IND vs NZ, 2nd Test, Day 1 Live Score: मयंक अग्रवालचं शतक, दिवसअखेर भारताची 4 बाद 214 पर्यंत मजल

| Updated on: Dec 04, 2021 | 6:04 AM

भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील दुसरा कसोटी सामना आजपासून मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर खेळवला जात आहे. आज या सामन्याचा पहिला दिवस आहे.

IND vs NZ, 2nd Test, Day 1 Live Score: मयंक अग्रवालचं शतक, दिवसअखेर भारताची 4 बाद 214 पर्यंत मजल
India vs New Zealand
Follow us on

भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील दुसरा कसोटी सामना आजपासून मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर खेळवला जात आहे. आज या सामन्याचा पहिला दिवस होता. पावसामुळे उशिरा सुरू झालेल्या या सामन्यात भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. मात्र तोपर्यंत पहिलं सत्र वाया गेलं होतं. त्यामुळे आज केवळ दोन सत्र खेळवण्यात आली आहे. यामध्ये भारताने 70 षटकांमध्ये 4 गड्यांच्या बदल्यात 214 धावा केल्या आहेत. मयंक अग्रवालच्या शतकाच्या जोरावर भारताने पहिला दिवस आपल्या नावे केला.

नाणेफेक जिंकून कर्णधाराने घेतलेला फलंदाजीचा निर्णय भारतीय सलामीवीरांनी योग्य ठरवला. मयंक अग्रवाल आणि शुभमन गिल या दोघांनी पहिल्या विकेटसाठी 80 धावांची भागीदारी केली. मात्र न्यूझीलंडचा फिरकीपटू एजाज पटेलने भारताची बिनबाद 80 वरुन 3 बाद 80 अशी अवस्था करुन ठेवली. त्याने आधी 44 धावांवर असलेल्या शुभमन गिलला बाद केलं. त्यानंतर एजाजने एकाच षटकात चेतेश्वर पुजारा आणि विराट कोहली या दोघांना पव्हेलियनचा रस्ता दाखवला. पुजारा आणि कोहली भोपळादेखील फोडू शकले नाहीत. त्यानंतर आलेल्या श्रेयस अय्यरलादेखील एजाजने फार वेळ मैदानात टिकू दिलं नाही. अय्यर 18 धावांवर बाद झाला. त्यानंतर मैदानात उतरलेल्या ऋद्धीमान साहाने पडझड होऊ दिली नाही. अग्रवाल आणि साहा या दोघांनी 5 व्या विकेटसाटी आतापर्यंत नाबाद 61 धावांची भागीदारी रचली आहे.

Key Events

भारताची प्लेइंग इलेव्हन

दुखापतीमुळे इशांत शर्मा, अजिंक्य रहाणे, रवींद्र जाडेजा या बड्या खेळाडूंना संघाबाहेर जावे लागले आहे. यांच्या जागी जयंत यादव आणि मोहम्मद सिराज यांना संघात स्थान मिळाले आहे. यासोबतच विराट कोहलीही या सामन्यातून पुनरागमन करत आहे.

भारतीय संघ : विराट कोहली (कर्णधार), मयंक अग्रवाल, शुभमन गिल, श्रेयस अय्यर, वृद्धिमान साहा, अक्षर पटेल, जयंत यादव, उमेश यादव, मोहम्मद सिराज

न्यूझीलंडची प्लेइंग इलेव्हन

केन विल्यमसनच्या कोपराला झालेल्या दुखापतीने डोकं वर काढलं आहे. त्यामुळेच संघ व्यवस्थापनाने त्याला विश्रांती दिली आहे. त्याच्या जागी डॅरिल मिशेलला संघात संधी मिळाली आहे.

न्यूझीलंडचा संघ: टॉम लॅथम, विल यंग, ​​डॅरिल मिशेल, रॉस टेलर, हेन्री निकोल्स, टॉम ब्लंडेल, रचिन रवींद्र, काइल जेमिसन, टिम साऊथी. एजाज पटेल, विल सोमरविले

LIVE Cricket Score & Updates

The liveblog has ended.
  • 03 Dec 2021 04:40 PM (IST)

    मयंक अग्रवालचं शानदार शतक, भारत सुस्थितीत

    सलामीवीर मयंक अग्रवालने शानदार शतक झळकावलं आहे. 59 व्या षटकात डॅरेल मिचेलच्या पहिल्याच चेंडूवर सुरेख चौकार लगावत मयंकने शतक पूर्ण केलं. त्याने 196 चेंडूत 13 चौकार आणि 3 षटकारांच्या मदतीने शतक पूर्ण केलं. (भारत 194/4)

  • 03 Dec 2021 04:15 PM (IST)

    भारताला चौथा धक्का, श्रेयस अय्यर 18 धावांवर बाद

    भारताने चौथी विकेट गमावली आहे. एजाज पटेलने श्रेयस अय्यरला टॉम ब्लंडेलकरवी झेलबाद केलं. श्रेयसने 18 धावांयं योगदान दिलं. (160/4)


  • 03 Dec 2021 03:25 PM (IST)

    मयंक अग्रवालचं अर्धशतक

    सलामीवीर मयंक अग्रवालने शानदार अर्धशतक झळकावलं आहे. मयंकने 37 व्या षटकात गोलंदाजी करणाऱ्या रचिन रवींद्रच्या तिसऱ्या चेंडूवर शानदार चौकार वसूल करत आपलं अर्धशतक पूर्ण केलं. त्याने 119 चेंडूत 51 धावांची खेळी साकारली आहे.

  • 03 Dec 2021 02:18 PM (IST)

    भारताला तिसरा झटका, कर्णधार विराट कोहली शून्यावर बाद

    भारताने तिसरी विकेट गमावली आहे. एजाज पटेलने विराट कोहलीला पायचित पकडलं. विराट खातंदेखील उघडू शकला नाही. (भारत 80/3)

  • 03 Dec 2021 02:14 PM (IST)

    भारताला दुसरा झटका, चेतेश्वर पुजारा शून्यावर बाद

    भारताने दुसरी विकेट गमावली आहे. एजाज पटेलने चेतेश्वर पुजाराला त्रिफळाचित केलं. पुजारा भोपळादेखील फोडू शकला नाही. (भारत 80/2)

  • 03 Dec 2021 02:02 PM (IST)

    न्यूझीलंडला पहिलं यश, शुभमन गिल 44 धावांवर बाद

    न्यूझीलंडला पहिलं यश मिळालं आहे. एजाज पटेलने शुभमन गिलला 44 धावांवर असताना रॉस टेलकरवी झेलबाद केलं. (भारत 80/1)

  • 03 Dec 2021 01:21 PM (IST)

    भारतीय सलामीवीरांचा संयमी खेळ, 19 षटकांत अर्धशतक

    भारतीय सलामीवीरांनी संयमी सुरुवात केली आहे, 19 षटकांतील पहिल्या चेंडूवर शुभमन गिलने एक धाव घेत भारताचं अर्धशतक पूर्ण केलं. तसेच याच षटकात मयंक अग्रवालने एक चौकारदेखील वसूल केला. (भारत 54/0)

  • 03 Dec 2021 12:54 PM (IST)

    मनसे जिल्हाध्यक्ष प्रशांत नवगिरे यांनी फोडला पुणे-हैद्राबाद रोडवरील फुलवाडी टोलनाका

    उस्मानाबाद

    मनसे जिल्हाध्यक्ष प्रशांत नवगिरे यांनी फोडला पुणे हैद्राबाद रोडवरील फुलवाडी टोलनाका

    तुळजापूर तालुक्यातील मुंबई – हैद्राबाद राष्ट्रीय महामार्गावरील फुलवाडी येथील टोलनाका फोडला

    टोल महामार्गावरील उड्डाणपुले, सव्हिस रोड, व्हिलेज रोड व इतर सर्वच कामे अर्धवट

    महामार्गावर मोठे खड्डे व कामे अर्धवट असताना टोल वसुली विरोधात आंदोलन

    खड्यामुळे अपघात होऊन हजारो निरपराध लोकांचे बळी

    जिल्हाध्यक्ष नवगिरे यांचेवर नळदुर्ग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

  • 03 Dec 2021 12:54 PM (IST)

    जागतिक दिव्यांग दिनी दिव्यांग बांधवांनी अंगावर पेट्रोल ओतून केले आत्मदहन आंदोलन

    यवतमाळ-

    जागतिक दिव्यांग दिनी दिव्यांग बांधवांनी अंगावर पेट्रोल ओतून केले आत्मदहन आंदोलन

    यवतमाळ च्या उमरखेड नगर परिषद आवारात केले आंदोलन

    अपंगांचा 3 टक्के निधी दिव्यांग बांधवाना वाटप करावा या मागणीसाठी केले आंदोलन

    प्रहार आणि दिव्यांग संघटनेने केले आंदोलन

    पोलिसांनी आंदोलकांना घेतले ताब्यात

  • 03 Dec 2021 12:29 PM (IST)

    पुणे महापालिकेच्या दारातच भाजपचे बेकायदा होर्डिंग

    पुणे महापालिकेच्या दारातच भाजपचे बेकायदा होर्डिंग

    आज भाजपच्या नवीन कार्यालयाचा उदघाटन सोहळा

    भाजप कार्यकर्त्यांनी कार्यालयाच्या उदघाटनाचे लावले बेकायदा फ्लेक्स

    देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार उदघाटन

    सर्वसामान्य नागरिकांवर तात्काळ कारवाईचा बडगा उचलणाऱ्या पालिका अधिकाऱ्यांना महापालिकेच्या प्रवेशद्वारावरचे फ्लेक्स दिसेना

  • 03 Dec 2021 12:28 PM (IST)

    साहित्य संमेलनाच्या अभिजात मराठी दालन प्रदर्शनाचे उद्घाटन

    नाशिक – साहित्य संमेलनाच्या अभिजात मराठी दालन प्रदर्शनाचे उद्घाटन

    उद्योग मंत्री सुभाष देसाई आणि छगन भुजबळ यांच्या उपस्थितीत उदघाटन

    खासदार श्रीनिवास पाटील हे देखील उपस्थित

  • 03 Dec 2021 12:26 PM (IST)

    शुभमन गिलची दणक्यात सुरुवात

    डावातील दुसऱ्याच षटकात सलामीवीर शुभमन गिलने आक्रमक पवित्रा घेतला आहे. काईल जेमिसनच्या या षटकात शुभमन गिलने तीन चौकार लगावले. (भारत 12/0)

  • 03 Dec 2021 12:21 PM (IST)

    विराट कोहलीने टॉस जिंकला

    भारतीय कर्णधार विराट कोहलीने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. न्यूझीलंडचा संघ प्रथम गोलंदाजी करेल