मुंबई : मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील दुसऱ्या कसोटी सामन्याचा आज दुसरा दिवस आहे. कालच्या 4 बाद 221 वरुन पुढे खेळणाऱ्या भारतीय संघाला एकट्या एजाज पटेलने लोळवलं. काल मयंक अग्रवाल 120 धावांवर नाबाद होता त्याने आज 30 धावांचं योगदान दिलं. मयंक 150 धावांवर असताना एजाज पटेलचा बळी ठरला. आज अक्षर पटेलने अर्धशतकी खेळी करत अखेरच्या षटकांमध्ये भारताला 300 पार नेलं. मात्र त्यालादेखील एजाजनेच पायचित केलं. दरम्यान, भारताचा डाव 325 धावांवर संपुष्टात आला आहे. मयंक आणि अक्षरव्यतिरिक्त कोणत्याही भारतीय फलंदाजाला मोठी खेळी करता आली नाही. काल सलामीवीर शुभमन गिलने 44 धावांचं योगदान दिलं होतं. दरम्यान, भारताचे 3 फलंदाज भोपळ्यावर परतले आहेत. त्यामध्ये चेतेश्वर पुजारा, विराट कोहली आणि रवीचंद्रन अश्विन या तिघांचा समावेश आहे. एजाज पटेलने एकट्याने भारताचे सर्व फलंदाज बाद केले. (India vs New Zealand : NZ unwanted record, all out at 62 runs, Ravichandran Ashwin Brilliance, Virat kohli shines as captain)
दरम्यान, भारताला 325 धावांत रोखल्यानंतर पहिल्या डावात फलंदाजीसाठी उतरलेल्या न्यूझीलंडची अवस्था खूपच वाईट झाली आहे. भारतीय गोलंदाजांनी अवघ्या 62 धावांमध्ये न्यूझीलंडचा डाव गुंडाळला आहे. न्यूझीलंडकडून काईल जेमिनसनने सर्वाधिक 17 धावांचं योगदान दिलं. सलामीवीर टॉम लॅथमला 10 धावा जोडता आल्या. या दोघांपैकी कोणत्याही किवी फलंदाजाला दुहेरी धावसंख्या गाठता आली नाही. न्यूझीलंडचे 3 फलंदाज भोपळ्यावर माघारी परतले. दरम्यान, भारताकडून रवीचंद्नन अश्विनने सर्वात किफायतशीर गोलंदाजी केली. त्याने 8 षटकात 8 धावा देत 4 बळी घेतले. तर मोहम्मद सिराज भारताचा दुसरा सर्वात यशस्वी गोलंदाज ठरला. त्याने 4 षटकात 19 धावा देत 3 बळी घेतले. तसेच अक्षर पटेलला 2 आणि जयंत यादवला एक विकेट मिळवता आली.
Innings Break!
A session dominated by #TeamIndia as New Zealand are all out for 62 runs.
Scorecard – https://t.co/CmrJV47AeP #INDvNZ @Paytm pic.twitter.com/8Pg9fVkFmN
— BCCI (@BCCI) December 4, 2021
न्यूझीलंडचा संघ आज अवघ्या 62 धावांत गारद झाला. न्यूझीलंडच्या कसोटी क्रिकेट इतिहासातील ही सहावी नीचांकी धावसंख्या आहे. त्याच वेळी, कोणत्याही आशियाई संघाविरुद्ध 62 धावा ही न्यूझीलंडची सर्वात खराब कामगिरी आहे.
विराट कोहली कर्णधार असतानाच भारताविरुद्धच्या 3 सर्वात नीचांकी धावसंख्या उभारल्या गेल्या आहेत. विराटच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या भारताने न्यूझीलंडला 62 धावांत गुंडाळले. दक्षिण आफ्रिकेचा संघही भारताविरुद्ध 79 धावांत गारद झाला होता. तसेच इंग्लंडला भारताविरुद्ध 81 धावा करता आल्या होत्या.
रविचंद्रन अश्विनने 50 वेळा एका डावात 4 विकेट घेण्याचा पराक्रम केला आहे. ही कामगिरी करणारा तो अनिल कुंबळेनंतर दुसरा भारतीय ठरला आहे. कुंबळेने आपल्या कसोटी कारकिर्दीत 66 वेळा एका डावात 4 विकेट्स घेतल्या आहेत. आर अश्विनने 2021 मध्ये 48 कसोटी विकेट घेतल्या आहेत. तो यावर्षी सर्वाधिक विकेट घेणारा गोलंदाज ठरला आहे.
Second wicket for @ashwinravi99 as New Zealand are 7 down in the first innings.
Live – https://t.co/KYV5Z1jAEM #INDvNZ @Paytm pic.twitter.com/FvKnpZ3te8
— BCCI (@BCCI) December 4, 2021
इतर बातम्या
कसोटी आणि वनडे खेळण्यासाठी टीम इंडिया दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर जाणार, टी-20 मालिका स्थगित
IND vs NZ | विराट कोहली पुन्हा 0 वर बाद, अंपायरच्या निर्णयावर सवाल उपस्थित
(India vs New Zealand : NZ unwanted record, all out at 62 runs, Ravichandran Ashwin Brilliance, Virat kohli shines as captain)