मुंबई : मुंबईतील अवकाळी पावसामुळे भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील दुसऱ्या कसोटी सामन्याचा पहिल्या दिवसाचा खेळ विस्कळीत होऊ शकतो. पावसामुळे वानखेडे स्टेडियमची खेळपट्टी गोलंदाजांसाठी अनुकूल असेल अशी अपेक्षा आहे. बुधवारी दिवसभर पावसामुळे दोन्ही संघांना सराव सत्र रद्द करावे लागले. गुरुवारीही पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला असून आउटफील्ड ओलं राहील. अशा परिस्थितीत भारतीय संघ वांद्रे-कुर्ला संकुलातील मैदानावर सराव करु शकतो कारण तिथे इनडोअर सरावाची व्यवस्था आहे, वानखेडे स्टेडियमवर तशी व्यवस्था नाही. वानखेडे स्टेडियमच्या खेळपट्टीवर अजिबात गवत नाही, ज्यामुळे संथ गोलंदाजांना मदत होईल. (India vs New Zealand, Mumbai weather forecast: Heavy rain threaten to play 2nd Test at Wankhede)
उभय संघांमध्ये शुक्रवारपासून सुरू होणाऱ्या कसोटीत वानखेडेची खेळपट्टी वेगवान गोलंदाज आणि फिरकीपटू दोघांनाही मदत करेल अशी अपेक्षा आहे. संततधार पावसामुळे खेळपट्टी झाकून ठेवण्यात आली आहे. आद्रतेमुळे खेळपट्टी नक्कीच वेगवान गोलंदाजांना अधिक मदत करेल, परंतु अशा विकेटमुळे फिरकीपटूंनाही चांगला टर्न मिळेल. शुक्रवारीदेखील पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे, पण दोन्ही संघ, विशेषतः भारत दुसऱ्या ते पाचव्या दिवशी हवामान खराब होऊ नये अशी प्रार्थना करेल.
हवामान खात्याचे म्हणणे आहे की 2 डिसेंबरनंतर पावसाचा जोर कमी होऊ शकतो. चांगला सूर्यप्रकाश असू शकतो, असेही हवामान विभागने म्हटले आहे. दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना अनिर्णित राहिला. कानपूर कसोटीत टीम इंडिया विजयापासून एक विकेट दूर होती. त्यामुळे तो सामना अनिर्णित राहिला. आता मुंबई कसोटी सामना जिंकून मालिका खिशात घालण्याचा प्रयत्न भारतीय संघ करेल.
या सामन्यासाठी भारतीय संघाच्या संयोजनाकडेही सर्वांचे लक्ष लागले आहे. कर्णधार विराट कोहलीचे प्लेइंग इलेव्हनमध्ये पुनरागमन झाल्यामुळे मयंक अग्रवालचे बाहेर पडणे जवळपास निश्चित झाले आहे. कारण मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड आणि गोलंदाजी प्रशिक्षक पारस महांबरे यांच्यासह सपोर्ट स्टाफने खराब फॉर्मशी झगडत असलेल्या अजिंक्य रहाणेला पाठिंबा दिला आहे. वेगवान गोलंदाजीसाठी अनुकूल परिस्थिती लक्षात घेता इशांत शर्माच्या जागी मोहम्मद सिराजचा संघात समावेश केला जाऊ शकतो. याशिवाय उमेश यादवही संघात असेल. टीम इंडिया तीन फिरकीपटूंसह मैदानात उतरणार होती. यामध्ये रवीचंद्रन अश्विन, रवींद्र जाडेजा आणि अक्षर पटेलचा समावेश होता. मात्र खेळपट्टी जर जलदगती गोलंदाजांना साथ देईल असे वाटले तर अक्षर पटेलला बाहेर बसावं लागेल आणि इशांत शर्माला संधी मिळू शकते.
इतर बातम्या
IND vs NZ : भारत विरुद्ध न्यूझीलंड मुंबई कसोटी सामन्यात कोणाचं पारडं जड, पाहा आतापर्यंतची आकडेवारी
Cricket :जसप्रीत बुमराहची टेस्ट रँकिंगमध्ये घसरण, शाहीन आफरीदीची टॉप 5 पर्यंत मजल
IPL 2022 : विराट कोहलीच्या जागी हा खेळाडू होणार आरसीबी टीमचा नवा कॅप्टन
(India vs New Zealand, Mumbai weather forecast: Heavy rain threaten to play 2nd Test at Wankhede)