नेपियर: टीम इंडियाने रविवारी न्यूझीलंड विरुद्ध दुसऱ्या टी 20 सामन्यात शानदार खेळ दाखवला. यजमान न्यूझीलंडवर विजय मिळवून मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली. या सीरीजमधला पहिला सामना शुक्रवारी होणार होता. पण पावसामुळे हा सामना रद्द झाला. दुसरा सामना टीम इंडियाने जिंकला. त्यामुळे आता मालिका पराभवाचा धोका टळलाय.
आता टीम इंडिया ही सीरीज जिंकू शकते किंवा ड्रॉ होईल. सीरीजचा तिसरा आणि शेवटचा सामना मंगळवारी खेळला जाईल. टीम इंडियाचा सामन्यासह सीरीज जिंकण्याचा प्रयत्न असेल.
विलयम्सनच्या जागी कोण नेतृत्व करणार?
मायदेशात मालिका गमावण्याची वेळ येऊ नये, यासाठी न्यूझीलंड तिसरा सामना जिंकण्याचा आपल्याबाजूने पूर्ण प्रयत्न करेल. एकाबाजूने हा सामना न्यूझीलंडसाठी प्रतिष्ठेचा विषय आहे. या मॅचआधी त्यांना एक मोठा झटका बसलाय. नियमित कॅप्टन स्टार फलंदाज केन विलयम्सना तिसऱ्या टी 20 सामन्यात खेळणार नाहीय. मेडिकल अपॉइंटमेंटमुळे त्याला मॅच खेळता येणार नाही. त्याच्याजागी टीम साऊदी नेतृत्व करेल. विलयम्सन वनडे सीरीजसाठी उपलब्ध
म्हणून भारताची बाजू वरचढ
न्यूझीलंडची टीम आधीपासूनच दबावाखाली आहे. त्यात त्यांचा कॅप्टनच तिसरा सामना खेळणार नाहीय. त्यामुळे यजमान संघाच्या अडचणी वाढू शकतात. तिसऱ्या मॅचमध्ये भारताची बाजू वरचढ असेल. दोन्ही टीम्समधील मागच्या 9 सामन्यांवर नजर टाकली, तर भारताची बाजू सरस आहे. सगळ्याच मॅचमध्ये टीम इंडियाने बाजी मारली आहे. हार्दिक पंड्याच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने एकही सामना गमावलेला नाही. पंड्याने चार सामन्यात भारताच नेतृत्व केलय, हे सगळेच सामने भारताने जिंकलेत.
कधी खेळला जाणार भारत विरुद्ध न्यूझीलंड तिसरा टी 20 सामना ?
भारत आणि न्यूझीलंडमध्ये तीन टी 20 सामन्यांची सीरीज सुरु आहे. तिसरा सामना मंगळवारी 22 नोव्हेंबरला होणार आहे.
भारत आणि न्यूझीलंडमध्ये तिसरा टी 20 सामना कुठे खेळला जाणार?
भारत आणि न्यूझीलंडमध्ये तीन टी 20 सामन्याच्या सीरीजचा तिसरा सामना नेपियरच्या मॅक्लीन पार्क मध्ये खेळला जाणार आहे.
कधी सुरु होणार भारत-न्यूझीलंडमध्ये तिसरी टी 20 मॅच ?
भारत आणि न्यूझीलंडमध्ये तीन टी 20 सामन्याच्या सीरीजचा तिसरा सामना दुपारी 12 वाजता खेळला जाणार आहे. टॉस सकाळी 11.30 वाजता उडवला जाईल.
भारत-न्यूझीलंड तिसऱ्या टी 20 मॅचच लाइव्ह टेलिकास्ट कुठे होणार?
भारत-न्यूझीलंडमधील तिसऱ्या टी 20 मॅचच लाइव्ह टेलीकास्ट दूरदर्शनवर होणार आहे.
भारत-न्यूझीलंडमधील तिसऱ्या टी 20 मॅचच लाइव्ह स्ट्रीमिंग कुठे होणार?
भारत-न्यूझीलंडमधील तिसऱ्या टी 20 मॅचच लाइव्ह स्ट्रीमिंग एमेजॉन प्राइमवर होणार आहे.