India vs New Zealand WTC Final 2021 : India vs New Zealand WTC Final 2021 : पहिल्या जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा अंतिम सामना (WTC Final 2021) भारत आणि न्यूझीलंड (India vs New Zealand) या उभय संघांमध्ये होणार आहे. साऊथॅम्प्टनमध्ये (Southampton) आजपासून या सामन्याला सुरुवात होणार होती. परंतु पावसामुळे आजच्या दिवसाचा खेळ रद्द करण्यात आला असल्याची माहिती बीसीसीआयकडून देण्यात आली आहे. उद्या स्थानिक वेळेनुसार सकाळी 10.30 वाजता (भारतीय प्रमाण वेळेनुसार ठीक 3 वाजता) खेळाला सुरुवात केली जाईल, अशी माहिती बीसीसीआयकडून देण्यात आली आहे. आयसीसीने या सामन्यासाठी एक दिवस राखीव ठेवला होता. त्यामुळे हा सामना 19 जून ते 23 जूनदरम्यान खेळवला जाईल. (India vs New Zealand live score WTC Final 2021 1st Day Match Scorecard online Southampton in marathi)
साऊथॅम्प्टनमध्ये अजूनही पाऊस सुरुच आहे, त्यामुळे पहिल्या दिवसाचा खेळ रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. उद्या स्थानिक वेळेनुसार सकाळी 10.30 वाजता खेळाला सुरुवात केली जाईल, अशी माहिती बीसीसीआयकडून देण्यात आली आहे.
UPDATE – Unfortunately, play on Day 1 has been called off due to rains. 10.30 AM local time start tomorrow.#WTC21
— BCCI (@BCCI) June 18, 2021
It’s still raining at the Hampshire Bowl in Southampton as we await the start of play #WTC21 Final | #INDvNZ pic.twitter.com/CTSezyi4VZ
— ICC (@ICC) June 18, 2021
भारतीय प्रमाण वेळेनुसार ठीक 3 वाजता या सामन्याला सुरुवात होणार होती. परंतु साऊथॅम्प्टनमध्ये आज सकाळपासून जोरदार पाऊस झाला. त्यामुळे टॉसला उशीर होणार आहे. निराशाजनक गोष्ट ही आहे की सामन्याच्या पहिल्या दिवशीचं पहिलं सेशनही रद्द करण्यात आलं आहे. आशा आहे लंचनंतर तरी सामन्याचं दुसरं सेशन सुरु होईल.
Good morning from Southampton. We are just over an hour away from the scheduled start of play but It continues to drizzle here. The match officials are on the field now. ☔ #WTC21 pic.twitter.com/Kl77pJIJLo
— BCCI (@BCCI) June 18, 2021
Update: Unfortunately there will be no play in the first session on Day 1 of the ICC World Test Championship final. #WTC21
— BCCI (@BCCI) June 18, 2021
वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या अंतिम सामन्यात टॉसचा बॉस कोण होणार, याकडे समस्त क्रिकेटप्रेमींचं लक्ष लागलंय.
अंतिम सामन्याचं मैदान मारणं ही भारतासाठी सर्वांत मोठी संधी आहे. माझ्या कर्णधार विराटसह सगळ्या संघाला शुभेच्छा आहेत. सगळ्याच खेळाडूंनी मोठ्या मेहनीतने इथपर्यंतचा प्रवास केलाय. त्यांच्या मेहनतीमुळेच भारतीय संघ आज अंतिम सामना खेळतो आहे. अंतिम सामना खेळताना संघावर दबाव जरुर असेल. पण भारतीय टीमने दबाव झुगारन खेळावं. अंतिम सामन्यात जर भारताने टॉस जिंकला तर विराटने प्रथम बॅटिंग करण्याचा निर्णय घ्यावा, असा सल्ला गांगुलीने दिला आहे.
वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या अंतिम सामन्याला (WTC Final 2021) सुरुवात व्हायला अगदी काही मिनिटांचा अवधी शिल्लक आहे. तत्पूर्वी सामन्यात टॉस हा महत्त्वाचा फॅक्टर आहे. पुढच्या 15 मिनिटांमध्ये भारतीय कर्णधार विराट कोहली आणि किवी कर्णधार केन विल्यमसन टॉससाठी मैदानात येतील.