कानपूर : टी-20 मालिकेत भारताने न्यूझीलंडला व्हाईटवॉश दिल्यानंतर उभय संघांमध्ये दोन कसोटी सामन्यांची मालिका खेळवली जात आहे. यामधील पहिला कसोटी सामना कानपूरच्या ग्रीन पार्क स्टेडियमवर पार पडला. हा सामना अनिर्णित राखण्यात किवी संघाला यश आलं आहे. आज सामन्याच्या शेवटच्या आणि निर्णायक दिवशी उभय संघांमध्ये मोठी चुरस पाहायला मिळाली. अवघ्या एका विकेटमुळे भारताच्या हातचा घास किवी संघाने हिरावला.
काल चौथ्या दिवशी भारताने आपला दुसरा डाव 7 बाद 234 धावांवर घोषित केला आणि न्यूझीलंडसमोर 284 धावांचे लक्ष्य ठेवले होते. कसोटी क्रिकेटच्या इतिहासात कधीही परदेशी संघाने भारतीय भूमीवर एवढ्या मोठ्या लक्ष्याचा पाठलाग केला नव्हता. न्यूझीलंडलादेखील ते शक्य झाले नाही. मात्र त्यांनी आपला संघ ऑल आऊट होऊ दिला नाही. न्यूझीलंडने आज दिवसअखेर 9 बाद 165 धावांपर्यंत मजल मारली. परिणामी हा सामना अनिर्णित राहिला.
भारताने प्रथम फलंदाजी करताना 345 धावा केल्या होत्या. तर न्यूझीलंडला पहिल्या डावात भारतीय गोलंदाजांनी 296 धावांत रोखले. त्यानंतर भारताने दुसरा डाव 7 बाद 234 धावांवर घोषित केला आणि न्यूझीलंडसमोर 284 धावांचे लक्ष्य ठेवले होते. त्या प्रत्युत्तरात खेळणाऱ्या न्यूझीलंडने 9 बाद 165 धावांपर्यंत मजल मारली. हा सामना वाचवण्यासाठी न्यूझीलंडच्या फलंदाजांनी खूप मेहनत घेतली. प्रामुख्याने न्यूझीलंडच्या तळाच्या फलंदाजांनी चांगली झुंज दिली. रचिन रवींद्र आणि एजाज पटेल या दोघांनी 9 वी विकेट गेल्यानंतर पुढचे 52 चेंडू खेळून काढले. 52 चेंडूत 10 धावांची नाबाद भागीदारी रचत या दोघांनी सामना वाचवला. अखेर अंधुक प्रकाशामुळे आजच्या दिवसाचा खेळ रद्द करण्यात आला.
कालच्या 1 बाद 4 धावांवरुन पुढे सुरुवात करणाऱ्या न्यूझीलंडच्या फलंदाजांनी आजच्या दिवसातलं पहिलं सत्र गाजवलं. सामन्याच्या पाचव्या दिवसातील पहिल्या सत्रात न्यूझीलंडच्या सलामीवीरांनी सामना त्यांच्या बाजूने झुकवला. त्यांनी पहिल्या सत्रात भारताला कोणत्याही प्रकारचं यश मिळू दिलं नाही. टॉम लॅथम (35 – पहिल्या सत्राच्या अखेरपर्यंत) आणि विल सोमरविले (36) या दोघांनी 76 धावांची नाबाद भागीदारी रचली होती. मात्र दुसऱ्या आणि तिसऱ्या सत्रात भारतीय गोलंदाजांनी चांगलंच पुनरागमन केलं. या दोन सत्रांमध्ये भारतीय गोलंदाजांनी 8 बळी घेतले.
So Near Yet So Far.
The first #INDvNZ Test in Kanpur ends in a draw. @Paytm #TeamIndia pic.twitter.com/dGckU0uBjl
— BCCI (@BCCI) November 29, 2021
न्यूझीलंडकडून या डावात सलामीवीर टॉम लॅथम (52) व्यतिरिक्त कोणत्याही फलंदाजाला मोठी खेळी करता आली नाही. विल सोमरविले (36), केन विलियम्सन (24), रॉस टेलर (2), हेन्री निकोलस (1), टॉम ब्लंडेल (2), काईल जेमिसन (5) आणि टिम साऊथी (4) मैदानात हजेरी लावून परतले. मात्र साऊथी बाद झाल्यानंतर रचिन रवींद्र आणि एजाज पटेलने पुन्हा विकेट जाऊ दिली नाही. दोघांनी अखेरपर्यंत किल्ला लढवला आणि सामना अनिर्णित सोडवला. भारताकडून या डावात रवींद्र जाडेजाने 4, रवीचंद्रन अश्विनने 3, अक्षर पटेलने 1 आणि उमेश यादवने एक विकेट घेतली.
भारताची चौथ्या दिवशी डावाची सुरुवात चांगली झाली नव्हती. सकळाच्या सत्रात सुरुवातीला भारताने चेतेश्वर पुजाराची (22) विकेट गमावली. त्यानंतर पाठोपाठ अजिंक्य रहाणेदेखील माघारी परतला. रहाणेनंतर मैदानात आलेला रवींद्र जाडेजादेखील शून्यावर बाद झाला. त्यामुळे भारताची आवस्था 5 बाद 51 अशी झाली होती. मात्र कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण करणाऱ्या श्रेयस अय्यरने रवीचंद्रन अश्विनच्या (32) साथीने भारताचा डाव सावरला. दोघांनी 6 व्या विकेटसाठी 52 धावांची भागीदारी केली. त्यानंतर आलेल्या ऋद्धीमान साहाला सोबत घेऊन श्रेयसने धावफलक हलता ठेवला. या दोघांनी 7 व्या विकेटसाठी 64 धावांची भागीदारी केली. श्रेयसने या डावात 8 चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने 65 धावांची खेळी केली. श्रेयस बाद झाल्यानंतर साहा आणि अक्सर पटेलने 8 व्या विकेटसाठी नाबाद 67 धावांची भागीदारी केली. या तीन भागीदाऱ्यांच्या जोरावर भारताने 7 बाद 234 धावांवर डाव घोषित केला. साहाने 126 चेंडूत 4 चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने 61 धावांची खेळी केली.
FIFTY!
A hard fought half-century for @Wriddhipops. His 6th 50 in Test cricket ??
Live – https://t.co/WRsJCUhS2d #INDvNZ @Paytm pic.twitter.com/aIir7ZKUeQ
— BCCI (@BCCI) November 28, 2021
भारतीय संघाला पहिल्या डावात 345 धावांवर रोखल्यानंतर दुसऱ्या दिवसअखेर न्यूझीलंडने धमाकेदार सुरुवात केली होती. न्यूझीलंडने दुसऱ्या दिवशी एकही गडी न गमावता 57 षटकांमध्ये 129 धावांपर्यंत मजल मारली होती. मात्र सामन्याच्या तिसऱ्या दिवशी भारतीय गोलंदाजांनी चांगलंच पुनरागमन केलं. भारतीय गोलंदाजांनी किवी संघाचा डाव 142.3 षटकांमध्ये 296 धावांवर रोखला. त्यामुळे टीम इंडियाला 49 धावांची नाममात्र आघाडी मिळाली.न्यूझीलंडच्या सलामीवीरांव्यतिरिक्त एकाही किवी फलंदाजाला मोठी खेळी उभारता आली नाही. आज सकाळच्या सत्रात रवीचंद्रन अश्विनने आक्रमक विल यंग याला 89 धावांवर असताना बाद करत भारताला ब्रेकथ्रू मिळवून दिला. यंगने 214 चेंडूत 15 चौकारांच्या मदतीने ही खेळी उभारली. त्यानंतर भारतीय गोलंदाजांनी ठराविक अंतराने एकेका किवी फलंदाजाला पव्हेलियनचा रस्ता दाखवला. याचदरम्यान, खेळपट्टीला चिकटून बसलेल्या टॉम लॅथम याला अक्षर पटेलने बाद केलं.
Stumps on Day 3 of the 1st Test.#TeamIndia lose the wicket of Shubman Gill in the second innings. Lead by 63 runs.
Scorecard – https://t.co/WRsJCUhS2d #INDvNZ @Paytm pic.twitter.com/d4uwQrosZR
— BCCI (@BCCI) November 27, 2021
लॅथमने 282 चेंडूत 10 चौकारांच्या मदतीने 95 धावांची खेळी केली. तर कर्णधार केन विलियम्सन (18), रॉस टेलर (11), हेन्री निकोलस (2), टॉम ब्लंडेल (13), रचिन रवींद्र (13) हे फलंदाज केवळ हजेरी लावून गेले. तसेच गोलंदाजांनादेखील काही चांगली कामगिरी करता आली नाही. काईल जेमिसनने 23 धावांचं योगदान दिलं. दरम्यान, भारताकडून फिरकीपटू अक्षर पटेलने सर्वात किफायतशीर गोलंदाजी केली. त्याने 34 षटकांपैकी 6 षटकं निर्धाव टाकत 62 धावा दिल्या, बदल्यात न्यूझीलंडचे 5 फलंदाज बाद केले. त्याला रवी अश्विननने 3 बळी घेत चांगली साथ दिली. उमेश यादवने धोकादायक केन विलियम्सनला पव्हेलियनचा रस्ता दाखवला. तर रवींद्र जाडेजाने एक विकेट घेतली.
गुरुवारी सामन्याच्या पहिल्या दिवशी कर्णधार अजिंक्य रहाणे याने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला होता. त्यानंतर टीम इंडियाचा पहिला डाव 345 धावांवर आटोपला. श्रेयस अय्यरचं शतक, शुभमन गिल आणि रवींद्र जाडेजाची अर्धशतकं यांच्या जोरावर भारताने पहिल्या डावात 345 धावांपर्यंत मजल मारली होती. अय्यर 105, शुभमन गिल 52, रवींद्र जाडेजा 50 आणि आर आश्विननं 38 धावांचं योगदान दिलं. न्यूझीलंडकडून टिम साऊथीने 5, काईल जेमिसनने 3 आणि एजाज पटेलने 2 विकेट घेतल्या. चेतेश्वर पुजारा (26) आणि कॅप्टन अजिंक्य रहाणे (35) यांच्याकडून मोठ्या खेळीची अपेक्षा असताना दोघे पुन्हा मोठी धावसंख्या उभारण्यात अपयशी ठरले. दोघांनी चांगली सुरुवात करुन देखील त्याचं रुपांतर मोठ्या धावसंख्येत त्यांना करता आलं नाही.
A dream start to his Test career and @ShreyasIyer15 is named the Player of the Match.✨@Paytm #TeamIndia #INDvNZ pic.twitter.com/BHbHwUz6b9
— BCCI (@BCCI) November 29, 2021
इतर बातम्या
प्रेयसीसोबत अनेक वर्षांची ‘पार्टनरशिप’, मुंबईकर ‘लॉर्ड’ शार्दुल ठाकूरचा साखरपुडा
IND vs NZ : टीम इंडिया धर्मसंकटात, विराट कोहलीसाठी कोणता फलंदाज बलिदान देणार?
‘माझी भारतीय संघात निवड करु नका’; हार्दिक पंड्याची निवड समितीला विनंती
(India vs New Zealand Kanpur Test draw, know what happened in 5 days)