साऊथॅम्प्टन : इंग्लंडच्या साऊथॅम्प्टन येथील मैदानात सुरु असलेल्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यात (ICC WTC Final) पहिल्या दिवशीपासून पाऊस, कमी सूर्यप्रकाश अशा हवामानासंबधी बाबींचा अडथळा समोर येत आहे. पहिल्या दिवशीचा संपूर्ण खेळ पाऊस असल्यामुळे रद्द करण्यात आला. त्यानंतर दुसऱ्या दिवशी बऱ्याच अडथळ्यानंतर अखेर खराब प्रकाशमानामुळे पंचांनी खेळ 64.4 षटकांनंतर थांबवण्याचा निर्णय घेतला आहे. तिसऱ्या दिवशी 78 षटकांचा खेळ झाला. दरम्यान, पावसामुळे आजच्या दिवसातही एकही चेंडू खेळवता आलेला नाही. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने नुकतीच माहिती दिली आहे की, पाऊस आणि खराब हवामामामुळे आजच्या दिवसाचा खेळ रद्द करण्यात आला आहे. (India vs Newzealand WTC Final 2021 day 4 cancelled due to rain in Southampton)
वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम लढतीचा चौथा दिवस पावसामुळे वाया गेला आहे. आज एकही चेंडू खेळवला गेला नाही. तब्बल पाच तास खेळ सुरू होण्याची वाट पाहण्यात आली, पण पावसाने चाहत्यांना निराश केले. अखेर आजच्या दिवसाचा खेळ रद्द करण्यात आला आहे. दरम्यान, आज पाऊस विश्रांती घेईल आणि सामना सुरु होईल या आशेवर शेकडो प्रेक्षक स्टेडियममध्ये बसून राहिले. परंतु पावसाने प्रेक्षकांच्या अपेक्षांवर पाणी फेरलं आहे.
Update: Play on Day 4 abandoned due to rain. We thank our fans who turned up and kept the tempo high. See you again, tomorrow.? #TeamIndia #WTC21 pic.twitter.com/0OpqZ0hGd5
— BCCI (@BCCI) June 21, 2021
पावसामुळे पहिल्या दिवसाचा खेळ रद्द करण्यात आला. दुसऱ्या दिवशी सामन्याला सुरुवात झाली खरी, परंतु त्यातही अनेकदा प्रकाश आणि हवामानाने खोडा घातला. त्यामुळे या दिवशी केवळ 64 षटकं खेळवण्यात आली. या 64 षटकांमध्ये भारतीय संघाने 3 बाद 146 धावांपर्यंत मजल मारली होती. त्यानंतर तिसऱ्या दिवशी म्हणजेच सोमवारी वातावरण चांगले असल्याने भारताचा संपूर्ण डाव 92.1 षटकं झाल्यानंतर न्यूझीलंड संघ देखील 49 षटकं खेळू शकला. न्यूझीलंड अद्याप 116 धावांनी पिछाडीवर असला तरी केवळ दोनच विकेट गमावल्याने आजचा दिवस सामन्यासाठी महत्त्वाचा ठरणार होता. पण पावसाने सर्व अंदाज चुकवले.
वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या अंतिम सामन्यावर (WTC Final 2021) न्यूझीलंडने मजबूत पकड मिळवली आहे. सामन्याचा तिसरा दिवस पूर्णपणे किवी खेळाडूंनी गाजवला होता. आधी गोलंदाजी करणाऱ्या न्यूझीलंडच्या गोलंदाजांनी भारताचा संघ 217 धावांत गारद केला. त्यानंतर फलंदाजांनी भारताचा गोलंदाजांना जेरीस आणलं. तिसऱ्या दिवसअखेर न्यूझीलंडने 2 बाद 101 धावांपर्यंत मजल मारली आहे. भारताकडे सध्या 116 धावांची आघाडी शिल्लक आहे. परंतु भारताला 49 षटकांमध्ये केवळ दोनच बळी मिळवता आल्याने सामन्यात सध्या तरी न्यूझीलंड वरचढ आहे.
संबंधित बातम्या
(India vs Newzealand WTC Final 2021 day 4 cancelled due to rain in Southampton)