Sanju Samson: कधीपर्यंत संजू सॅमसन फक्त प्रेक्षकाच्या भूमिकेत राहणार?

| Updated on: Nov 21, 2022 | 6:03 PM

Sanju Samson ला संधी मिळत नसल्याने विरोधाचे स्वर तीव्र होऊ लागलेत. लिंकवर क्लिक करुन फॅन्सच्या Reaction तर बघा....

Sanju Samson: कधीपर्यंत संजू सॅमसन फक्त प्रेक्षकाच्या भूमिकेत राहणार?
संजू सॅमसन
Image Credit source: social
Follow us on

नेपियर: टीम इंडियाने न्यूझीलंड विरुद्ध दुसऱ्या टी 20 सामन्यात शानदार विजय मिळवला. टीम इंडियाने हा सामना 65 धावांनी जिंकला. या मॅचसाठी संजू सॅमसनला प्लेइंग 11 मध्ये स्थान मिळालं नव्हतं. त्यावरुन आता प्रश्न विचारले जातायत. संजू सॅमसनच्या जागी ऋषभ पंतला प्राधान्य दिलं. पण तो पुन्हा एकदा अपयशी ठरला. त्याने 13 चेंडूत फक्त 6 धावा केल्या. संजू सॅमसन आपला शेवटचा टी 20 सामना वेस्ट इंडिज दौऱ्यावर खेळला होता. तेव्हापासून तो संधीच्या प्रतिक्षेत आहे.

हे टीम इंडियाच्या फायद्याच नाही

मंगळवारी होणाऱ्या तिसऱ्या टी 20 सामन्यात संजू सॅमसनला संधी मिळण्याची शक्यता फारच कमी आहे. त्यावर आता फॅन्ससह माजी क्रिकेटपटू प्रश्न उपस्थित करतायत.

संजू सॅमसनला बेंचवर बसवून ठेवणं, टीम इंडियाच्या हिताच नाहीय, असं पाकिस्तानचा माजी फिरकी गोलंदाज दानिश कनेरियाने म्हटलय. संजू सॅमसन शानदार फलंदाज आहे. तो स्वबळावर मॅच जिंकून देऊ शकतो, असं कनेरियाच मत आहे.

कधीपर्यंत संधी देणार नाही?

काही दिवसांपूर्वी टीम इंडियाचे माजी हेड कोच रवी शास्त्री यांनी सुद्धा संजू सॅमसनला संधी दिली नाही, त्याबद्दल प्रश्न विचारले होते. दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या टी 20 मालिकेसाठी संजू सॅमसनला संधी मिळाली नव्हती.
आशिया कप आणि टी 20 वर्ल्ड कपसाठी सुद्धा संजूच्या नावाचा विचार झाला नाही. त्याच्याजीग दिनेश कार्तिक आणि ऋषभ पंतला प्राधान्य दिलं. दोघेही अपयशी ठरले.