मुंबई: भारत आणि श्रीलंकेत मंगळवारी सुपर 4 चा महत्त्वाचा सामना खेळला जाणार आहे. या सामन्याआधी अर्शदीप सिंह मोठी गोष्ट बोलून गेला. रविवारी पाकिस्तान विरुद्धच्या सामन्यात मोक्याच्याक्षणी अर्शदीपने झेल सोडला. त्यावरुन मोठा वादंग निर्माण झालाय. अर्शदीपला मोठ्या प्रमाणात ट्रोल केलं गेलं. ट्रोलर्सनी त्याला खलिस्तानी सुद्धा म्हटलं. या सर्व वादावर आता अर्शदीपने Reaction दिली आहे. भारताला सुपर 4 च्या पहिल्या सामन्यात पाकिस्तानने 5 विकेटने पराभूत केलं. या पराभवासाठी अर्शदीपाल दोषी ठरवलं जातय.
सामना रविवारी झाला. त्यानंतर दुसऱ्यादिवशी यावरुन बरच काही बोललं गेलं. यावर राजकीय प्रतिक्रिया सुद्धा उमटल्या. त्याच्या wikipedia पेजवर छेडछाड करुन खलिस्तानी शब्द लिहीला गेला. या सगळ्यामागे पाकिस्तान असल्याचा नंतर खुलासा झाला. भारतीय क्रिकेटपटूंसह सर्वसामान्य जनतेने सुद्धा अर्शदीपच समर्थन केलं.
अर्शदीप सिंहने पाकिस्तान विरुद्धच्या मॅच नंतर आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर काहीही पोस्ट केलेलं नाही. पण त्याने आपल्या कुटुंबीयांबरोबर चर्चा केली. सोशल मीडियावर अशा प्रकारचे टि्वटस आणि मेसेजेस पाहून मला हसायला येतय, असं त्याने कुटुंबीयांबरोबर बोलताना सांगितलं.
अर्शदीपचे आई-वडील सोमवारी संध्याकाळी दुबईहून चंदीगड मध्ये दाखल झाले. भारतात परतण्याआधी त्यांनी आपल्या मुलाबरोबर चर्चा केली. अर्शदीप या सगळ्या प्रकरणाकडे सकारात्मकतेने बघतोय, असं इंडियन एक्स्प्रेसने आपल्या वृत्तात म्हटलं आहे. हे सर्व टि्वट आणि मेसेज पाहून मला हसायला येतय, हे अर्शदीपचे शब्द होते, असं त्याचे वडिल दर्शन म्हणाले. या घटनेमुळे त्याचा आत्मविश्वास आणखी वाढेल, असं अर्शदीपचे माता-पिता म्हणाले. अर्शदीपचे आई-वडील भारत-पाकिस्तान सामना पाहण्यासाठी दुबईला गेले होते.
टीम इंडियाने जिंकावं अशी प्रत्येकची इच्छा आहे. पण असं घडत नाही, तेव्हा चाहते खेळाडूंवर राग काढतात. सोशल मीडियात सुरु असलेल्या गोष्टीचा अर्शदीपवर काहीही परिणाम झालेला नाही. त्याचं सगळ लक्ष श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यावर आहे, असं अर्शदीपच्या वडिलांनी सांगितलं.