मुंबई: आशिया कप (Asia cup) स्पर्धेतील आज बहुचर्चित भारत-पाकिस्तान (IND vs PAK) सामना होणार आहे. या सामन्याकडे क्रिकेट जगताचं लक्ष लागलं आहे. संयुक्त अरब अमिराती (UAE) आशिया कपचं यजमानपद भुषवत आहे. भारत-पाकिस्तान सामन्याची जगभरातील कोट्यवधी भारतीय क्रिकेट रसिकांना उत्सुक्ता असते. या सामन्याचा एक वेगळा दबाव असतो, हे खेळाडूंनी सुद्धा अनेकदा मान्य केलय. दोन्ही देशातील क्रिकेट चाहत्यांना विजयच हवा असतो. पराभव पचवणं खूप कठीण असतं.
भारत आणि पाकिस्तानचे संघ याआधी मागच्या टी 20 वर्ल्ड कप मध्ये आमने-सामने आले होते. मागच्यावर्षी यूएई मध्ये हा सामना झाला होता. पाकिस्तानने या सामन्यात विजय मिळवला होता. कुठल्याही वर्ल्ड कप मध्ये पाकिस्तानकडून झालेला भारताचा हा पहिला पराभव होता. आजही भारतीय क्रिकेट चाहते तो पराभव विसरलेले नाहीत. आज टीम इंडियाला मागच्यावर्षीच्या पराभवाची सव्याज परतफेड करण्याची संधी आहे.
या सामन्याआधी दोन्ही संघ दुखापतीने हैराण आहेत. पाकिस्तान आज आपला मुख्य गोलंदाज शाहीन शाह आफ्रिदीशिवाय मैदानावर उतरणार आहे. आफ्रिदीला दुखापत झालीय. त्यामुळे तो या स्पर्धेत खेळू शकणार नाहीय. पण मनोबल वाढण्यासाठी आफ्रिदी पाकिस्तानी संघासोबत आहे. मोहम्मद वसिमच्या रुपाने पाकिस्तानी संघाला दुसरा धक्का बसला आहे. मोहम्मद वसिम ज्यूनियरच्या पाठिला दुखापत झाली आहे. त्यामुळे तो ही आशिया कप मध्ये खेळत नाहीय. भारताचे दोन प्रमुख गोलंदाज जसप्रीत बुमराह आणि हर्षल पटेल दुखापतीमुळे या स्पर्धेत खेळत नाहीयत.
भारत आणि पाकिस्तान मध्ये आशिया कप 2022 चा सामना कधी खेळला जाणार?
भारत आणि पाकिस्तानात आशिया कप 2022 चा सामना रविवारी 28 ऑगस्टला खेळला जाईल.
भारत-पाकिस्तान मध्ये आशिया कप 2022 चा सामना कुठे होणार?
भारत आणि पाकिस्तान मध्ये आशिया कप 2022 चा सामना दुबई इंटरनॅशनल क्रिकेट स्टेडियम मध्ये खेळला जाईल.
भारत आणि पाकिस्तान मध्ये आशिया कप 2022 चा सामना कधी सुरु होणार?
भारत आणि पाकिस्तानात आशिया कप 2022 चा सामना संध्याकाळी 7.30 वाजता सुरु होईल. संध्याकाळी 7 वाजता टॉस उडवला जाईल.
भारत-पाकिस्तान आशिया कप 2022 सामन्याचे लाइव्ह टेलिकास्ट कुठे होणार?
भारत आणि पाकिस्तान मधील आशिया कप 2022 सामन्याचे लाइव्ह टेलिकास्ट स्टार स्पोर्ट्स नेटवर्कच्या वेगवेगळ्या चॅनलवर होईल.
भारत आणि पाकिस्तान मधील आशिया कप 2022 सामन्याचे लाइव्ह स्ट्रीमिंग कुठे होईल?
भारत आणि पाकिस्तान मधील आशिया कप 2022 सामन्याचं लाइव्ह स्ट्रीमिंग डिजनी हॉटस्टार वर होईल. या सामन्याचे लाइव्ह अपडेट्स तुम्ही TV9marathi.com वाचू शकता.