मुंबई : भारत विरुद्ध न्यूझीलंड (India vs New Zealand) यांच्यातील दुसरी कसोटी मॅच (Second Test) आजपासून मुंबईतील (Mumbai) वानखेडे स्टेडियमवर (Wankhede Stadium) होणार आहे. अजिंक्य रहाणेच्या नेतृत्त्वात पहिल्या कसोटीतील विजयापासून टीम इंडिया केवळ एका विकेटनं दूर राहिली होता. विराट कोहली दुसऱ्या कसोटीमध्ये नेतृत्त्व करणार आहे. मुंबई कसोटीमध्ये तरी टीम इंडिया न्यूझीलंडच्या टीमला पराभवाचा झटका देत मालिकेत विजय मिळवणार का हे पाहावं लागणार आहे.
पहिल्या कसोटीमध्ये चांगली खेळी करण्यास अपयशी ठरलेल्या अजिंक्य रहाणे आणि चेतेश्वर पुजारा यांना मुंबई कसोटीमध्ये संधी मिळणार का हे पाहावं लागणार आहे. तर, मुंबई कसोटीवर पावसाचं सावट राहण्याची शक्यता देखील वर्तवण्यात आली आहे.
भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील दुसरा कसोटी सामना कधी खेळवला जाईल?
भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील दुसरा कसोटी सामना 3 डिसेंबरपासून (शुक्रवार) सुरू होणार आहे.
भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील सामना कुठे होणार?
भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील सामना मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर होणार आहे.
भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील सामना कधी सुरू होणार?
भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील सामना सकाळी 09.30 वाजता सुरू होईल. नाणेफेक 9 वाजता होईल.
भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील सामन्याचे थेट प्रक्षेपण कुठे पाहता येईल?
भारत आणि न्यूझीलंडमधील हा सामना स्टार स्पोर्ट्स नेटवर्कच्या चॅनेलवर वेगवेगळ्या भाषांमध्ये पाहता येईल.
मी भारत आणि न्यूझीलंडमधील सामन्याचं लाईव्ह स्ट्रीमिंग ऑनलाइन कुठे पाहू शकतो?
Disney+Hotstar वर लाइव्ह स्ट्रीमिंग सबस्क्रिप्शनसह सामना ऑनलाइन पाहता येईल. याशिवाय tv9marathi.com वरही सामन्याचे लाईव्ह अपडेट्स वाचता येतील.
दुसऱ्या कसोटीसाठी टीम इंडिया : विराट कोहली (कर्णधार) अजिंक्य रहाणे, चेतेश्वर पुजारा, केएल राहुल, मयंक अग्रवाल, शुभमन गिल, श्रेयस अय्यर, वृद्धिमान साहा, केएस भरत, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, आर अश्विन, जयंत यादव, ईशांत शर्मा, उमेश यादव, मोहम्मद सिराज, प्रसिद्ध कृष्ण. सूर्यकुमार यादव
न्यूझीलंडचा कसोटी संघ : केन विल्यमसन (कर्णधार), टॉम ब्लंडेल (यष्टीरक्षक), डेव्हॉन कॉनवे, काइल जेमिसन, टॉम लॅथम, हेन्री निकोल्स, एजाज पटेल, ग्लेन फिलिप्स, रचिन रवींद्र, मिचेल सँटनर, विल सोमरविले, टिम साउथी, रॉस टेलर, विल यंग, नील वॅगनर
इतर बातम्या:
IND vs NZ : पहिली टेस्ट ड्रॉ, मुंबई कसोटीवर पावसाचं सावट, टीम इंडियाचं मालिका विजयाचं स्वप्न भंगणार?
IND vs NZ : भारत विरुद्ध न्यूझीलंड मुंबई कसोटी सामन्यात कोणाचं पारडं जड, पाहा आतापर्यंतची आकडेवारी
India vs New Zealand second test match at Wankhede Stadium where and when to watch live streaming details in Marathi