कानपूर : येथील ग्रीन पार्क स्टेडियमवर भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील पहिला कसोटी सामना अखेर ड्रॉ झाला आहे. आज शेवटचा आणि निर्णायक दिवशी उभय संघांमध्ये मोठी चुरस पाहायला मिळाली. अवघ्या एका विकेटमुळे भारताच्या हातचा घास हिरावला गेला. काल भारताने दुसरा डाव 7 बाद 234 धावांवर घोषित केला आणि न्यूझीलंडसमोर 284 धावांचे लक्ष्य ठेवले होते. कसोटी क्रिकेटच्या इतिहासात कधीही परदेशी संघाने भारतीय भूमीवर एवढ्या मोठ्या लक्ष्याचा पाठलाग केला नव्हता. न्यूझीलंडलादेखील ते शक्य झाले नाही. मात्र त्यांनी आपला संघ ऑल आऊट होऊ दिला नाही. न्यूझीलंडने आज दिवसअखेर 9 बाद 165 धावांपर्यंत मजल मारली. परिणामी हा सामना अनिर्णित राहिला.
भारताने प्रथम फलंदाजी करताना 345 धावा केल्या होत्या. तर न्यूझीलंडला पहिल्या डावात भारतीय गोलंदाजांनी 296 धावांत रोखले. त्यानंतर भारताने दुसरा डाव 7 बाद 234 धावांवर घोषित केला आणि न्यूझीलंडसमोर 284 धावांचे लक्ष्य ठेवले होते. त्या प्रत्युत्तरात खेळणाऱ्या न्यूझीलंडने 9 बाद 165 धावांपर्यंत मजल मारली. हा सामना वाचवण्यासाठी न्यूझीलंडच्या फलंदाजांनी खूप मेहनत घेतली. प्रामुख्याने न्यूझीलंडच्या तळाच्या फलंदाजांनी चांगली झुंज दिली. रचिन रवींद्र आणि एजाज पटेल या दोघांनी 9 वी विकेट गेल्यानंतर पुढचे 52 चेंडू खेळून काढले. 52 चेंडूत 10 धावांची नाबाद भागीदारी रचत या दोघांनी सामना वाचवला. अखेर अंधुक प्रकाशामुळे आजच्या दिवसाचा खेळ रद्द करण्यात आला.
न्यूझीलंडचा 9 वा फलंदाज माघारी परतला आहे. रवींद्र जाडेजाने टिम साऊथीला 5 धावांवर असताना पायचित पकडले. त्यामुळे भारताला विजयासाठी 34 चेंडूत एका विकेटची आवश्यकता आहे.
न्यूझीलंडचा 8 वा फलंदाज माघारी परतला आहे. रवींद्र जाडेजाने काईल जेमिसनला 5 धावांवर असताना पायचित पकडले. त्यामुळे भारताला विजयासाठी 54 चेंडूत 2 विकेट्सची आवश्यकता आहे.
न्यूझीलंडचे 7 फलंदाज तंबूत परतले आहेत. रवी अश्विनने टॉम ब्लंडेलला त्रिफळाचित करुन किवी सघाला सातवा धक्का दिला. भारत आता विजयापासून केवळ तीन पावलं दूर आहे. (न्यूझीलंड 138/7)
भारताला मोठं यश मिळालं आहे. रवींद्र जाडेजाने केन विलियम्सनला 24 धावांवर असताना पायचित पकडलं. (न्यूझीलंड 128/6)
न्यूझीलंडचा अर्धा संघ तंबूत परतला आहे. अक्षर पटेलने हेन्री निकोलसला (1) पायचित पकडलं. (न्यूझीलंड 126/5)
भारताला चौथं यश मिळालं आहे. रवींद्र जाडेजाने रॉस टेलर 2 धावांवर असताना पायचित पकडलं. (न्यूझीलंड 125/4)
न्यूझीलंडने तिसरी विकेट गमावली आहे. रवीचंद्रन अश्विनने टॉम लॅथमला 52 धावांवर असताना त्रिफळाचित केलं. (न्यूझीलंड 118/3)
सलामीवीर टॉम लॅथमने अर्धशतक ठोकत न्यूझीलंडला मजबूत स्थितीत नेलं आहे. सोबत केन विलियम्सन 21 धावांवर खेळत आहे. 54 व्या षटकात विलियम्सनने रवींद्र जाडेजाच्या गोलंदाजीवर शानदार चौकार लगावला. (न्यूझीलंड 118/2)
टॉम लॅथम (49) आणि कर्णधार केन विलियम्सनने (14) चिवट फलंदाजी करत न्य़ूझीलंडचं शतक पूर्ण केलं आहे. 48 व्या षटकात विलियम्सनने इशांत शर्माच्या गोलंदाजीवर चौकार लगावत धावफलकावर न्यूझीलंडचं शतक पूर्ण केलं. (न्यूझीलंड 107/2)
भारताला दुसरी विकेट मिळवण्यात यश आलं आहे. उमेश यादवने विल सोमरविले याला 36 धावांवर असताना शुभमन गिलकरवी झेलबाद केलं. (न्यूझीलंड 79/2)
लोकसभेत कृषी कायदे मागे घेण्याचं विधेयक मांडलं
कृषीमंत्री नरेंद्रसिंह तोमर यांनी संसदेत विधेयक मांडलं
सामन्याच्या पाचव्या दिवसातील पहिल्या सत्रात न्यूझीलंडच्या सलामीवीरांनी सामना त्यांच्या बाजूने झुकवला आहे. त्यांनी पहिल्या सत्रात भारताला कोणत्याही प्रकारचं यश मिळू दिलं नाही. टॉम लॅथम (35) आणि विल सोमरविले (36) या दोघांनी 76 धावांची नाबाद भागीदारी रचली आहे. त्यामुळे न्यूझीलंडला आता विजयासाठी 59 षटकांमध्ये 205 धावांची आवश्यकता आहे. तर भारताला विजयासाठी 9 विकेट्स घेणं गरजेचं आहे.
नव्या व्हेरियंटबाबत आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत चर्चा झाली, या बाबतची माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे
या बैठकीत शाळा सुरू करण्याबाबत चर्चा झाली नाही. या बाबतचा निर्णय आरोग्य विभाग निर्णय घेईल
यामध्ये सर्व मंत्र्यांचं म्हणणं होतं की मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी सदर नियमावली बाबत चर्चा करावी
दुबईने 13 देशातील येणाऱ्या विमानांबाबत आणि प्रवाशांबाबत जी नियमावली केली आहे तशाच प्रकरे महाराष्ट्र मध्ये देखील असावी याबाबत चर्चा झाली आहे
मंत्र्यानी याबाबत मुख्यमंत्र्यांना आवाहन केलं आहे की त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी चर्चा करावी
सामन्याच्या चौथ्या दिवशी (काल) 3 धावांवर न्यूझीलंडने पहिली विकेट गमावली होती. त्यानंतर आज सलामीवीर टॉम लॅथम आणि विल सोमरविले या दोघांनी संयमी खेळ केला आहे. दोघांनी आतापर्यंत 50 धावांची नाबाद भागीदारी केली असून विजयाच्या दिशेने कूच केली आहे. परिणामी भारताच्या अडचणी वाढल्या आहेत. सोमरविलेने 4 चौकारांसह 26 तर लॅथमने 2 चौकारांसह 21 धावा जमवल्या आहेत.