मुंबई : क्रिकेट जगतात सध्या टी 20 विश्वचषकाचीच (T20 World Cup) चर्चा आहे. टीम इंडिया 24 ऑक्टोबरला आपला कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानविरुद्धच्या (India vs Pakistan T20 World Cup) सामन्यातून मोहिमेला सुरुवात करणार आहे. भारतीय संघाची (Team India) घोषणाही झालेली आहे. मात्र प्लेईंग इलेव्हन म्हणून कोणते खेळाडू घेऊन विराट कोहली (Virat Kohli) मैदानात उतरणार याची उत्सुकता शेवटपर्यंत असेल. पण भारताचा माजी सलामीवीर गौतम गंभीरने (Gautam Gambhir) पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यासाठी टीम इंडियाच्या प्लेइंग इलेव्हनची निवड केली आहे.
गौतम गंभीरने आपला संघ निवडला आहे. यामध्ये त्याने अनुभवी फिरकीपटू रवीचंद्रन अश्विनचा समावेश केलेला नाही. गंभीरने अश्विनच्या जागी मिस्ट्री फिरकीपटू वरुण चक्रवर्तीला संघात स्थान दिले आहे.
टी -20 विश्वचषकासाठी निवडलेल्या 15 जणांच्या भारतीय संघात अश्विनची निवड करून निवडकर्त्यांनी सर्वांना आश्चर्यचकित केले. अश्विन चार वर्षांपासून टी -20 आंतरराष्ट्रीय खेळला नाही. त्यामुळे त्याची निवड होण्याची शक्यता कमी होती. तरीही अश्विनला स्थान देण्यात आलं.
स्टार स्पोर्ट्सचा शो ‘फॉलो द ब्लूज’वरील चर्चेदरम्यान गंभीरने त्याच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये के एल राहुल आणि रोहित शर्माला सलामीवीर म्हणून निवडले. तर त्याने तिसऱ्या क्रमांकावर टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीची निवड केली. सूर्यकुमार यादव 4 व्या स्थानावर, भारतीय यष्टीरक्षक ऋषभ पंत 5 व्या स्थानावर उतरावा अशी गंभीरची अपेक्षा आहे.
गंभीरने हार्दिक पंड्याला सहाव्या क्रमांकावर, रवींद्र जडेजाला सातव्या क्रमांकावर निवडले. तर भारताचा वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमारला 8 व्या क्रमांकावर स्थान दिलं आहे.
गंभीरने मिस्ट्री स्पिनर वरूण चक्रवर्तीला 9 व्या क्रमांकावर, मोहम्मद शमीला 10 व्या क्रमांकावर आणि जसप्रीत बुमराहला 11 व्या क्रमांकावर निवडले. फिरकीपटू म्हणून गंभीरने केवळ वरुण चक्रवर्तीचीच निवड केली.
दुसरीकडे हार्दिक पांड्या आणि रवींद्र जडेजा यांना अष्टपैलू म्हणून स्थान देण्यात आले आहे. शार्दुल ठाकूर भारतीय संघाचा भाग असता तर त्याने भुवनेश्वर कुमारची जागा घेतली असती, असेही गंभीर म्हणाला. शार्दुल टी -20 विश्वचषकासाठी निवडलेल्या राखीव खेळाडूंपैकी एक आहे.
के एल राहुल, रोहित शर्मा, विराट कोहली (कर्णधार), सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत, हार्दिक पांड्या, रवींद्र जडेजा, भुवनेश्वर कुमार, मोहम्मद शमी, वरुण चक्रवर्ती आणि जसप्रीत बुमराह
भारत (India): विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा (उपकर्णधार), केएल राहुल, जसप्रीत बुमराह, भुवनेश्वर कुमार, सूर्यकुमार यादव, इशान किशन, हार्दिक पंड्या, ऋषभ पंत, रवींद्र जाडेजा, राहुल चाहर, वरुण चक्रवर्ती, मोहम्मद शमी, अक्षर पटेल, आर अश्विन |
राखीव: श्रेयस अय्यर, दीपक चाहर आणि शार्दुल ठाकूर
भारत आणि पाकिस्तान या दोघांसह ग्रुप-2 मध्ये न्यूझीलंड आणि अफगानिस्तान हे संघही आहेत. तसेच ग्रुप स्टेजमधून पात्र होणारे दोन संघही याच ग्रुपमध्ये येणार असून या सर्वांच्या सामन्याला 24 ऑक्टोबरपासून सुरुवात होईल. दरम्यान भारताचे ग्रुपमधील सामने पुढीलप्रमाणे-
आधी भारतात पार पडणारा टी-20 विश्वचषक कोरोनाच्या संकटामुळे आता युएई आणि ओमान देशांत खेळवला जाणार आहे. काही दिवासांपूर्वीच बीसीसीआय़ आणि आयसीसी यांनी संयुक्त बैठकीतून हा निर्णय घेतला होता. दरम्यान युएई आणि ओमानमध्ये पार पडणाऱ्या या स्पर्धेचे सामने दुबई इंटरनॅशनल स्टेडियम, शेख जायद स्टेडियम (अबु धाबी), शारजाह स्टेडियम आणि ओमान क्रिकेट अॅकेडमी मैदान याठिकाणी खेळवले जाणार आहेत.
संबंधित बातम्या
T20 World Cup: यंदाच्या टी-20 विश्वचषकात एकही माजी विजेता कर्णधार नाही, सर्व यादी पाहा एका क्लिकवर