IND vs NZ: उमरान 155 KMPH वेगाने गोलंदाजी करतो, पण फायदा होतो अर्शदीपला, जाणून घ्या कसं?

| Updated on: Nov 29, 2022 | 4:30 PM

IND vs NZ: उमरानच्या गोलंदाजीमुळे अर्शदीपला कसा फायदा होतो?

IND vs NZ: उमरान 155 KMPH वेगाने गोलंदाजी करतो, पण फायदा होतो अर्शदीपला, जाणून घ्या कसं?
Umran Malik-Arshdeep singh
Image Credit source: BCCI
Follow us on

ख्राइस्टचर्च: सध्या उमरान मलिक आपल्या वेगाने न्यूझीलंडमध्ये धुमाकूळ घालतोय. 155 किमीप्रतितास वेगाने उमरान गोलंदाजी करतोय. त्याच्या वेगवान चेंडूंनी न्यूझीलंडच्या फलंदाजांना पहिल्या वनडेत चांगलच सतावलं. त्याने डेवॉन कॉनवे आणि डॅरिल मिचेल या दोघांना बाद केलं. त्याच्या वेगवान गोलंदाजीने टीम इंडियाला फायदा होतोय. पण त्याचवेळी अर्शदीप सिंहला सुद्धा फायदा होतोय. उमरान आणि अर्शदीप दोघांनी न्यूझीलंड विरुद्ध ऑकलंड येथे पहिल्या वनडेमध्ये डेब्यु केला.

अर्शदीप काय म्हणाला?

उमरान माझं काम सोप करतोय, असं अर्शदीप न्यूझीलंड विरुद्ध तिसऱ्या वनडेआधी प्रेस कॉन्फरन्समध्ये म्हणाला. उमरान 155kmph वेगाने गोलंदाजी करतो, याचा मला फायदा मिळतो. 155kmph वेगवान चेंडूचा सामना करणारा फलंदाज 135kmph चेंडूचा सामना करताना अडचणीत येतो. याचा मला फायदा मिळतो, असं अर्शदीप म्हणाला.

पुढचा विचार जास्त नाही करत

मैदानावर आणि मैदानाबाहेर उमरानसोबतची पार्ट्नरशिप मला आवडते. दीर्घकाळ ही पार्ट्नरशिप अशीच चालू राहिलं, अशी अपेक्षा असल्याचं अर्शदीप म्हणाला. “माझा प्रवास सोपा किंवा आव्हानात्मक आहे, असं मला वाटत नाही. खेळाडू म्हणून आमचं लक्ष खेळण्यावर आणि त्या प्रक्रियेचा आनंद घेण्यावर आहे. मी या बद्दल जास्त विचार नाही करत” असं अर्शदीप म्हणाला.

राग आणि प्रेम दोघांचा स्वीकार

अर्शदीपने आशिया कप टुर्नामेंटमध्ये पाकिस्तान विरुद्ध महत्त्वाच्या सामन्यात 18 व्या षटकात आसिफ अलीची कॅच सोडली होता. त्याचा फायदा पाकिस्तानने उचलला. ते मॅच जिंकले. त्यानंतर सोशल मीडियावर अर्शदीपला मोठ्या प्रमाणात ट्रोल करण्यात आलं. अर्शदीप या विषयावर म्हणाला की, “लोक खेळावर आणि आमच्यावर भरपूर प्रेम करतात. जेव्हा आम्ही सर्वोत्तम कामगिरी करतो, तेव्हा लोक आमच्यावर प्रेम करतात. आम्ही चांगले खेळत नाही, तेव्हा लोक निराशा व्यक्त करतात. प्रेम आणि राग व्यक्त करणं हा फॅन्सचा अधिकार आहे. आम्हाला दोन्हींचा स्वीकार करावा लागेल”