आजही भारतीय संघाने नेट्समध्ये बराच वेळ सराव केला.
भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील पहिला कसोटी सामना कधी खेळवला जाईल?
भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील पहिला कसोटी सामना 25 नोव्हेंबरपासून (गुरुवार) सुरू होणार आहे.
भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील सामना कुठे होणार?
भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील सामना कानपूरच्या ग्रीनपार्क क्रिकेट स्टेडियमवर होणार आहे.
भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील सामना कधी सुरू होणार?
भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील सामना सकाळी 09.30 वाजता सुरू होईल. नाणेफेक ९ वाजता होईल.
भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील सामन्याचे थेट प्रक्षेपण कुठे पाहता येईल?
भारत आणि न्यूझीलंडमधील हा सामना स्टार स्पोर्ट्स नेटवर्कच्या चॅनेलवर वेगवेगळ्या भाषांमध्ये पाहता येईल.
मी भारत आणि न्यूझीलंडमधील सामन्याचं लाईव्ह स्ट्रीमिंग ऑनलाइन कुठे पाहू शकतो?
Disney+Hotstar वर लाइव्ह स्ट्रीमिंग सबस्क्रिप्शनसह सामना ऑनलाइन पाहता येईल. याशिवाय tv9marathi.com वरही सामन्याचे लाईव्ह अपडेट्स वाचता येतील.
पहिल्या कसोटीसाठी टीम इंडियाचा संघ : अजिंक्य रहाणे (कर्णधार), चेतेश्वर पुजारा (उपकर्णधार), केएल राहुल, मयंक अग्रवाल, शुभमन गिल, श्रेयस अय्यर, वृद्धिमान साहा, केएस भरत, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, आर अश्विन, जयंत यादव, ईशांत शर्मा, उमेश यादव, मोहम्मद सिराज, प्रसिद्ध कृष्ण. सूर्यकुमार यादव
न्यूझीलंडचा कसोटी संघ : केन विल्यमसन (कर्णधार), टॉम ब्लंडेल (यष्टीरक्षक), डेव्हॉन कॉनवे, काइल जेमिसन, टॉम लॅथम, हेन्री निकोल्स, एजाज पटेल, ग्लेन फिलिप्स, रचिन रवींद्र, मिचेल सँटनर, विल सोमरविले, टिम साउथी, रॉस टेलर, विल यंग, नील वॅगनर
इतर बातम्या
…तर ऑस्ट्रेलियन संघाला 15 वर्ष कर्णधार मिळणार नाही; मायकल क्लार्कने दाखवला आरसा
ICC T20I Rankings: केएल राहुल भारताचा नंबर 1 फलंदाज, कोहली टॉप-10 मधून बाहेर, रोहितची मोठी उडी
IPL 2022: आयपीएलचा 15 वा हंगाम ‘या’ तारखेपासून? CSK ची पहिली लढत कुणाशी?
(India vs New Zealand first test match at Kanpur live streaming details in marathi, Ajinkya Rahane)